बेस्ट फ्रॉम वेस्ट

jaypal's picture
jaypal in कलादालन
9 May 2012 - 9:24 pm

एका टिकाउ बायकोचा टाकाउ परंतु टिकाउ परकर घ्यावा. हा असा

parkar1

नाडीच्या बरोबर अपोझिट साईडच्या ओपनिंगला चांगल्या टेलर कडुन कचकचीत टिकाउ टिप मारुन घ्या.
आता या पोतडी मधे अपापल्या आवडीचे किंवा नावडीचे (किंवा पुर्वी सारखे ;-)अडगळीचे)सामान सवडीने भरा. म्हणजेच त्या परकराला गत वैभव प्रप्त करुन द्या. मी सध्या गहु भरुन ठेवले आहेत.

parkar2

हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.चुकभुल माफी असावी. सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो

मांडणीगुंतवणूकराहती जागाजीवनमानभूगोलशिक्षणमौजमजाछायाचित्रण

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

9 May 2012 - 9:51 pm | अत्रुप्त आत्मा

छान भरलत हो पोत्यात ;-)

@मी सध्या गहु भरुन ठेवले आहेत.>>> :-D बेक्कार हसतोय.

पैसा's picture

9 May 2012 - 10:55 pm | पैसा

मला वाटलं बायकोलाच पोत्यात भरलंत की काय!

Madhavi_Bhave's picture

10 May 2012 - 11:18 am | Madhavi_Bhave

आपला उत्तम प्रतिसाद. वाचल्याबरोबर एकदम खळळकण हसू आले.

सहज's picture

10 May 2012 - 7:44 am | सहज

>सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो

काय "ग-धाग्या" पासुन गळफास? :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 May 2012 - 8:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> सदर प्रयत्न आवडल्यास अजुन काही सुचवीन म्हणतो

स्त्री-पुरुषांच्या अंतर्बाह्य वस्त्रांवर असेल तर नको रं बाबा.......! :)

-दिलीप बिरुटे

:)

जबरी...

बादवे... एखाद्याची बायको प्रचंड उंच असल्यास तंबोर्‍याची गवसणीही बनू शकेल..

jaypal's picture

10 May 2012 - 10:46 am | jaypal

गवसणी न घालता व्यक्त झालात त्या बद्दल धन्यवाद.
असेच दिवसंदिवस नवनविन घुमारे फुटुद्यात. ;-)

विजुभाऊ's picture

10 May 2012 - 11:21 am | विजुभाऊ

कमंडलु , चंची , गोमुखी ( जपमाल ठेवायची पिशवी) हे करण्या साठी कोणती वस्त्रे वापरावीत?

परिकथेतील राजकुमार's picture

10 May 2012 - 11:52 am | परिकथेतील राजकुमार

जयप्या लेका, हा प्रतिसाद बघून 'परकरात ब'शिवला' असा नवा शब्दप्रयोग आंतरजालावरती रूढ व्हायला हरकत नाही.

तर जयपालनं भलतीच `वेस्ट' दाखवली! (आणि तीही कलादालनात)

jaypal's picture

10 May 2012 - 6:38 pm | jaypal

आपापली कला दाखवायची हीच एक हक्कची जागा आहे हो. काय म्हणता ? ;-)

काय म्हणता ?

= नाडीनं फार घोळ घातल्यानं इलॅस्टिक वापरायचं ठरलं होतं ना मागे?

स्पा's picture

10 May 2012 - 3:13 pm | स्पा

=))=))

=))

=))

=))

=))

=))

=))

=))

गपे :D
अशी विडंबन नको रे... :D

नाना चेंगट's picture

10 May 2012 - 3:42 pm | नाना चेंगट

अच्छा हे वेस्ट होय ... आम्हाला वाटले की लो वेस्ट चे काही नमुने दाखवत आहात

हा देखिल म्हटल तर लो वेस्टचाच नमुना आहे. जहाँ पन्हा तुफु कुबुल करो.

मनराव's picture

10 May 2012 - 3:47 pm | मनराव

:D :D :D

बेस्ट.....

मितभाषी's picture

10 May 2012 - 4:36 pm | मितभाषी

=)) =))

इरसाल's picture

10 May 2012 - 4:39 pm | इरसाल

.

प्यारे१'s picture

10 May 2012 - 4:49 pm | प्यारे१

अरे जानवं घातलेला कुणी कोंबलेला दिसतोय त्या पोत्यात. इम्प्रेशन आलंय बघा! ;)

ते जानव्याचं इम्प्रेशन ?? आँ?

अरे गायीच्या कासर्‍याएवढं जाड असतं का रे जानवं..???

jaypal's picture

10 May 2012 - 6:43 pm | jaypal

आत मधे किती सामान (ठासुन) भरता येत होत /आहे हेच सपश्ट दिसुन येतय.

स्वातीविशु's picture

10 May 2012 - 5:01 pm | स्वातीविशु

टाकाउ (वेस्ट) मधून टिकाऊ (बेस्ट). :D गहु भरण्याची आयडिया चांगली आहे. :)

लेखाचे नाव, पुर्ण लेख आणि प्रतिसाद वाचून हसून हसून मुरकुंडी वळली आहे. :D

अवांतरः हसवणूक असे एक सदर मिपावर चालू करण्याचा प्रस्ताव करायचा आहे. कुणाला सांगावे बरे? ;)

प्यारे१'s picture

11 May 2012 - 10:08 am | प्यारे१

>>>अवांतरः हसवणूक असे एक सदर मिपावर चालू करण्याचा प्रस्ताव करायचा आहे. कुणाला सांगावे बरे?

नको. एकदम नामंजूर. :)

अशानं हसवणूक मध्ये जाऊनच हसावं लागेल. विनोदी सेरियल मध्ये लावलेल्या टिपिकल लाफ्टरसारखं. इकडं प्रेक्षकांच्या चेहर्‍यावरची रेष देखील बदलत नाही.
त्यापेक्षा अत्यंत गंभीर विषयांवर चाललेल्या अनेक चर्चा, लेख, प्रतिसाद आपल्याला कधी अनपेक्षितपणं हसवतील ते सांगता यायचं नाही. अवांतरानं येणारी मजा अधिक असते.
आणि हे असं अनपेक्षित समोर आल्यानं अधिक उत्स्फुर्तता येऊन होणारा विनोद हा जास्त आवडतो...!

स्पंदना's picture

11 May 2012 - 7:04 am | स्पंदना

हे बघा या प्रकारात फक्त एकच प्रकाराच सामान भरत येत. जर तुम्ही विजार अशी वेष्ट साइड बंद करुन वापरलीत तर एका वेळी दोन वेगवेगळ्या प्रकारचे सामान भरायला मदत होइल.अन एका दमात उचलायला ही जमेल. मी नविन सुचलेला प्रकार करुन दाखवाल का?नाही काय आहे मला फॉटू नाय जमत हो म्हणुन.

आयला मी चार्दा प्रकार म्हणाले????????

संजय क्षीरसागर's picture

11 May 2012 - 8:35 am | संजय क्षीरसागर

वेस्ट साइड बंद केली आणि सामान भरलं तर दोन पाय दोन दिशांना जाऊन अनावस्था प्रसंग ओढवेल.

निवेदिता-ताई's picture

11 May 2012 - 9:11 am | निवेदिता-ताई

:bigsmile:

प्रास's picture

11 May 2012 - 2:16 pm | प्रास

हे भारी प्रकर्ण निघालं ब्वॉ..... :-)

टाकावूतून टिकाऊ म्हणताय, गहू पोत्यापेक्षा यात जास्त टिकतील की काय? ;-)

संजय क्षीरसागर's picture

11 May 2012 - 4:43 pm | संजय क्षीरसागर

हे नव्या परकराचं पोतं केलंय.

पहिल्या फोटोत वेगळाच रंग आहे, फक्त नाडी सेम ठेवलीये दोन्ही फोटोत; त्यामुळे हा नाडीग्रंथ असून पब्लिकवर नजरबंदीचे प्रयोग चालू आहेत असं वाटतं.

वाह वाह जयपालजी !! क्या बात !!