पुणे सोलापुर रोडवर, बारामतीच्या अलिकडे २५ कि.मी.हे गाव आहे. भिमा नदी वरील धरणाच्या बेकवॉटर च्या परीसरात असंख्य पाणपक्षी येतात. ठाण्यातील आम्ही १० जण होळीच्या दिवशी पहाटे निघालो होतो.
माझ्या निकॉन ७०-३०० लेन्स बुरशी मुळे धुसर झाली होती. म्हणुन मग अवांतर जे टिपल ते आपल्या समोर सादर.
१)फाटक्या संसाराच्या जाळयाला ठिगळ लावताना कोळी जोडप.
२)
३)
प्रतिक्रिया
19 Mar 2012 - 7:06 pm | यकु
>>>माझ्या निकॉन ७०-३०० लेन्स बुरशी मुळे धुसर झाली होती
---- म्हणजे ती किडे टिपायला वापरता ती काय? तसं असेल तर ती दुरुस्तच करुन घेऊ नका.. ;-)
हे फोटो लै म्हणजे लैच भारी आलेत !
19 Mar 2012 - 7:13 pm | jaypal
तुम्हाला आमचे किडे पसंत नाहीत का ? ;-)
19 Mar 2012 - 7:19 pm | यकु
नाय हो.. तसं नाही..
हे लय भारी वाटलं त्यापेक्षा, किडे काय बघायचे न्हेमी न्हेमी ;-)
19 Mar 2012 - 7:43 pm | पैसा
तर कॅमेरा तसाच राहू दे! हे फोटोही मस्त आहेत!
19 Mar 2012 - 7:56 pm | शैलेन्द्र
शेवटचे दोन आवडले..
लेन्सवर बुरशी म्हणजे जरा कठीण काम..
कोणता कॅमेरा?
19 Mar 2012 - 7:56 pm | प्रास
बुरशीभरल्या लेन्सनी असे भन्नाट फोटो येत असतील तर.....
19 Mar 2012 - 8:03 pm | गणपा
बर्याच दिवसांनी दिसलासा बा?
बाकी सध्या फोटो दिसत नसल्याने त्याबाद्दल बोलणे नाही. :)
19 Mar 2012 - 8:34 pm | पैसा
तू गणपाच ना की गणेशा?
19 Mar 2012 - 11:38 pm | अत्रुप्त आत्मा
@तू गणपाच ना की गणेशा?>>>
नाही गणपाचा (फोटू दिसण्यात) ---श्रीगणेशा ;-)
20 Mar 2012 - 9:25 am | अमृत
घरी गेलो की फोटो बघून प्रतिक्रिया देइल.
बाकी ३च फोटो का एका धाग्यात?
अमृत
20 Mar 2012 - 10:02 am | आत्मशून्य
पट्या नही. कारण फोटोत जे काही दिसतय त्यात कोळीणीची प्रसन्न हास्यमुद्राच किती बोलकी आहे :) की एकवेळ जाळं फाटकं असेलही पण तीचा संसार नाही. :p
20 Mar 2012 - 11:00 am | चिमी
पिकासा वरुन अपलोड करावे म्हणजे आम्हालापण बघता येतील.
4 Apr 2012 - 7:09 pm | मी-सौरभ
चिमी शी सहमत
20 Mar 2012 - 2:25 pm | प्यारे१
जयपालशेट चे फोटो म्हणजे क्या बात क्या बात क्या बात!
अवांतरः दबंग च्या शुटींगवेळी पण लेन्सला माती का काय लावून थोडा वेगळा रंग आणला गेलाय म्हणे.
5 Apr 2012 - 1:22 pm | श्रावण मोडक
दुसरे प्रकाशचित्र दृष्टीपेक्षाही मन अडकवून ठेवणारे आहे.
5 Apr 2012 - 6:34 pm | परिकथेतील राजकुमार
जयपा भावा अल्टिमेट फटू आहेत रे.
पण फक्त ३ का ? ३ तिगाडा काम बिगाडा. ;)