अरे काय हे!

अरे काय, हे काय मांडलयंत काय तुम्ही लोकांनी?

आम्ही हल्ली मिपावर हजर असतो तेंव्हा काहीतरी बेसुर्‍या चर्चा, प्रेमभंगाच्या कविता, निर्बोध रेसेपी (आम्हाला निर्बोध, कारण कुकिंगमधलं आम्हाला काही कळत नसल्यामुळे हो!) वगैरे टाकता आणि आम्ही जरा दोन-तीन दिवस दूर गेलो की अशी छान-छान चित्रं लोड करतां!!

अरे ओंकार, चतुरंग, भाग्यश्री, सतलज! अरे काय सुरेख चित्रं काढली आहेत रे तुम्ही लोकांनी! कायहो केशवसुमार? देवाने इतकी चांगली कला तुमच्या बोटांत ठेवली आहे आणि विडंबनं कसली करता?

आणि कुठे गेलं ते आमचं ईनोबा? अरे इतकी छान चित्रं काढता येतात तुला आणि टवाळ्या कसल्या करत फिरतोस रे मिपावर?

मंडळी तुम्ही म्हणाल, आम्ही काय करायचं हा आमचा प्रश्न आहे, हा पिवळा डांबिस कोण सांगणार आम्हाला? खरं आहे!! पण एका म्हातार्‍याच्या कळकळीने सांगतो, देवाने तुम्हाला अशी कला दिली आहे तर शक्य असतील तितकी चित्रं काढा. त्यावर फोकस करा...

अरे हे ईश्वराचं देणं किती महान आहे याची तुम्हाला कल्पना नसेल पण आमच्यासारख्यांना, ज्यांच्याकडे ते नाही त्यांना पुरेपूर कल्पना आहे रे!!!

अरे आम्हाला अशी चित्रं काढता येत असती तर आम्ही कशाला केवळ शब्दपुजारी बनलो असतो?

असो. कुणीतरी एक झकास आयडिया काढली होती की अश्या चित्रांचा वेगळा विभाग का बनवू नये? मस्त कल्पना!! जर "जे देखे न रवी" असू शकतं तर चित्रांचा स्वत:चा विभाग का नसावा? तेंव्हा ही आयडिया फुकट जाऊ नये म्हणुन (आणि संपादकमंडळावर लोकमताचा प्रभाव आणण्यासाठी!Smile आम्ही नवीन पोल सुरू करतो आहोत. अर्थात आमचे कंप्युटरविषयीचे ज्ञान आमच्या विषयापुरतेच मर्यादित असल्याने तो पोल इथेच न देता स्वतंत्रपणे नव्या धाग्यात द्यावा लागत आहे. (नीलकांताने जर मनावर घेतलं तर तो हे दोन धागे एकत्र करू शकेलही, करणार काय रे बाबा नीलकांता?)

पण आपले मत न चुकता कळवा...

वा डांबिसा...

कायहो केशवसुमार? देवाने इतकी चांगली कला तुमच्या बोटांत ठेवली आहे आणि विडंबनं कसली करता?

सहमत आहे! Smile

अरे ओंकार, चतुरंग, भाग्यश्री, सतलज! अरे काय सुरेख चित्रं काढली आहेत रे तुम्ही लोकांनी!

पण एका म्हातार्‍याच्या कळकळीने सांगतो, देवाने तुम्हाला अशी कला दिली आहे तर शक्य असतील तितकी चित्रं काढा. त्यावर फोकस करा...

अरे हे ईश्वराचं देणं किती महान आहे याची तुम्हाला कल्पना नसेल पण आमच्यासारख्यांना, ज्यांच्याकडे ते नाही त्यांना पुरेपूर कल्पना आहे रे!!!

सहमत आहे..

वा डांबिसा! स्वतंत्रपणे दोन ओळी लिहून मिपावरील सर्व चित्रकारांचे कौतुक केलेस, त्याना दाद दिलीस याचं खूप बरं वाटलं! Smile

तात्या.

ओ...

पिंडाशेठ,
अता ठरल ना ,४५ वर्षा नंतर पर्णवेळ चित्र काढायची .. मग पाडू देना जरा विडंबने.. अभिप्रयाबदाल धन्यवाद..
(अभारी) केशवसुमार
स्वगतः हा माणूस दुसर्‍या नावाने कविता करतो की काय? Thinking मग हा माझ्या विडंबनांवर का उठलाय? Waiting

मग हा

मग हा माझ्या विडंबनांवर का उठलाय?

अरे तुझ्या विडंबनांवर नाही उठलो रे सायबा!! तुझा कायतरी गैरसमज होतोय!!!!
खरं सांगायचं तर मिपावर सदस्यसंख्या अतिशय वाढल्यापासून सगळंच वाचायला पुरेसा वेळ नसतो. तेंव्हा "जे देखे न रवी" टाळायचं हा एक धोरणात्मक निर्णय मी आता घेतलाय, माझ्यापुरता!!
म्हणजे मग "काथ्याकूट" आणि "जनातलं, मनातलं" मनसोक्त वाचायला मिळतं!
अपवाद फक्त केशवसुमाराचा!!
पण तुला नाही वाटत का की चित्रांमध्ये तुझी ओरिजिनॅलिटी जास्त दिसेल विडंबनांपेक्षा?
माझ्यासारखा ४५ वर्षांचा होशील तेंव्हा कदाचित कळेल मी काय म्हणतोय ते!!! Smile)

अरे हे

अरे हे ईश्वराचं देणं किती महान आहे याची तुम्हाला कल्पना नसेल पण आमच्यासारख्यांना, ज्यांच्याकडे ते नाही त्यांना पुरेपूर कल्पना आहे रे!!!

अरे आम्हाला अशी चित्रं काढता येत असती तर आम्ही कशाला केवळ शब्दपुजारी बनलो असतो?

वा ! क्या बात कही है आप ने !
एकदम मनातलं बोललात काका !

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

डांबिसकाका,

मलाही मनापासून चित्रे काढायची आहेत, त्यासाठी लवकरात लवकर वेळ मिळवण्याची इच्छा आहे.
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!

चतुरंग

ओ काका

निर्बोध रेसेपी ??????
तुम्हाला मिळाल्यात सुगरण काकू बाकीचे शिकतायत ना? हे काय बरं नाय बॉ....

अरे हे ईश्वराचं देणं किती महान आहे याची तुम्हाला कल्पना नसेल पण आमच्यासारख्यांना, ज्यांच्याकडे ते नाही त्यांना पुरेपूर कल्पना आहे रे!!!


हे मात्र पटलं बरं का....१०१% सहमत...

गिनीपीग

या पाक शाळेत ब हुदा बिच्चारा नवरा हाच गिनीपीग आसतो