✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एक कप चहा - भाग २ !!

फ — फिझा, Tue, 02/19/2013 - 03:24
एक कप चहा - भाग २ !! धरेला मोहरून टाकणारं पावसाचं पाणी , चिंब भिजलेल्या मातीचा तो गोड सुगंध , आकाशाला इंद्रधनूची माळ घालून डोकावणारा भास्कर , मग कापूस पिंजून ठेवल्यासारखे शुभ्र ढग ... असंच बनतं विश्व ..... बहरलेला ऋतू आणि आलं घातलेला ....एक कप चहा !! अनमोल रत्नांना सामावलेला अथांग समुद्र , फक्त मनात साठवता येतील अशी पक्षांची गोड गाणी , कृत्रिम जगालाही मागे टाकणारे अप्रतिम निसर्ग सौंदर्य , दिव्यांचा झगमगाट असून सुद्धा भुरळ घालणारा मंद चंद्र प्रकाश ..... असंच असतं सुख .... क्षण क्षण निसटलेला आणि तृप्त करणारा ...एक कप चहा !! सुख आणि दु:ख डोळ्यात पाणी आणतात खरे , राव असो वा रंक साखरेचा गोडवा चाखतात खरे , फिके असू की गडद फुलांचे रंग मोहरून टाकतात खरे , आणि बेदाग पांढऱ्या रंगाचे पावित्र्य ते खरे .... असंच असतं जीवन ..... निर्जीवातला जिवंतपणा आणि तयार झालेला ....एक कप चहा !! धबधबा पाहताना कधी आपण धुक्यात हरवतो , गोड बातमी ऐकतानाही आनंदाश्रू कोसळतो , आभाळ रंगीत करूनही सुर्य मावळलेला असतो, रंगांच्या छटा खुलवण्यासाठी घेतलेला कॅनवास मात्र पांढराच असतो .... असंच असतं हे आयुष्य .... गच्च भरलेला रिक्तपणा आणि पोटात ढकललेला....एक कप चहा !!

Book traversal links for एक कप चहा - भाग २ !!

  • ‹ एक कप चहा ...!!
  • Up
  • एक कप चहा - भाग ३ !! ›

प्रतिक्रिया द्या
1856 वाचन

💬 प्रतिसाद (4)

सुरेख! हाही भाग मस्त!

स्पंदना
Tue, 02/19/2013 - 07:21 नवीन
सुरेख! हाही भाग मस्त!
  • Log in or register to post comments

बोले तो...एकदम झकास!

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/19/2013 - 07:51 नवीन
बोले तो...एकदम झकास! :-)
  • Log in or register to post comments

सुपर

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 02/19/2013 - 08:01 नवीन
सुपर लाईक!!!
गच्च भरलेला रिक्तपणा आणि पोटात ढकललेला....एक कप चहा !!
व्वाह!!
  • Log in or register to post comments

खरच छान ... अन इथे कोणतीही

पक पक पक
Wed, 02/20/2013 - 08:40 नवीन
खरच छान ... :) अन इथे कोणतीही गुस्ताखी होणार नाही.. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा