✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा jargon

र
राजो यांनी
Fri, 08/31/2012 - 15:16  ·  लेख
लेख
मिपावर आल्यापासून इथल्या साहित्य चर्चा इ. चा आस्वाद घेत आलो आहे. पण प्रतिक्रियांमध्ये अनेक shortforms वापरले जातात. काहींचा अर्थ लागतो. काहींचा आजिबात नाही. उदा. प्रकाटाआ - प्रतिसाद काढून टाकला आहे बाडिस - ??? मचाक - ??? आणि इतर अनेक.. नवीन सदस्यांना माहिती होण्यासाठी वाविप्र (हे अजुन एक.. :) ) मधे अशा मिपा स्पेशल शब्दांची माहिती द्यावी का?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15949 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

पु ले शु - पुढील लेखनासाठी

बाळ सप्रे
Fri, 08/31/2012 - 15:25 नवीन
पु ले शु - पुढील लेखनासाठी शुभेच्छा. हा का ना का - हाय काय नि नाय काय .. ह ह पु वा - हसून हसून पुरेवाट..
  • Log in or register to post comments

काही जार्गन

पुण्याचे वटवाघूळ
Fri, 08/31/2012 - 15:26 नवीन
काही: १. पुलेशु: पुढील लेखनास शुभेच्छा २. पुभाशु: पुढील भागास शुभेच्छा ३. विचारजंतः प्रस्थापित विचारांच्या विरोधात आपली मते मांडणारे सदस्य. अशा सदस्यांनी काहीही लिहिले तरी ते जे काही भारतीय/हिंदू आहे त्याच्या ते विरोधात आहेत असे जोरदार ठोकून दिले जाते असे खूप वेळा बघायला मिळाले आहे. ४. चुचुवाणी: अच्र्त (म्हणजे अचरट) अशा पध्दतीने मराठी शुध्दलेखनाला भोसकून लिहिणे. शुध्द मराठी लिहिण्यापेक्षा असे लिहिता येणे अधिक कठिण आहे. आणि हो. धाग्याचे काश्मीर होणे: धाग्यावर मूळ विषयाला धरून असलेल्या आणि नसलेल्याही असंख्य प्रतिक्रियांचा पाऊस पडणे.
  • Log in or register to post comments

आणखी काही शब्द लिहिण्याच्या

बाळ सप्रे
Fri, 08/31/2012 - 15:47 नवीन
आणखी काही शब्द लिहिण्याच्या खास पद्धती.. कै - काही नै - नाही भौ - भाउ चोप्य पस्ते - copy paste आवडल्या गेले आहे > आवडले गेले आहे (माझ्याकडून) > मला आवडले आहे आवडेश - आवडले.. णिषेध - निषेध
  • Log in or register to post comments

बाडिस = सहमत

डावखुरा
Fri, 08/31/2012 - 16:00 नवीन
बाडिस = सहमत
  • Log in or register to post comments

बाय डिफॉल्ट सहमत=बाडिस. बाकी

बॅटमॅन
Fri, 08/31/2012 - 16:02 नवीन
बाय डिफॉल्ट सहमत=बाडिस. बाकी मचाक च्या लाँगफॉर्मसाठी जाणकारांना पाचारण ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा

रच्याकने = रस्ताच्या कडे

स्पा
Fri, 08/31/2012 - 16:11 नवीन
रच्याकने = रस्ताच्या कडे कडेने = by the way
  • Log in or register to post comments

प्रा का टा आ

अपूर्व कात्रे
Fri, 08/31/2012 - 16:11 नवीन
प्रा का टा आ म्हणजे नक्की काय हा गोंधळ माझ्याही मनात होताच...
  • Log in or register to post comments

हे घ्या!

मोहनराव
Fri, 08/31/2012 - 16:17 नवीन
http://www.misalpav.com/node/16970 हा धागा मदत करेल!
  • Log in or register to post comments

धन्यवाद मोहनराव.. खूप

राजो
Fri, 08/31/2012 - 16:31 नवीन
धन्यवाद मोहनराव.. खूप शब्दांचे अर्थ समजले.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

गणपा डिटेक्टिव्ह म्हणतो ते

सूड
Fri, 08/31/2012 - 16:44 नवीन
गणपा डिटेक्टिव्ह म्हणतो ते उगाच नाय !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

मचाक म्हणजे काय?

रेवती
Fri, 08/31/2012 - 18:50 नवीन
मचाक म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

'मराठी चाकरमान्यांचा कट्टा'

सूड
Fri, 08/31/2012 - 19:08 नवीन
'मराठी चाकरमान्यांचा कट्टा' असावं कदाचित !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

धन्यवाद.

रेवती
Fri, 08/31/2012 - 19:12 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

'मराठी चाकरमान्यांचा

स्पा
Fri, 08/31/2012 - 19:56 नवीन
'मराठी चाकरमान्यांचा कट्टा' खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

@'मराठी चाकरमान्यांचा प्रेषक

अत्रुप्त आत्मा
Sat, 09/01/2012 - 10:01 नवीन
@'मराठी चाकरमान्यांचा प्रेषक स्पा Fri, 31/08/2012 - 19:56. 'मराठी चाकरमान्यांचा कट्टा' खिक्क >>> :-D महा डँबिस माणुस... जस काहि कळतच नै...! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मचाकन म्हणजे...

वामन देशमुख
गुरुवार, 04/25/2013 - 19:22 नवीन
मचाक म्हणजे 'मराठी चाकरमान्यांचा कट्टा'
आणि मचाकन म्हणजे... मराठी चाकरमान्यांचा कट्टा नवीन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ठ्ठो....

सोत्रि
Sat, 09/01/2012 - 01:20 नवीन
ठ्ठो.... - ( 'मचाक'प्रेमी ) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मचाक

विनायक प्रभू
Fri, 08/31/2012 - 19:28 नवीन
मचाक्=मराठी चावट कथा
  • Log in or register to post comments

अरे देवा! समजलं . धन्यवाद.

रेवती
Fri, 08/31/2012 - 19:40 नवीन
अरे देवा! समजलं . धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

हि मिपावर कुठे मिळेल ;)

टवाळ कार्टा
Sat, 09/01/2012 - 20:59 नवीन
हि मिपावर कुठे मिळेल ;) त्या मंदाकीनीने आशा लावलेली :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

हे झालय पूर्वी मिसळपाववर

आशु जोग
Fri, 08/31/2012 - 20:01 नवीन
हे झालय पूर्वी मिसळपाववर
  • Log in or register to post comments

काय मणोरञ्जक धागा दिलात हो!

इनिगोय
Fri, 08/31/2012 - 20:18 नवीन
काय मणोरञ्जक धागा दिलात हो! अवांतराच्या लडी सुटून धाग्याचा लई भारी गुंता होतो कसा याचा वस्तुपाठच अाहे. न.ज.वा. (नवसदस्यांनी जरूर वाचावे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

मा. त. कंपनी = ??

बाळ सप्रे
Wed, 04/24/2013 - 18:00 नवीन
मा. त. कंपनी = ??
  • Log in or register to post comments

माहिती तंत्रज्ञान कंपनी.

बॅटमॅन
Wed, 04/24/2013 - 18:02 नवीन
माहिती तंत्रज्ञान कंपनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे

चेपु = चेहरा पुस्तक

पुष्कर जोशी
गुरुवार, 04/25/2013 - 21:04 नवीन
चेपु = चेहरा पुस्तक
  • Log in or register to post comments

काही नवीन म्हणीपण येऊ

कंजूस
Mon, 04/29/2013 - 10:27 नवीन
काही नवीन म्हणीपण येऊ घातल्यात १. मिपांत राहून "@@"शी वैर २.फुटकळ लेखांना प्रतिक्रियांचा आधार .३सांपलशिवाय पिकनिक आणि ठसक्याशिवाय मिसळपाव अळणी
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा