✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

निवडणुक...

अ — अत्रुप्त आत्मा, Sat, 02/25/2012 - 05:13
सुकलेला का होइना..?पण कुणीसा गाडीला घातला होता गजरा या निमितानी मी माझ्या.. गाडीलाच केला मुजरा काय सालं नशिब हीचं..? पाहिलं तरी फिदा होतात आंम्ही कडक कपडे घालतो तेंव्हा,कोण जाणे या कुठे जातात..? जरी असल्या या आजुबाजुला तरी, नळाला पाणी यावं तश्या बोलतात आल्याच समोर तर नंतर मग, मागे जाऊन कुजबुजतात. ''हँडसम दिसतोय गं...हम्म्म्म, पण कपड्याचा चॉइस बरा नाहीये दिसतोय जॉन अब्राहम सारखा.., पण अ‍ॅटिट्यूट काही खरा नाहीये..'' ''ए,,तुला काय करायचाय अ‍ॅटिट्युट..? नुसतं नाव विचार ना..?'' ''शी...!नाव काय विचारायचं..? त्यापेक्षा डायरेक्ट फोन नंबर घे ना..!'' असे पिछाडीला संवाद घडुन सैन्य आघाडीला येतं आणी.''तुंम्ही काय करता..?'' असं विचारुन, आल्या पावली निघुन जातं. मग मला म्हणावं लागतं आपल्या चेहेर्‍याचं वय झालय जे प्रेम गच्चीवर यायचं.., ते अता गाडीवर आलय..! वयाबरोबर कळत जातात प्रेमामधले सावध खेळ म्हटलयच कुणीतरी..प्रेमाला, जमला तर चिवडा,नायतर सगळीच भेळ..! अता त्यांच्याच विचारण्यावर र्‍हायलो तर उरलेलं वयही सरेल इकडे पडत र्‍हातील कविता आणी तिकडे गाडीच गजर्‍यांनी भरेल त्यामुळे मीही आता स्त्रीपक्षात जोरदार लॉबींग करणार आहे यावर्षी काहिही होवो..पण निवडणुक मात्र जिंकणार आहे.. ;-)

प्रतिक्रिया द्या
2171 वाचन

💬 प्रतिसाद (7)

मस्तच

प्रचेतस
Sat, 02/25/2012 - 09:02 नवीन
आता आत्म्यांमध्येही विलेक्शनचे वाहू लागले वारे, आपापली झाडे सोडूनी एकत्रच जमा झाले सारे. जिंकणे फड निवडणुकीचा हाच लागला त्यांना ध्यास, अतृप्तीकडून तृप्तीकडे सुरु झाला त्यांचा प्रवास. :P
  • Log in or register to post comments

व्वा वल्लीदा जबरदस्त भारी

लीलाधर
Sat, 02/25/2012 - 09:07 नवीन
याउपर काही बोलणे नाही..... मुकवाचक केलेत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@अतृप्तीकडून तृप्तीकडे सुरु

अत्रुप्त आत्मा
Sat, 02/25/2012 - 16:17 नवीन
@अतृप्तीकडून तृप्तीकडे सुरु झाला त्यांचा प्रवास. >>> :-D तुला माझ्या अत्रुप्तीची चव लगेच कळते रे...! तूही अजुन तसाच आहेस,कुंडली आपली जुळते रे... :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तुमची निशाणी काय असणार आहे????

लीलाधर
Sat, 02/25/2012 - 09:20 नवीन
एखादी स्मायली टाका डकवून कळुदे तरी तुमची निशाणी? आणि हो येणार्या निवडणूकीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि तुमचे घोषवाक्य काय असणारे : ताई माई अक्का विचार करा पक्का आणि भ्रष्टाचाररुपी राजकारणात असणार्या नरभक्षक आत्म्यांचा करा खात्मा.....
  • Log in or register to post comments

@आणि तुमचे घोषवाक्य काय

अत्रुप्त आत्मा
Sat, 02/25/2012 - 16:20 नवीन
@आणि तुमचे घोषवाक्य काय असणारे : >>> ताई,माई,अक्का इचार करा पक्का अनेकांना मिळाले श्री-खंड,मला किमान द्या चक्का.. :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

वल्लीबाबा

पक पक पक
Sun, 02/26/2012 - 22:32 नवीन
वल्लीबाबा _____/\_____ अत्रुप्त आत्म्या _____/\_____
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@वल्लीबाबा>>> ह्ही ह्ही ह्हा

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/27/2012 - 22:22 नवीन
@वल्लीबाबा>>> ह्ही ह्ही ह्हा ह्हा ह्हा...! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा