हिर्‍यांचे हार

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in कलादालन
25 Nov 2011 - 11:33 pm

सकाळच्या कोवळ्या उन्हात लुसलुशीत गवतावर फिरत असताना अचानक पायाशी एका गवतहीन भागात एक सुबक जाळे दिसले.

shoot

निरखुन पाहता लक्षात आले की सूक्ष्म दवबिंदुंनी जाळ्याचे धागे पूर्णतः आच्छादले गेले आहेत. प्रत्येक थेंब सुबक गोलाकार पैलु न पाडलेल्या पण उपजतच गोलाकार असलेया हिर्‍यासारखा आणि जाळ्याचा प्रत्येक धागा हिर्‍याच्या हाराच्या एकेका पदरासारखा. जसजसा प्रकाश त्या जाळ्यावर खेळु लागला. तसतसे त्या हिर्‍यांचे तेजही खुलत गेले.

टिपताना लक्षात आलेच नव्हते, पण प्रतिमा पडद्यावर पाहताना उमगले; अरे, ते हिरे जडवुन हार गुंफणारा जवाहिरी तर तिथेच होता.

n3

n1

n2

n4

n5

n6

n7

चला, तेवढीच घटकाभर चैन. मला आपले हेच हिरे परवडणारः)

मौजमजाछायाचित्रण

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Nov 2011 - 11:35 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त!

जागु's picture

25 Nov 2011 - 11:41 pm | जागु

अप्रतिम

शिल्पा ब's picture

26 Nov 2011 - 12:26 am | शिल्पा ब

वाह!!
शिर्षक वाचुन लगबगीने आले अन हे हार पाहुन छान वाटलं.

पाषाणभेद's picture

26 Nov 2011 - 2:10 am | पाषाणभेद

मी पण फसलो. खरे हिरे तर परवडणारे नाही त्या पेक्षा हिर्‍यांचे हार तरी पाहू असे म्हटले तर येथे एका कोळीणीने हार घातलेला!
:-)

श्रावण मोडक's picture

26 Nov 2011 - 12:38 am | श्रावण मोडक

मस्तच!

चिंतामणी's picture

26 Nov 2011 - 12:59 am | चिंतामणी

फारच छान.

(शिर्षक वाचुन वाटले की तिरूपतीला कोणीतरी हि-याचे दागीने दान पेटीत टाकले आहेत. त्या विषयी काही आहे की काय.) ;) ;-) :wink:

कुंदन's picture

26 Nov 2011 - 12:59 am | कुंदन

अप्रतिम

गणपा's picture

26 Nov 2011 - 2:46 am | गणपा

सारे शब्द खुजे आहेत या पुढे.
सर्वसाक्षी हा मौल्यवान खजिना आमच्या सोबत शेअर केल्या बद्दल धन्यवाद.

छोटा डॉन's picture

26 Nov 2011 - 1:22 pm | छोटा डॉन

हेच म्हणतो.
ह्या निसर्गाच्या कलाकृतीपुढे खर्‍या हिर्‍यांचीही काय औदाक आहे ?

फोटो फार आवडले :)

- छोटा डॉन

निवेदिता-ताई's picture

27 Nov 2011 - 7:26 pm | निवेदिता-ताई

असेच म्हणते

चित्रा's picture

26 Nov 2011 - 3:22 am | चित्रा

फारच सुंदर. धन्यवाद.

बौद्धांच्या लेखनात एक कल्पना आहे - इंद्राच्या रत्नांची. त्याची प्रकर्षाने आठवण झाली.

http://en.wikipedia.org/wiki/Indra%27s_net

चतुरंग's picture

26 Nov 2011 - 8:07 am | चतुरंग

परवाच तुमचे दवबिंदूंचे फोटू बघितल्यावर माझा मुलगा म्हणालाच होता की बाबा स्पायडरवेबवरती असलेले थेंब फार छान दिसतात आणि आज तुमचे तेही फोटू हजर, क्या बात है!
अतिशय मनोहारी किमया फार उत्तम प्रकारे कॅमेर्‍यात बंदिस्त केली आहेत. अभिनंदन!

-कोळीरंगा

इन्दुसुता's picture

26 Nov 2011 - 9:17 am | इन्दुसुता

The best things in life are free. पूर्वी माझ्या घराच्या खिडकीतून शेजारच्या छपरावर पावसानंतर असेच अनेक हिरे दिसत. तेव्हा माझ्या आयुष्यातील खरी श्रीमंती जाणवली.... हे हिरे / हा खजिना मझ्याकडुन कोण चोरु शकणार?

तुमचे हिर्‍यांचे हार अतिशय आवडले.

विलासराव's picture

26 Nov 2011 - 9:38 am | विलासराव

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Nov 2011 - 9:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लैच भारी आले राव फोटो. सुंदर.

-दिलीप बिरुटे

यकु's picture

26 Nov 2011 - 10:04 am | यकु

क्यूट!!!

किसन शिंदे's picture

26 Nov 2011 - 11:40 am | किसन शिंदे

दुसरा शब्दच नाही..

शेवटून दुसरा फोटो जाम आवडलाय.:)

प्यारे१'s picture

26 Nov 2011 - 11:47 am | प्यारे१

सुंदर....
सुप्परलाईक !

अवांतरः 'चला आता कोळी शोधणं आलं' असं कोणी म्हणतंय का? ;)

नितिन थत्ते's picture

26 Nov 2011 - 11:52 am | नितिन थत्ते

मस्त

परिकथेतील राजकुमार's picture

26 Nov 2011 - 12:28 pm | परिकथेतील राजकुमार

ज ब रा ट !

राजघराणं's picture

26 Nov 2011 - 12:41 pm | राजघराणं

जय हो

कच्चा पापड पक्का पापड's picture

26 Nov 2011 - 3:13 pm | कच्चा पापड पक्क...

अप्रतिम ....!!

पण एक सांगा , तुमचा फोटो काढताना ..फोटो कोणी काढला?

मिहिर's picture

26 Nov 2011 - 6:15 pm | मिहिर

मस्तच! फोटो खूप आवडले.

पैसा's picture

26 Nov 2011 - 7:25 pm | पैसा

अशी हिर्‍याच्या हारांची कारागिरी कोणा माणसाला शक्यच नाही!!

५० फक्त's picture

26 Nov 2011 - 9:17 pm | ५० फक्त

मस्तच रे मस्त एकदम

धनंजय's picture

26 Nov 2011 - 10:28 pm | धनंजय

मस्तच

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2011 - 1:30 am | अत्रुप्त आत्मा

हायक्लास,फर्मास, झक्कास....तुमच्या निरिक्षण शक्तीला सलाम .डोळ्यांचं पारणं फिटलं बघुन

वा! सर्वसाक्षीजी मन प्रसन्न केलेत!! तुम्हाला जगाकडे पाहण्याची अलौकिक दृष्टी आहे.

गवतात कोळियाने, विणले सुरेख जाळे ।
सावज तयात यावे, आशा मनात पाळे ॥ धृ ॥

थंडीत पहाटेच्या दव, साखळून आले ।
सावज बनून थेंबही, जाळ्यात कैद झाले ॥ १ ॥

अडकून बिंदू शतशः, झुंबर तयार झाले ।
कोवळ्या उन्हात तेजे चमकून रत्न झाले ॥ २ ॥

ते रत्नहार सारे, जाळ्यास भार झाले ।
चिंतीत कोळी झाला, सावज फरार झाले ॥ ३ ॥

मग रत्न-पारखाया, एक “सर्वसाक्षी” आला ।
दृश्यास जोखणारा, एक जवाहीरा मिळाला ॥ ४ ॥

उकलून एक एक, पृथक पदर पदर केला ।
दवबिंदू एक एक, जणू सुट्टा हिराच केला ॥ ५ ॥

जरी रत्नहार भासे, धागा गहाळ झाला ।
त्या “ईश्वरी”१ कलेचा, चित्रात कळस झाला ॥ ६ ॥

१. “ईश्वर”च “सर्वसाक्षी” म्हणवतो, नाही का!

- नरेंद्र गोळे २०११११२७

गणपा's picture

27 Nov 2011 - 10:13 am | गणपा

नं १ प्रतिसाद.

चतुरंग's picture

27 Nov 2011 - 8:07 pm | चतुरंग

अतिशय सहजसुंदर उत्तम कविता! खूप दिवसांनी अशी छान कविता वाचायला मिळाली!

-रंगा

चौथा कोनाडा's picture

9 Jul 2021 - 11:36 am | चौथा कोनाडा

नरेंद्र गोळे जी,
खुप सुंदर रचना ! ❤️

सर्वसाक्षी's picture

27 Nov 2011 - 10:08 am | सर्वसाक्षी

अप्रतिम कविता! सहज सुंदर काव्य.

सर्वसाक्षी - म्हणजे ईश्वर हे खरे पण माझा हे नाव घेण्यामागचा दृष्टिकोन वेगळा आहे. आपला 'साक्षीभाव' सतत जागृत असावा, जे जसे आहे ते तसे ग्रहण करावे त्यात पूर्वग्रह वा स्वतःच्या पसंतीचा, सोयीचा कल नसावा म्हणजेच आपल्याला जे दिसले ते तसेच सर्वांना सांगावे, आणि सदसदविवेकबुद्धी कायम जागृत असावी ही भावना.

माझ्या चित्रासाठी इतकी सुरेख कविता दिल्याबद्दल आभार. एक विनंती - आपली ही कविता आपल्या जालनिशीवर अवश्य द्या आणि त्यात यापैकी कुठलेही वा सर्च चित्रे खुशाल द्या.

आपला स्नेहांकित

साक्षी

नरेंद्र गोळे's picture

27 Nov 2011 - 5:37 pm | नरेंद्र गोळे

नमस्कार सर्वसाक्षीजी,

त्यात पूर्वग्रह वा स्वतःच्या पसंतीचा, सोयीचा कल नसावा >>>>> सत्य वचन!

संत सोहिरा अगदी हेच म्हणतातः

"विवेकाची ठरेल ओल
ऐसे की बोलावे बोल
आपुल्या मते उगीच चिखल
कालवू नको रे

हरी भजनाविण काळ घालवू नको रे"

आपली विनंती म्हणजेच आज्ञा मानून
http://srujanashodha.blogspot.com/2011/11/blog-post_27.html#links
या दुव्यावर आपल्या इच्छेनुरूप हे कोळ्याचे जाळे पुन्हा प्रकाशित केलेले आहे.

पियुशा's picture

27 Nov 2011 - 12:40 pm | पियुशा

मस्त फोटु
इतका नाजुकशा धाग्याने इतके दव कसे पेलले आहेत याचे विषेश कॉतुक वाट्ले :)

नरेंद्र गोळे's picture

27 Nov 2011 - 5:39 pm | नरेंद्र गोळे

नाजुकशा धाग्याने इतके दव कसे पेलले>>>>> आहे खरे कौतुक!

चतुरंग's picture

27 Nov 2011 - 8:05 pm | चतुरंग

हा निसर्गाचा अफलातून चमत्कार आहे. अतिशय नाजूक दिसणारे हे जाळे महामजबूत असते.
विश्वास बसणे कठिण वाटेल परंतु ह्याची टेन्साईल स्ट्रेंग्थ (ताण सहन करण्याची क्षमता) उत्तम दर्जाच्या पोलादाइतकी असते!! धागा विलक्षण तन्यता (ताणले जाणे) राखून असतो. उणे ४० से. ते अधिक २२० से. इतक्या प्रचंड तापमान फरकातही तो उत्तम काम करतो. त्यामुळे हे दवबिंदूंचे ओझे ते धागे लीलया पेलतात! :)

-(कोळ्याच्या जाळ्यात गुरफटलेला) रंगा

प्यारे१'s picture

28 Nov 2011 - 10:11 am | प्यारे१

>>>>(कोळ्याच्या जाळ्यात गुरफटलेला) रंगा

कॉलिंग रेवतीकाकू कॉलिंग ;)

किचेन's picture

27 Nov 2011 - 2:29 pm | किचेन

शीर्षक वाचून वाटल होत कि कोणत्यातरी हिर्यांच्या प्रदर्शनाचे फोटो असतील.
फोटो अप्रतिम!
मान गये ...आपकी पारखी नजर और हिरोन्का जोहरी ...दोनो को!

(फक्त हे फोटो आमच्या ह्यांच्यापर्यंत पोहोचू देऊ नका! नायतर पुढच्या वाढदिवसाला मिपावर 'एका कोळियाने केलेले दागिने घातलेली मी' असा धागा निघेल )

रेवती's picture

27 Nov 2011 - 8:13 pm | रेवती

सुंदर!

प्रभाकर पेठकर's picture

27 Nov 2011 - 8:27 pm | प्रभाकर पेठकर

विलक्षण रत्नहार.

कोळ्याची कला, निसर्गाने भरभरून दिलेले दान आणि सर्वसाक्षीजींची पारखी नजर. एकच कौतुकोद्गार्....व्वा!

मदनबाण's picture

28 Nov 2011 - 9:25 am | मदनबाण

दुसरा फोटो आवडला...

प्राजक्ता पवार's picture

28 Nov 2011 - 4:51 pm | प्राजक्ता पवार

अप्रतिम !

मिश्रेया's picture

28 Nov 2011 - 9:00 pm | मिश्रेया

असा हार तर कुणालाहि मिळणे अश्क्यच.
किति छान आहे. असेच सुन्दर निसर्गा चे रुप दाखवत जा.

मोबाइल's picture

29 Nov 2011 - 6:07 am | मोबाइल

खुप सुन्दर

वन्दना सपकाल's picture

29 Apr 2014 - 9:15 pm | वन्दना सपकाल

अप्रतिम

शुचि's picture

29 Apr 2014 - 9:26 pm | शुचि

वा!!!रसिकतेला सलाम.

चौथा कोनाडा's picture

9 Jul 2021 - 11:35 am | चौथा कोनाडा

एक नंबर आहेत फोटो. सुंदर.
मोती पाहून फिटले डोळ्यांचे पारणे !.

गुल्लू दादा's picture

9 Jul 2021 - 11:55 am | गुल्लू दादा

छान आहेत फोटो. धन्यवाद.

हल्ली मला जाहिरात करण्याच्या अनेक संधी मिळु लागल्या आहेत. :)))
हिरा है सदा के लिये...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - A simple smile. That’s the start of opening your heart and being compassionate to others. :- Dalai Lama

विजुभाऊ's picture

9 Jul 2021 - 4:20 pm | विजुभाऊ

सुंदर. खूपच

पण प्रतिमा पडद्यावर पाहताना उमगले; अरे, ते हिरे जडवुन हार गुंफणारा जवाहिरी तर तिथेच होता.

नाही हो तुम्ही फक्त हार तयार करणारा कारागीर पाहिला... हिरे जडवुन गुम्फायचे काम तर यत्र तत्र सर्वत्र असणार्‍या निसर्गाने केले आहे. तो फोटोत कधीच मावत नाही... मावणार नाही.