टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
खणले रे पथ
आमचे प्रेरणास्थान : फुलले रे क्षण माझे ......
खणले रे पथ माझे खणले रे
ड्रेनेजच्या , हो s s टेलिफोनच्या
आणि गॅ s sसच्या लोकांनी
तुटले रे पथ माझे तुटले रे
धुळीच्या लोटात गर्दीच्या पोटात भयभीत जीव फिरे
डांबरीकरण, कांक्रीटीकरण लोकांचे मरण रे
या वेडाच्या, आधीन शासन झाले मिंधे रे
पैशांच्या थैलीने
खणले रे .............
रीत ही दरवर्षीची थांबेना
रहदारीची दुर्दशा साहवेना
कुणा सांगु मी काय सांगु मी
निबर मनास काही उमगेना
पोटाच्या खळगीने
खणले रे पथ माझे खणले रे
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

सही !!!
रीत ही दरवर्षीची थांबेना
रहदारीची दुर्दशा साहवेना
कुणा सांगु मी काय सांगु मी
निबर मनास काही उमगेना
पोटाच्या खळगीने
खणले रे पथ माझे खणले रे
झकास !!!
झुळूक वार्याची
(सुधीर मोघे आणि हेरंब रावांची माफी मागून...)
झुळूक वार्याची आली रे घेऊन टपोरी धूळफुले
साजण येण्याची जाणीव होउन जीव कसा हळहळे
त्या वेड्याचे...त्या वेड्याचे आता होणार मातेरे...
ड्रेनेजच्या...टेलिफोनच्या खड्ड्याने...\\३\\
रीत ही रीत ही समजेना
गेला का जीव इथेच उमजेना
सु-शासनाचे सु-शासनाचे घालूया आत्ताच श्राद्ध रे
मातीने...\\४\\
हे ही झक्कास.
हेरंभाचे मूळ विडंबनही झक्कास आणि तुम्ही लिहीलेल्या ओळी पण झक्कास.
पुण्याचे पेशवे
अप्रतीम..
अप्रतीम विडंबन....!
झक्कास विडंबन!
चतुरंग
झकास विडंबन
आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू