चोरून चोरून, हो ना?
कधी कधी हलकासाच पेपर उचलून
मुद्दाम त्यावरच भाजी चिरून
कधी उगाच रद्दी निट रचून
नि रचेलेली रद्दी मुद्दाम पाडून
चोरून चोरून तू वाचतेस, हो ना?
कधी धूळीवर, झाड़त असतांना
कधी भांडयांवर, ते घासतांना
काचेवर खिडक्या पुसतांना
तर पानांवर पाणी घालतांना
चोरून चोरून तू लिहितेस, हो ना ?
कधी ते "तेलकट रंग" भिंतींच्या अडून
कधी त्या "पेंसिल" तिरक्या डोळ्यातुन
कधी ती "पुस्तकं" अरशाच्या नजरेतून
तर कधी "वह्या" फरशिच्या प्रतिबिम्बातुन
चोरून चोरून तू बघतेस, हो ना?
बापरे! किती गं रोज रोजची तुझी चोरी ही
वाटलं होतं प्रमाणिक कामवाली छोरी ही
चोरी ती चोरीच, शिक्षा हवीच प्रत्येक चोरीला
विचार करतोय अता "शिक्षा" द्यावीच ह्या पोरीला :) ("शिक्षा" = शिक्षण)
ए! चोरून चोरून हेही ऐकलस, हो ना ? :)
आवडली कविता
एकदम छान
हा हा मस्त!!! सुंदर विचार.
आवडली कविता पुर्ण वाचल्यावर च
अरे चोरा, ती वाचत होती अन तू
हा हा हा
चांगली आहे कविता! आवडली!!
आवल्डी कविता....