तुझ्यावीना मी कसा जगलो (भाग - १)

नि३'s picture
नि३ in जनातलं, मनातलं
9 May 2008 - 7:14 pm

आज समीरचे कामात लक्षच लागत नव्ह्ते आज ऑफीसमधे पुन्हा त्याला so called analysis of code चे काम मिळाले होते.जेव्हा तो कंपनी मधे कामावर रुजु झाला होता तेव्हा तो खुप उत्सुक होता काही चांगले काम करण्याकरीता पण खुपलवकरच त्याला वास्तवाची जाण आली.

सॉफ्टवेअर कंपनी म्हणजे एक मॄगजळ आहे जे दुरुणच चांगले वाटते हे तो लवकरच जाणुन चुकला. तर तो पुन्हा तेच crap work करत बसला होता.सेकंड शिफ्ट होती (दुपारी २.०० ते १०.३०) ह्या शिफ्ट चा एक फायदा जरुर असतो कि हे PL,ML लोक चांगले आपल्या सोयीनुसार जनरल शिफ्ट मधे येतात(सकाळी ९.०० ते६.००)आणि ६ वाजता निघुन जातात. ते गेले कि नो टेंशन सतत विनाकामी आपल्या Cubical च्या मागे येवुन काही बघण्याची भीती नसते कींवा तासात दहादा What's the status of your work विचारणार कोणी नसते.अरे बाबा तु कामच असे दिले कि त्याच status काय दयाव ते आजयागत कुणाला कळले नसेल तर असो...

साधारण ६ ते ६:१५ ची वेळ समीर ब्रेक घेण्याकरीता उठला.चेहरा स्वच्छ धुऊण फ्रेश झाला आणि कडक कॉफीचा कप घेऊण बाहेर आला. कंपनीच्या १२ मजली इमारतीच्या ११ व्या मजल्यावर तो काम करीत होता . एका कोपर्यात कॉफी मशीन आणी एकदम अपोझीट साईडला बाहेरील बाजुस ऐसपेस जागा होती आणी समोरच एक मोठा अर्धी भिंत कव्हर करेल असा भला मोठा Transperant कांच होता. तो त्या कांचाजवळ आला आणी बाहेरील दृश्य न्याहाळु लागला . त्याच ते आवडत काम होत आणी तो यायचा पण अश्या वेळेस कि तेथे नेमक कोणी नसायच सर्व लोक आधीच येउण जायचे.आज पण त्याच्याशीवाय तेथे कोणीहि नव्हते.बाहेरील वातावरण खूपच छान होते .

उन्हाळयाचे दिवस होते सुर्य दिवसभर आग ओकुण पुर्णपणे थकलेला आणी जाण्याच्या मार्गावर होता की उद्या पुण्हा रीचार्ज होऊण पूर्ण ताकदीनीशी आग ओकायला तयार.....तर सुर्य अस्त होण्याचा वेळ आणी नेमकी त्यामुळेच वातावरणात जाण आलेली.चेहर्याच्या समांतर बघीतले की मोठमोठ्याल्या बिल्डींग , फ्लायओव्हर आणी त्यावरुण जाणारी लोकल ट्रेन आणि थोड खाली बघितल की गर्द झाडी आणि मधुन एक लहान पायवाट बरोबर त्या गर्द झाडीला दोन भागांमधे विभागीत होती.मग त्याला क्षणभर वाटले की असेच बाहेर त्या पायवाटेवरुण धावत सुटावे...खुप वेळेपर्यंत आणि मग मधेच दीसले एखादे चिंचेच झाड कि ऊचल दगड आणि मार पुर्ण ताकदीणे कि एखाद चिंचेच खांड पडलेच पाहीजे... मग धावतच जायच ते उचलायला कुणी आपला मित्र घेईल त्या अगोदर .....अं..अं ..अं..कीती रम्य ते बालपण क्षणात वाहवत जातो आपण त्या आठवणीत नाही का?

समीरचे पण असेच झाले होते पण लगेच भानावर आला आणि original चेहर्यावर professionalism चे make-up असल्याची जाण आली अरे....अरे पण ...हे काय होतय..... ओह ..गॉड ....नाही ....प्लीज ....पण त्या विरोधाला काही अर्थ नव्हता तो विरोध क्षणार्धात गळूण पडला त्याचे मन जिंकले आणि तो तीच्या आठवणीत ........... क्रमशः

कथालेख

प्रतिक्रिया

नि३'s picture

9 May 2008 - 8:33 pm | नि३

वाईट असो वा चांगली आपल्या प्रतीक्रीयेच्या प्रतीक्षेत....................

(संत्राच्या बागेत रमणारा) नितिन