आठवण

मयुरपिंपळे's picture
मयुरपिंपळे in जे न देखे रवी...
15 Oct 2012 - 12:12 am

तुझी आठवण म्हणजे एक प्रवास
मनात माझ्या तुझा फ़क़्त सहवास |

ती येते काही क्षणासाठी
पण हे मग स्वप्न तरी कशासाठी |

मन हे खूळ तुझ्या स्वप्नात
साजणे कधी येशील माझ्या मनात |

-- मयुर

कविता

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

15 Oct 2012 - 3:03 pm | स्पंदना

अगदी प्रत्येक यमक जुळलय हो छानपैकी.

दादा कोंडके's picture

15 Oct 2012 - 3:27 pm | दादा कोंडके

ट ला ट जोडून केलेल्या माझ्या चारोळी!

गालावर फिरते एक मोरपीस
देशील का राणी मला कीस?

होउ नकोस ग अशी क्रूर,
नाचणार मग कसा माझा मनमयूर?

तुझी आठवण म्हणजे एक प्रवास
आयुष्यभर न थकता करत रहावा
तुझा सहवास्,एक आठवणीतला पाऊस
न थांबता सतत मनात पडत रहावा !

ती येते काही क्षणांसाठी
क्षण क्षण हि काळजात जपावा
ती असतेच क्षणभरासाठी
तो क्षणहि क्षणात विरघळुन जावा !

मन हे खुळं तुझ्या स्वप्नात
स्वप्नालाहि मोडण्याचा अधिकार नसावा
रातराणीपरी तु माझ्या मनात
रात्रीच उमलण्याचा तिला अभिशाप नसावा !

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2012 - 11:04 pm | अत्रुप्त आत्मा

च.चा आय.डी चेंज क्येलास कारे??? ;-)

लीलाधर's picture

16 Oct 2012 - 10:07 am | लीलाधर

बुवा माहित नाही काय ओ तुम्हास ? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2012 - 6:36 pm | अत्रुप्त आत्मा

बरं बरं,तु लीलाधरच आहेस का? चान चान! :-b
कविता वाचल्यावर मला आपली शंका आली, कारण केटरर बदलला असला तरी जिल्बी तीच आहे, ;-) तांब्या आणी पीठाचा ब्रँडपण तुमचाच आहे,म्हणुन विचारले! :-b

लीलाधर's picture

16 Oct 2012 - 7:07 pm | लीलाधर

नाही अहो ईथे पडणारी प्रत्येक जिलबी माझ्या नावावर खपवणार आहात काय ?
अहो येथे सदस्य कालावधी पाहण्याची सोय आहे विसरलात काय ओ अत्रुप्त :-P

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2012 - 11:08 pm | अत्रुप्त आत्मा

हाय रे कर्मा......!!! अता तुला इनोद पण समजवावा लागणार ;-)

किसन शिंदे's picture

17 Oct 2012 - 1:10 pm | किसन शिंदे

अता तुला इनोद

पण

समजवावा लागणार

म्हणजे??:o

आणखी काय काय समजावून सांगता हो त्याला??

अत्रुप्त आत्मा's picture

17 Oct 2012 - 2:05 pm | अत्रुप्त आत्मा

अरेरे ...! आपल्यालाही काहि समजलं नाही. :-b

सूड's picture

17 Oct 2012 - 4:37 pm | सूड

बुवा विषय बदलू नका.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Oct 2012 - 6:59 pm | अत्रुप्त आत्मा

अबंबं...! न कळत्यात अजुन एकाची भर पडली :-b
भगवंता वाचीव या लेकरांना...! ;-)

प्रचेतस's picture

17 Oct 2012 - 8:39 pm | प्रचेतस

बुवांच्या मनात " भगवंता भगवंता अस्सं कस्स झालं, टाकला होता डोसा, आम्लेट कस्सं बाहेर आलं" असे काहीसे विचार येत असतील.

जेनी...'s picture

17 Oct 2012 - 9:23 pm | जेनी...

=))

अत्रुप्त आत्मा's picture

17 Oct 2012 - 10:49 pm | अत्रुप्त आत्मा

अगोबा आणतात अठवणींच्या झुंडी
दु.दु.पणा बद्दल द्या त्यांना तोफेच्या तोंडी >>>>> आत्मा http://www.sherv.net/cm/emoticons/fighting/cannonball.gif
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>अगोबा

प्रचेतस's picture

18 Oct 2012 - 9:14 am | प्रचेतस

a

झुंडी घेऊन येतो आम्ही आठवणींच्या
पण तुम्हाला का उगा झोंबतात मिरच्या.

नवकवींना असं निरुत्साही कलेलं पाहून आज एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Oct 2012 - 3:37 pm | अत्रुप्त आत्मा

ए गप गं... शरमिष्ठा :-b

माझ्या डूआयडीचं बारसं केल्याबद्दल धन्यवाद अतृप्त आत्याबाई !!

@ माझ्या डूआयडीचं बारसं केल्याबद्दल धन्यवाद अतृप्त आत्याबाई !!

घुगर्र्र्या कुठे आहेत ओ अतृप्त आत्याबाई !! ;) :-P

जेनी...'s picture

18 Oct 2012 - 11:45 pm | जेनी...

शर्मिषठा

__________
=)) =))

जिलबी धागा उघडल्याचं सार्थक केलंत अआ.

कारण केटरर बदलला असला तरी जिल्बी तीच आहे,
पहिला चौकार..

तांब्या आणी पीठाचा ब्रँडपण तुमचाच आहे,म्हणुन विचारले!
आणि हा ख्रिस गेल मैदानाबाहेर... याला आठ धावा हव्यात सहा पुरत नाहीत..

--/\--

मेघवेडा's picture

17 Oct 2012 - 9:38 pm | मेघवेडा

आठवणींचे पिंपळपान!

च्यायला बरेच दिवस नव्ह्तो हे बघुन पिंपळावरची भुत पुन्हा उगवली काय... :)

मयुरपिंपळे's picture

26 Oct 2012 - 8:39 pm | मयुरपिंपळे

फालतु नावने आडी काढुन ऊगच मिपावरच्या लोकाचा मनोरंजन करु नका!,,,

जेनी...'s picture

26 Oct 2012 - 9:40 pm | जेनी...

मयुर रागवु नका :(

थोडीफार मस्ती चालतेच ना :-/

मयुरपिंपळे's picture

26 Oct 2012 - 10:58 pm | मयुरपिंपळे

पण ही मस्ती नव्हे हा फालतु पणा आहे ...

दादा कोंडके's picture

2 Nov 2012 - 1:43 am | दादा कोंडके

मयुर रागवु नका
थोडीफार मस्ती चालतेच ना

हो ना गडे, असं हो काय करता?

मयुर पिंपळे साहेब, तुमच्या कवितेच स्वागत आहे.
प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे.