दुष्काळी शेतकऱ्याचे मनोगत ...

अमितसांगली's picture
अमितसांगली in जे न देखे रवी...
21 May 2012 - 8:39 am

भिखेची तिजोरी, पैशाचा तुटवडा
जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा.......

निसर्गाची साथ नाही,
नशिबाचा हात नाही,
दुष्काळाची अवकृपा पाठ काही सोडत नाही,
थकलेल्या हातांनी या, करू कसा सामना,
जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा.......

उसालाही दर नाही,
कापसालाही भाव नाही,
दोन वेळच्या अन्नाची पण, सोय काही होत नाही,
हरलेल्या जीवाचा या, प्राण काही जाईना,
जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा.......

प्याकेजच्या नावाखाली केला विकासाचा भास,
मतांचे राजकारणच फक्त, यांच्यासाठी खास
जीवघेण्या या राज्यात, कोंडतोय माझा श्वास,
नाही राहिली आता मला, कशाचीच आस,
दारिद्र्याचे चटके आता, काही केल्या सोसेना,
जीव घे रे देवा माझा, जीव घे रे माझा.......

भयानककरुणसमाज

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

21 May 2012 - 8:42 am | प्रचेतस

छान लिहिलंस अमित.

अमितसांगली's picture

21 May 2012 - 8:54 am | अमितसांगली

तुम्ही या कवितेचे पण विडंबन कराल असे गृहीत धरूनच हि कविता पोस्ट केली होती...किंबहुना मी स्वताच कशा प्रकारे याचे विडंबन होईल याचाही विचार केला होता...माझ्यासाठी अनपेक्षित पण सुखद प्रतिसाद.......

खूप खूप धन्यवाद सर ....

अरे मी सरसकट विडंबनं करत नाही रे. विडंबनाची फॅक्टरी आत्माजींकडे असते. :)

अमितसांगली's picture

21 May 2012 - 9:05 am | अमितसांगली

त्यांच्याच प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत .......

अत्रुप्त आत्मा's picture

21 May 2012 - 5:21 pm | अत्रुप्त आत्मा

@अरे मी सरसकट विडंबनं करत नाही रे. >>> तरी लोक मग अठवण का काढतात बरं? :-D
@विडंबनाची फॅक्टरी आत्माजींकडे असते. >>> घ्या...! धंदा डुबला,तर भागिदार कसे अंग झटकतात. दु...दु... अ. ;-)

आप कितना भी मू फेर लो,मगर लोग तो याद रखेंगे ही... :-)

विदर्भात लहानाचा मोठा झाल्याने हे सगळं आजू बाजूला घडताना पाहिलं आहे :-( केवळ ५-१०हजाराच्या कर्जापायी आत्महत्या केल्याची तर कित्येक उदाहरणं आहेत... अशा संवेदनशील विषयाचे मिपावर नक्कीच विडंबन होणार नाही याची खात्री बाळगू शकतोस...

अमृत

अमितसांगली's picture

21 May 2012 - 9:39 am | अमितसांगली

वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने मी दुष्काळी भाग ८ वर्षे जवळून अनुभवला आहे...पाण्याची, विजेची टंचाई, महागाई आणि पैशाची कमतरता....अतिशय बिकट परिस्थिती....

अमितसांगली साहेब, सुंदर पण सत्य असलेली कविता.

पैसा's picture

21 May 2012 - 8:10 pm | पैसा

छान कविता.