http://www.misalpav.com/node/21045#comment-381773
समुद्र का विहिर...? बेडकं का खेकडे..? या नस्त्या व्यापाला कटाळुन, जरा नाचगानं करुन शीन घालवावा,,,म्हंन्तो... या मंग करु वाईच डोस्कं ग्गार...
(चाल--- पाडाला पिक्कलाय अंबा...)
सोडलं हो...आता सोडलं हो...आता सोडलं हो,सोडलं भसाभसा पानी
हो...ओ...सोडलं भसाभसा पानी,,,ध--नाजी राव पाटाला भसाभसा पानी ॥धृ॥
धागा ह्यो पडला थंड ,बॉडीत होईल बंड ... ओ धनाजी...
थंड कसा पडला जी,,हो ओ,, थंड पडला कसा जी... ओ पाटिल...
सोडा ना लवकर पानी... ध--नाजीराव सोडा ना भसाभसा पानी.. ॥१॥
कुनाची कापडं काडुन कुनी, दुसर्याची धुतात फुकट धुनी...ओ धनाजी...
हौदात ओढा यांना जी...हो ओ, हौदात ओढा यांना जी...घ्या मंग ;-) ...
सोडा ना लवकर पानी... ध--नाजीराव सोडा ना भसाभसा पानी.. ॥२॥
अवो,कंचा समुंदर नी विही..रं जी, समदीकड सोडायचं पानीच जी... ओ पाटिल
भिजवा यांना गच्च जी...हो ओ,भिजवा यांना गच्च जी... ओढा की... ;-)
ओढा ना लवकर खाली... ध---नाजीराव ओढा ना लवकर खाली...॥३॥
भां--डा--न..करुन कोनी,आपल्या गोडाऊनला आपल्या गोनी...
दर्रोज टेचुन भरा जी...हो ओ,...दर्रोज टेचुन भरा जी.... फेका मंग
पान्यात सडक्या गोनी... ध---नाजीराव पान्यात सडक्या गोनी...॥४॥
दुसरी तुंम्मी घेतलीया--खोली,कशाला मराया येतासा खाली... हो खाली ;-)
काड्या लावायला जी...हो ओ,काड्या लावायला जी... अबे हाड....
फेकलं तिकडं पुन्हा हाड जी...चल्ल निघ...फेकलं तिकडं पुन्हा हाड जी॥५॥
गाऊ दे आंम्माला गानी,...पंच्मीला फेकू रंगाचं पानी... ओ धनाजी
एका-मेकावर जी हो..ओ...खेळिमेळिनं जी... ध--नाजीराव....
बडवा लिहुन यांना गानी...यांच्यावर....बडवा लिहुन यांना गानी॥६॥
०====०====०====०====००====०====०====०====००====०====०====०====००====०=
प्रतिक्रिया
18 Mar 2012 - 4:22 pm | सांजसंध्या
एक धमाल गीत म्हणून एंजॉय केलं.. :)
18 Mar 2012 - 4:29 pm | यकु
अरं माज्या सर्ज्या तू रं .. अरं रामा तू रं.. माज्या धन्या तू रं.. जी ऽऽ रामा अहाऽऽ !
;-)
18 Mar 2012 - 4:42 pm | प्रचेतस
गेल्या काही दिवसांत झालेल्या विडंबनाच्या भडीमारामुळे , नवकवींना झालेल्या मानसिक त्रासामुळे आम्ही मिपाचे कसलेले विडंबनकार श्री अत्रुप्त आत्मा यांची टोपी उडवण्याचा चुकार प्रयत्न करत आहोत.
भटजीबुवा आम्हांस मोठ्या मनाने माफ करतीलच, तसेही आम्ही कविता कधीच करत नसल्याने परतफेडीची संधी आम्ही त्यांना उपलब्ध करून देणार नाहीच. आम्ही त्यांच्या ऋणात राहणेच पसंत करू. :P
सोडली हो..आता सोडली हो..आता सोडली हो, सोडली ही तोंडातली गुळणी
हो...ओ...सोडली ही तोंडातली गुळणी...ओ भटजी झाली हो मोकळी वाणी ॥धृ॥
पडलंय विडंबन थंड, नवकवींनी केलय बंड...ओ भटजी..
थंड कसे पडलात जी,,हो ओ,, थंड कसे पडलात जी जी... ओ बुवाजी
सोडा ना लवकर गुळणी..हो भटजी करा हो मोकळी वाणी..॥१॥
कुनाच्या कविता फाडून तुमी, कवितांची पेटवून जोरात धुनी.. ओ भटजी
ट्याम्पोत यांना बसवा जी..हो ओ, ट्याम्पोत यांना बसवाजी. चुळका मंग..
सोडा ना लवकर गुळणी..हो भटजी करा हो मोकळी वाणी..॥२॥
अवो कंच काव्य अन विडंबन जी, कवीचीच सगळी प्रतिभा ती...ओ बुवाजी
काव्यात डुंबवा यांना अगदी जी...हो ओ, डुंबवा यांना अगदी जी, बुडवा की...
लावा हो लवकर चाली...भ---टजीबुवाजी लावा हो लवकर चाली...॥३॥
विडंबन पाडून कोणी, आपल्या प्रतिभेची वाजवतंय तुणतुणी....
दररोज खच्चुन करा जी..हो ओ...दररोज खच्चुन करा जी..भरा मंग
मिपात विडंबनाची गोणी...भ--टजीबुवा मिपात विडंबनाची गोणी...॥४॥
दुसरं झाड तुम्ही धरलाया..कशाला नवकवींना छळताया. आवरा जी...
संपादकांचा बसलाय दट्ट्याजी..हो ओ. बसलाय जोरात दट्ट्याजी...शांत व्हा
त्रासवू नका कवींना जी...शांत व्हा.. त्रासवू नका कवींना जी.. हो आता जी॥५॥
रचू दे कवींना कविता..जी..नका फेकू इडंबनाचं पानी हो. जी...ओ भटजी
त्यांच्यावर जी हो..ओ. खेळीमेळीमं रहा आता जी..हो भ-टजीबुवा...
लिहा आता साथीनं गानी...यांच्यासंगे लिहा आता साथीनं गानी..॥६॥
सोडली हो..आता सोडली हो..आता सोडली हो, सोडली ही तोंडातली गुळणी
हो...ओ...सोडली ही तोंडातली गुळणी...ओ भटजी झाली हो मोकळी वाणी
18 Mar 2012 - 4:44 pm | अन्या दातार
अरे यांनाही सोडलं नाहीत का तुमच्या विडंबन दट्ट्यातून? कमाल आहे.
18 Mar 2012 - 4:46 pm | प्रचेतस
छे छे.
भट़ईबुवा आमचे मैतर आहेत. मित्राला दिलेली ही छोटीशी भेट समजा. :)
18 Mar 2012 - 4:48 pm | पैसा
रुमाल आणारे!
18 Mar 2012 - 4:50 pm | प्रचेतस
छे छे.
याखेपी आमचे डोळे अजिबात पाणावलेले नाहीत.
18 Mar 2012 - 4:53 pm | यकु
पेंढारीही रूमाल वापरायचे म्हणे वल्ली बोवा..
सावध रहा तुम्ही दोघेही.. ;-)
18 Mar 2012 - 4:55 pm | प्रचेतस
गेला तो जमाना, उरल्या त्या आठवणी.
18 Mar 2012 - 6:43 pm | अत्रुप्त आत्मा
आजच्या दिवसांत झालेल्या या विडंबनाच्या चुकार-मार्यामुळे , आमच्या सारख्या नुकत्याच तयार झालेल्या विडंबकांना घडविलेल्या या नम्र- त्रासामुळे आम्ही मिपाचे त्रासदायक छुपे विडंबनकार श्री वल्ली उर्फ आग्यावेताळ :-p यांना पुणेरी पगडी घालण्याचा सज्जन प्रयत्न करत आहोत.
अग्यावेताळ आम्हांस त्यांच्या कसलेल्या मनाने माफ करतीलच, तसेही त्यांनी आजच ''ही'' कविता केली असल्याने परतफेडीची संधी आजच्याशिवाय दुसरी उपलब्ध होणार नाहीच... त्यामुळे आम्ही त्यांना हे ऋण-विमोचक गीत आज देणेच पसंत करू. ;-) (उलटा आहेर करायला चुकलो,तर मी पुणेकर कसला..? :-p )
वल्ली हो,आहो वल्ली हो,आहो वल्ली हो...वल्ली आग्यावेताळ वल्ली...हो ओ..वल्ली आग्यावेताळ वल्ली..
सुटले हो अमच्यावर वल्ली,लैच जरा-सुटले हो अमच्यावर हल्ली॥धृ॥
पाडलय विडंबन थंड,आमच्याशी केलया बंड...ओ वल्ली
बंड कसं केलया जी..हो ओ..बंड कसं केलया जी ...ओ वल्ली..
सुटले हो अमच्यावर वल्ली,लैच जरा-सुटले हो अमच्यावर हल्ली॥१॥
आमच्या कविता पाडुन तुंम्ही, कविंचे व्हायला जाताय धोणी...ओ वल्ली
स्टंपात यांना-बसवा जी..हो ओ...विकेट किपिंग करा जी... जा मागे :-p
सुटले हो अमच्यावर वल्ली,लैच जरा-सुटले हो अमच्यावर हल्ली॥२॥
आमचं काव्य हायेच थ्रीजी,..तुमचं जुनं ते सुधारा टू जी...ओ वल्ली
डुंबुन मरा त्यातच जी...हो ओ...डुंबुन मरा त्यातच जी...-बुडा की
सुटले हो अमच्यावर वल्ली,लैच जरा-सुटले हो अमच्यावर हल्ली॥३॥
आगीचा बंब ओढुन कोणी,आमच्यावर फेकतो निखार्यांच्या गोणी... हा वेताळ :-D
जाऊ तिथे मारतो जी..हो ओ..जाऊ तिथे मारतो जी... याला धरा मंग :-p
अग्यावेताळं हा वल्ली,लवकर धरा-अग्यावेताळं हा वल्ली॥४॥
ह्ये काय येड तुमी नवं धरलया,संपादकानी आंम्हा कवा मारलया...? दाखवा ना..? ;-)
आगलावी कमी करा जी...हो ओ... आगलावी कमी करा जी... आवरा.. !
सुटले हो अमच्यावर वल्ली,लैच जरा-सुटले हो अमच्यावर हल्ली॥५॥
जगू दे आंम्हा विडंबकांना... चुकलं तर काय त्रास हो तुम्हाला..?
त्यांचा<>आमचा मामला जी... हो ओ...त्यांचा<>आमचा मामला जी... नाक खुपसे
आमच्यात हल्ली हा वल्ली...ओ संपादक..आमच्यात हल्ली हा वल्ली॥६॥
वल्ली हो,आहो वल्ली हो,आहो वल्ली हो...वल्ली आग्यावेताळ वल्ली...हो ओ..वल्ली आग्यावेताळ वल्ली..
सुटले हो अमच्यावर वल्ली,लैच जरा-सुटले हो अमच्यावर हल्ली॥धृ॥
18 Mar 2012 - 7:53 pm | सांजसंध्या
अशक्य हसतेय .....!!
बास करा हो.. मरून जायचं एखादं हसून हसून
18 Mar 2012 - 7:55 pm | मोदक
:-D
18 Mar 2012 - 11:34 pm | प्रचेतस
आमच्या चुकार विडंबनामुळे वैतागून आत्माजींनी केलेल्या विडंबनाद्वारे ही आम्हाला दिलेली एक कॉम्प्लीमेंट आहे असे आम्ही समजतो.
या विडंबनाचेही परत विडंबन करण्याचा आमचा उद्देशही नाही. तसाही उद्देश आधीच सफल झालेलाही आहे. ;)
19 Mar 2012 - 11:37 am | अन्नू
आवरा आवरा ओ भटजी!!!
18 Mar 2012 - 4:49 pm | सांजसंध्या
एक से बढकर एक आहेत दोघेही !
18 Mar 2012 - 5:26 pm | सूड
'पाडाला पिकलाय आंबा'ची चालच शिंची आठवत नाहीये. एकदा गाणं ऐकून मग कविता वाचावी म्हणतो.
18 Mar 2012 - 6:50 pm | धन्या
अगागा... काय ते शिघ्र कवित्व.
दादा कोंडकेंचा वारसा आमचे तरुण तडफदार कवी पाषाणभेद नाशिककर (सातपूर यमायडीशीवाले) चालवत होते. आपणही त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन चालत आहात हे पाहून आनंद वाटला. शाहीरांच्या "ढगाला लागली कळ" च्या नावाने बोटे मोडणार्यांच्या पुढची पीढीची "ढगाला लागली कळ" च्या रीमिक्स शिवाय पावलं थिरकत नाहीत. असो.
या तुमच्या काव्याच्या निमित्ताने श्री. लेण्याद्री गडकरी यांनीही आपले बोरु तासून पुन्हा एकदा दौतीत बुडवले आहे. ;)
18 Mar 2012 - 7:11 pm | चौकटराजा
मी तुम्हाला कालच्या प्रत्यक्ष भेटीतच म्हणालो होतो " टिंगल खोरी वा टवाळी सुद्धा " आणि विडंबन (आणि विम्बल्डन सुद्धा ) ही येरा गबाळाची कामे नाहीत.त्याला फार टॅलण्टेट ब्रेन असावा लागतो.
.तुम्हाला दोघानाही पुढ्च्या भेटीत साक्षात पायावर नाक ( स्वच्छ असतानाच ) घासून दंडवत घालणेत येईल.
18 Mar 2012 - 11:55 pm | अत्रुप्त आत्मा
@.तुम्हाला दोघानाही पुढ्च्या भेटीत साक्षात पायावर नाक ( स्वच्छ असतानाच ) :-D घासून दंडवत घालणेत येईल.>>> स्विकारासाठी अधिर आहोत... आलोच...!
18 Mar 2012 - 11:57 pm | प्रचेतस
:)
18 Mar 2012 - 9:10 pm | पक पक पक
१) भट्जी बुवा ______/\_____ साष्टांग नम्स्कार
२) वल्लीबाबा उर्फ आग्यावेताळ ______/\_____ कोपरा पासुन दंडवत
३) भट्जी बुवा __________ आता बास ना राव पोट, पाठ,बरगड्या,कंबर सगळ दुखायला लागल्य हो.....///\\\.....
:bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
:bigsmile: :bigsmile: :bigsmile:
19 Mar 2012 - 8:34 am | स्पा
कंपूबाजान्कर्ता कंपूबाजांनी काढलेला एक धागा ;)
त्यातही एकमेकांवर केलेला विडंबनांचा क्षीण प्रयत्न
गुर्जी आवरा आता
19 Mar 2012 - 8:57 am | प्रचेतस
प्रकाटाआ
19 Mar 2012 - 10:14 am | अत्रुप्त आत्मा
@कंपूबाजान्कर्ता कंपूबाजांनी काढलेला एक धागा >>> कैच्याकै उगाच...! उलट हा धागा एका निराळ्याच कं-पू ची भाजी करण्याकरिता काढलेला होता... ते कळत/माहित असुनही हा कंपुवि-रहित पर्तिसाद बघुन ड्वाले पाणावले ;-)
@त्यातही एकमेकांवर केलेला विडंबनांचा क्षीण प्रयत्न>>> तो कसाही का असेना,आणी आपल्याला क्षीण वाटुन काय उपयोग... वर बाकिच्यांनी कित्ती लाइक केलाय ते पहा की..? :-p
@गुर्जी आवरा आता>>> मुळात पसाराच झालेला नाहिय्ये... चल हट.. चल हट.. चल हट..
19 Mar 2012 - 11:40 am | निश
मित्रा अत्रुप्त आत्मा व वल्लि साहेब तुम्हि दोघहि भन्नाट आहात.
खरच मस्त लिहिल आहेत तुम्हि.
एक मेकांवर जे तुम्हि विडंबन केल आहेत ते मस्त आणि हो अत्रुप्त आत्मा is back with bang.
लय भारी मस्त भन्नाट सुसाट बुंबाट...
19 Mar 2012 - 4:47 pm | मूकवाचक
__/\__