Skip to main content

महावीर बंडू -

लेखक विदेश यांनी बुधवार, 10/08/2011 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
हाती फिरवत गदेस गरगर बंडू फिरतो भरभर घरभर , येणा-जाणाऱ्यास तडाखे बाल महावीराचे शंभर ! सोफ्यावरून खुर्चीवरती - खुर्चीवरून फरशीवरती , उड्डाणातुनी जखमी होतो पराक्रमी तो बंडू असतो ! ढगांची गडगड कानीं येता बंडू एकदम गडबडतो - महावीर बंडू हा अमुचा आईच्या पाठीशी दडतो !!
लेखनविषय:

वाचने 1872
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

In reply to by पप्पु अंकल

बंडू अगदी डोळ्यासमोर ऊभा केलात.
हेच बोल्तो. सुटसुटीत आणि चटपटीत बालगीत आवडले.