टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
विराणी
प्रेषक यशोधरा ( गुरू, 07/03/2008 - 22:19) .
एकेक पाकळी गळली
बहराची सरली गाणी
उदास ऋतू शिशिराचा
तनमनास वेढून राही
गतस्मृतींचा सुकला मोहर
कवटाळूनी परि हृदयाशी
चैतन्य मनाचे जपते
गुंफित विराणी कोणी...
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती



वा!
चैतन्य मनाचे जपते
गुंफित विराणी कोणी...
वा!
तात्या.
यशभाय तुम
यशभाय तुम भी????
मस्त आहेत ओळी... !
http://bhagyashreee.blogspot.com/
यशभाय तुम भी????
क्या करे मौसम ही ऐसा है !
असो ... दोनच कडवी पण सुरेख जमलीत, मस्त यशभाय.
का कोण जाणे, बालकवींच्या या कवितेची आठवण झाली
कोठुन येते मला कळेना,
उदासिनता ही हृदयाला.
काय बोचते ते समजेना,
हृदयाच्या अंतरहृदयाला.
क्या करे
क्या करे मौसम ही ऐसा है !
सहमत.
अरे अरे... यशो पण कवितारोगाच्या कचाट्यात सापडली !
राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता
सुंदर
मस्त यशोधरा.
सार्याच ओळी सुंदर.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
तात्या,
तात्या, भाग्यश्री, मनस्वी, आनंदयात्री खूप धन्यवाद. जरा कचरतच टाकल्या ओळी इथे...
राजे,
ब्लॉगावर आहे ना?
ही ब्लॉगावर आहे का ग तुझ्या? तिथे वाचल्यासारखी वाटतेय. अर्थात सुरेखच आहे.
खुप छान
सुरेख आहे कवीता,
आणखी न वाढवता येईल का ?
>>आणखी न
>>आणखी न वाढवता ....
आणखी 'न'च वाढवली आहे कौस्तुभ
उगाच वाढवण्यात काय मतलब?
मस्त
सुंदर. शेवटच्या ओळींतला विरोधाभास खासच.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुंदर
>>चैतन्य मनाचे जपते
गुंफित विराणी कोणी...
आवडले..
फुलवा
हो मेघना,
हो मेघना, ब्लॉगवर आहे.
फुलवा, नंदन, कौस्तुभ खूप धन्यवाद.