सहकार क्षेत्राविषयी पुनर्विचार करायची वेळ आली आहे का?
मा. श्री. धनंजयराव गाडग़ीळ, श्री वैकुंठभाई मेहता आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराच्या माध्यमातुन उद्योग क्षेत्राचा पाय रचला. १९४९साली प्रवरा सहकारी साखर कारखान्याची सुरवात झाली. दुष्काळी भागातील लौकीकार्थानी अशिक्षीत शेतक-याने महाराष्ट्राला नव्हे देशाला वेगळी दिशा दाखवीली.
अनेक वर्षे या सहकाराच्यामाध्यमातुन ग्रामीण भागाचा कायापालट व्हायला सुरवात झाली. सहकाराच्या माध्यमातुन जोडव्यवसाय असलेल्या दुधाच्या धंद्याला महेसाणाच्या सहकारी डेअरीने वेगळ्याच पातळीवर नेउन ठेवले. तीचा पाठपुरावा सहकाराचा पाया घालणा-या महाराष्ट्राने करून "सफेद क्रांती" करून दुधाचा महापुर आणला.
कुक्कुट पालन या जोड धंद्याला बरकत आली आणि तो एक प्रमुख व्यवसाय झाला. अंडी आणि चिकनच्या माध्यमातुन करोडोंची उलाढाल होउ लागली.
सहकारी पतपेढ्या आणि कालांतरने सहकारी बॅँका स्थापन होउ लावल्या. या माध्यमातुन अनेक छोट्या उद्योगांना भांडवल मिळायची सोय होउन अनेक व्यवसाय भरभराटीला आले.
समाजातील दलित , उपेक्षित , दुर्लक्षित , समाजही या विकासाची फळे चाखू लागला. परिणामी शेतीची सुधारणा , उत्पादनात वाढ , दरडोई उत्पन्नात वाढ , आवश्यक गरजांची पूर्तता , स्वभांडवल निमिर्ती , तसेच रोजगार , शिक्षणाच्या सुविधा निर्माण होऊ शकल्या. परिसराच्या विकासाचे केंद साखर कारखाना ठरला. परिणामी विखे पाटलांच्या सहकार्याने नगर जिल्हा , महाराष्ट्र राज्य व देशातील अनेक भागात सहकारी साखर कारखानदारी उभी राहिली. ग्रामीण अर्थव्यवस्था भक्कम झाल्याने विकासापासून वंचित राहिलेला हा भाग मोठी प्रगती करण्यात यशस्वी ठरला. देशाच्या सामाजिक , राजकीय , आथिर्क , शैक्षणिक व इतर क्षेत्रात नावलौकिक मिळवणारे अनेक सुपुत्र ग्रामीण भागातून निर्माण झाले. पद्मश्री विखे पाटलांच्या कर्तृत्वाने देशाची अर्थव्यवस्था भक्कम झाली , हे कुणीही नाकारू शकत नाही.
सहकार क्षेत्राचे "स्वाहाकार" क्षेत्र झाल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या. गेले काही वर्षे सहकार क्षेत्राची घसरण चालली आहे. अनेक साखर कारखाने कर्जाच्या ओझ्यामुळे बंद पडले आहेत. त्याना मदत (?) म्हणून मग राज्य शासनाने कर्ज द्यायचे. आणि मग त्याची पुर्तता झाली नाही की लिलावात काढायचे. कर्जाच्या बोज्याखालचे (कर्जाच्या बोज्याखाली का गेले हे अधीक सांगायची गरज नाही) सहकारी साखर कारखाने कमी किमंतीत खाजगी उत्पादकांना विकले गेले. (ही गोष्ट का झाली व कशी झाली याबद्दल तज्ञांनी लिहावे).
बाजारत मागणी असून अनेक पोल्ट्र्या बंद पडल्या आहेत. दूधाबद्दल न बोलणे हेच उत्तम. अनेक सहकारी बँकावर प्रशासक नेमले गेले आणि कालांतराने खाजगी बँकात त्यांचे विलीनीकरण झाले.
हे सगळे लिहीण्याचे मुळ कारण म्हणजे काल (काही) वर्तमानपत्रात आलेली एक बातमी.
बातमी पुढील प्रमाणे-
विद्यार्थ्यांच्या खात्याचे बनावट तपशील देत असल्याच्या कारणावरून ब्रिटनच्या इमिग्रेशन विभागाने भारतातील १९४० बँकांची काळी यादी तयार केली आहे. भविष्यात या यादीतील बँकांची स्टेटमेंट ब्रिटनच्या व्हिसा प्रक्रियेसाठी ग्राह्य धरली जाणार नसल्याने राज्यातील अनेक प्रतिथयश बँकावरही ब्रिटनची 'व्हिसा पॉवर' कोसळली आहे.
(सवीस्तर बातमी येथे वाचा.)
या यादीत अनेक नामवंत सहकारी बँकांचा समावेश आहे. यामधे महाराष्ट्रातील आणि विषेशत: पुणे जिल्ह्यातील बँकांचा समावेश आहे.
सहकार क्षेत्राला घरघर लागली असताना ही अजून एक बातमी आली.
सहकार क्षेत्राला शासन अनेक सवलती देत असूनसुद्धा सध्या बिकट अवस्था आहे. राजकीय नेत्याकडुन या परिस्थीत बदल होणे अशक्य आहे. कारण सहकार क्षेत्राची आर्थीक ताकद वापरुन अनेक नेते मोठे झाले आहेत.
या क्षेत्राला असल्या परिस्थीतीतुन बाहेर कोण काढणार? पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटिलांसारखे दृष्टे नेतृत्व आणि मा. श्री. धनंजयराव गाडगीळ व श्री वैकुंठ मेहता यांच्यासारखे मार्गदर्शक मिळणार का?
शासन सहकार क्षेत्र सुधारण्यासाठी काय पाउले उचलेल? सहकार क्षेत्र राजकारणमुक्त होउ शकेल काय? सहकाराच्या माध्यमातुन होणारा भ्रष्टाचार बंद कसा होइल?
प्रतिक्रिया
सहकार क्षेत्राला आता घरघर
उत्तम चर्चा प्रस्ताव.
महाराष्ट्रात सहकाराची
अच्छा! वेबदुनियेत एका
प्रतिसादाची गल्ली चुकली काय ? :)
अरेरे, गलती झाली साहेब. घ्या
सहकार क्षेत्रातील अनागोंदीच अजून एक उदाहरण.