सुंदरा मनामधे..

ऋचा's picture
ऋचा in जनातलं, मनातलं
22 May 2008 - 10:15 am

हा दुवा पहा
http://www.youtube.com/watch?v=e7zWwlSZPHo

ही लावणी मला अगदी लहानपणा पासुन म्हणजे १० असल्यापासुन आवडते.
(१० ही कविता होती मराठीत)

ह्यातीम उपमा फारच सुंदर आहेत.

संगीतप्रतिसाद

प्रतिक्रिया

आर्य's picture

22 May 2008 - 4:00 pm | आर्य

सुंदरा मना मधे भरली, जरा नाही ठरली ।
हवेलीत शिरली, मोत्याच भांग ॥

सिंह सम कटी, ऊभी ऐकटी...........गळ्या मधे हार
अंगी तारुण्याचा बहर ज्वानीचा कहर, मारीते लहर मदन तलवार ।

(मराठा सरदार) आर्य

विसोबा खेचर's picture

23 May 2008 - 9:08 am | विसोबा खेचर

मस्त ठसकेवाज लावणी आहे. अगदी सुरेल आणि खड्या आवाजात गायली आहे, काव्यही झकास आहे...

मजा आली ऐकायला..

आपला,
(लावणीप्रेमी) तात्यासरपंच.

आमचे डिसोझा सर त्यांच्या अमराठी मराठी मध्ये ही कविता अशी काही शिकवायचे की बास... त्यांचं ते सुंदरेचं वर्णन चुकुन राम जोशानी ऐकलं असतं तर कपाळावर हात मारुन घेतला असता...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 May 2008 - 10:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लावणीतले सौंदर्य वर्णन जबरदस्तच आहे.
राम जोश्यांना मानलंच पाहिजे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नीलकांत's picture

24 May 2008 - 6:55 pm | नीलकांत

राम जोशींची ही लावणी शाळेत असल्यापासून आवडती आहे.

युट्युबवर हल्ली खुप मराठी व्हिडीओज सापडतात. मजा आहे.

नीलकांत

पिवळा डांबिस's picture

26 May 2008 - 9:34 am | पिवळा डांबिस

सुंदर लावणी आहे.
गायलीयही मस्त!!

नीलकांतराव,
तुमचा कंप्यूटर आणि आंतरजालावरचा अनुभव मोठा आहे म्हणून विचारतो,
तुम्हाला कुठे "महाराष्ट्रदेश सुंदरा" ही लावणी दृक वा श्राव्य स्वरूपात कुठे आढळली का हो?
बर्‍याच दिवसापासून मी शोधतो आहे,
तिची सुरवात,
"अहा! हा देश कैसा छान....
जसं केवड्याचं रान...."
अशी आहे बहुतेक.....
-डांबिसकाका

नीलकांत's picture

27 May 2008 - 10:24 am | नीलकांत

ही लावणी अद्याप ऐकली नाही. वाचण्यात सुध्दा नाही आली.

काही दुर्मीळ मराठी गाणी येथे मिळतात. मात्र तेथे सुध्दा शोध घेतला असता ही लावणी सापडली नाही.

http://www.cooltoad.com
http://www.esnips.com

नीलकांत

विजुभाऊ's picture

27 May 2008 - 10:50 am | विजुभाऊ

ही लावणी वार्‍यावरची वरात मध्ये भाईकाकानी घेतली होती.
आशालता वाबगावकर त्यावेळी कोरस मध्ये गायल्या होत्या

मदनबाण's picture

26 May 2008 - 9:33 am | मदनबाण

दुव्या बद्दल धन्यवाद.....मला लावणी ऐकण्यास फार आवडते.
लावण्यांमधील सवाल-जवाब हा प्रकार फार आवडतो...

अवांतर :-- मला आवडणार एक गाण..(ही लावणी नाही..)
http://www.youtube.com/watch?v=QjZ_9XD1njY&feature=related

नीलकांत's picture

27 May 2008 - 11:11 am | नीलकांत

वार्‍यावरती वरात मधे ही लावणी असेल तर मग तर अगदी सोपं झालंय. युट्युब वर वार्‍यावरती वरातचा मूळ व्हिडीओ आहे. ज्यात भाईकाकांनी काम केलंय.

त्याचा दूवा हा. शेजारच्या खिडकीत पुढील भागांचे दूवे मिळतील.

जरा गुगल केलं की हे व्हिडीओ उतरवून घेता येतात.

ह्या नाटकाचे mp3 येथे आहेत.

येथून सुध्दा गाणी उतरवून घेता येतात. हा दूवा वापरता येईल.
येथील चौकटीत दूवा द्या आणि टिचकी मारा. नव्या पानावर उतरवून घेण्याजोगा दूवा असेल.

नीलकांत

पिवळा डांबिस's picture

27 May 2008 - 11:05 pm | पिवळा डांबिस

विजुभाऊ आणि नीलकांत,
थँक्यू, सो मच!!
दोस्त असावे तर असे!!!
-पिडा