टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
(स्वप्न)
प्रेषक केशवसुमार ( गुरू, 07/03/2008 - 12:48) .
आमची प्रेरणा धोंडोपंतांची सुरेख गझल स्वप्न
भेटण्याची काय पण ही रीत आहे?
बुकलुनी म्हणते वरी ही प्रीत आहे
आज पण घेऊन झाडू स्वागताला
बायको अमुची उभी वस्तीत आहे
राहिली आता न मजला शुध्द साधी
मोडले पेकाट मी निपचीत आहे
आठवण गेली तुझी चुकवून ठोका
मी पुन्हा आता तिच्या धास्तीत आहे
"केशवा"पुन्हा नको ते स्वप्न पाहू
कालचा इतिहास हा स्मृतीत आहे
----केशवसुमार
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती


:) :) :)
आज पण घेऊन झाडू स्वागताला
:) 
बायको अमुची उभी वस्तीत आहे
राहिली आता न मजला शुध्द साधी
मोडले पेकाट मी निपचीत आहे
शेवटच्या शेरात 'आठवणीत' मधल्या यतीभंगामुळे मस्त उसळीत दाताखाली चोरमटकी आल्यागत झाले. चू भू द्या घ्या.
(छिद्रान्वेषी)बेसनलाडू
ह्म्म
बेलाशेठ,
माझ्या ही लक्षात ही बाब आली होती .. पण नेहमी प्रमाणे प्रकाशित करायच्या घाईत राहून गेले..
नंतर 'कालचा इतिहास हा स्मृतीत आहे' आहे असा बदल सुचला होता पण तुमचा प्रतिसाद आधीच आल्यमुळे संपादित करता आले नाही.. असो.. प्रतिसादा बद्दल धन्यवाद..
(घाईत) केशवसुमार
आता तसा बदल केला आहे.. - जनरल डायर.
हा हा हा हा हा
हा हा हा हा हा,
केशवसुमार,
अप्रतिम विडंबन. खूप आवडले.
आज पण घेऊन झाडू स्वागताला
बायको अमुची उभी वस्तीत आहे
हा हा हा. आपण समदु:खीच की.
केशवसुमार ,
तुमचे विडंबन आले म्हणजे आमची गझल सार्थकी लागली.
आपला,
(कृतकृत्य) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
भयंकर आवडले
भयंकर आवडले हे विडंबन..
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. धन्यवाद.
सुंदर..
केशवा,
भेटण्याची काय पण ही रीत आहे?
बुकलुनी म्हणते वरी ही प्रीत आहे
हे मस्तच रे! जियो....!
आपला,
(आडनावबंधु) तात्या.
केशवसुमार जी!
सुंदर !
आपली सगळीच विडंबने सुंदरच असतात.
या विडंबनातील शेवटच्या शेराबाबत बेसनलाडू यांची प्रतिक्रिया मला पण पटते ,पुढी ओळ कशी वाटते पहा :
"केशवा"पुन्हा नको ते स्वप्न पाहू
ते तिचे वास्तव्यही सुस्तीत आहे !
चू भू द्या घ्या.
उदय सप्रेम
विडंबन
आवडले.. मुळ गझले इतकेच..
क्या बात है केसुशेठ!
मस्त गजलेचे तेवढेच मस्त विडंबन!
)
(खूप दिवसांनी नेहेमीचा 'केसुटच' वाचायला मिळाला!
चतुरंग
आभरप्रदर्शन
नावाप्रमाने अगदि सुमार अशी कवीता पन सुमार असल्याशिवाय विड॑बन होत नाहि. छान
मस्त विडंबन
बायको अमुची उभी वस्तीत आहे
ही ओळ आमच्या बाबतीत
बायको अमुची उभी मस्तीत आहे
अशी असते.
असो...
मस्त!
हा हा हा !!!
:)
मस्त!
पहिलं कडवं सगळ्यात बेस!
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
धन्यवाद!
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी) केशवसुमार.
मला तसा
मला तसा आजुन काही अनुभव आलेला नाही
पण आपल्या अनुभवातुन खुप काही शिकण्यासारखे आहे.
अप्रतिम रचना.