महिला दिनाच्या शुभेच्छा !

अवलिया's picture
अवलिया in काथ्याकूट
8 Mar 2011 - 8:30 am
गाभा: 

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्व मिपाकर महिला, तरुणी, बालिका आणि आज्ज्या, पणज्ज्या, खापरपणज्ज्या यांना शुभेच्छा !!!

लवकरात लवकर लिंगभेदानुसार होणारा अन्याय दूर व्हावा आणि मानवजात अधिक प्रगल्भ व्हावी ही मनोकामना !!

सर्वांचे कल्याण होवो !!

प्रतिक्रिया

शेखर's picture

8 Mar 2011 - 8:48 am | शेखर

आमेन.....

प्रीत-मोहर's picture

8 Mar 2011 - 9:13 am | प्रीत-मोहर

आमदि च्या सर्व मिपाकर मत्रिणींना शुभेच्छा :)

अमोल केळकर's picture

8 Mar 2011 - 9:23 am | अमोल केळकर

जागतीक महिलादिना निमित्य समस्त महिला वर्गास शुभेच्छा !!

अमोल केळकर

श्री गावसेना प्रमुख's picture

8 Mar 2011 - 9:30 am | श्री गावसेना प्रमुख

आमच्या पण रे भो सोबेच्छा

नगरीनिरंजन's picture

8 Mar 2011 - 9:41 am | नगरीनिरंजन

महिला दिनानिमित्त सर्व पीडित महिलांना शुभेच्छा आणि पीडक महिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष
हातभट्ट्या बंद करणारी बहिणाबाई... सामना (आज)

तिला पाहिलं की तलाठी, पोलीस शिपाई पळ काढतात. हातभट्ट्या असोत की एखाद्या परित्यक्तेचा प्रश्‍न, सारं काही कायदेशीर करण्यात शालन वाघमारे यांचा हात कोणीच धरू शकत नाही. ‘बहिणाबाई’ म्हणून नशाबंदी मंडळात ती प्रसिद्ध आहे.
गावातल्या हातभट्ट्यांनी कुटुंबेच्या कुटुंबे उद्ध्वस्त केली. त्यात अनेक महिला नाडल्या गेल्या. नवर्‍याला दारूच्या गर्तेतून बाहेर काढता काढता कधी त्याच दारूच्या आहारी गेल्या

विनायक बेलापुरे's picture

8 Mar 2011 - 10:11 am | विनायक बेलापुरे

जागतिक महिला दिनाच्या समस्त मिपाकर माता भगिनी मैत्रीणीना हार्दिक शुभेच्छा.

sneharani's picture

8 Mar 2011 - 10:20 am | sneharani

महिला दिनाच्या समस्त महिला वर्गाला हार्दिक शुभेच्छा!

मुलूखावेगळी's picture

8 Mar 2011 - 10:27 am | मुलूखावेगळी

नानुडी धन्स रे धाग्याबद्दल आनि शुभेच्छांबद्दल
महिला दिनाच्या समस्त महिला वर्गाला हार्दिक शुभेच्छा!
आणि पुरुष वर्ग नुसत्या शुभेच्छा देत आहेत कुछ पार्टी शार्टी ;)

विनायक बेलापुरे's picture

8 Mar 2011 - 10:43 am | विनायक बेलापुरे

हे बरयं !
शुभेच्छा मिळाल्यावर ज्यांना खुषी झाली त्यांनी पार्टी द्यायची असते. ;)

आदिजोशी's picture

8 Mar 2011 - 10:28 am | आदिजोशी

जागतिक महिला दिनाच्या दीन पुरुषांकडून हार्दिक शुभेच्छा

सुहास..'s picture

8 Mar 2011 - 1:46 pm | सुहास..

जागतिक महिला दिनाच्या दीन पुरुषांकडून हार्दिक शुभेच्छा >>>>

=)) =))

अ‍ॅड्याचा घरावर एखाद्या दिवशी लाटणे मोर्चा जाणार आहे ;)

असो ..समस्त मिपाकर भगीनींना 'महिला दिनाच्या शुभेच्छा ' (आमच्या आणि अ‍ॅड्याचा घरात रोजच महिला दिन असतो हा भाग वेगळा ;) )

आज मिपावरील काही खरडवह्या पाहून ' आजच्या दिवशी घ्या ओळख करुन ' असे करणार्‍या समस्त पुरुष वर्गाचे ही अभिनंदन ;)

निवेदिता-ताई's picture

8 Mar 2011 - 11:06 am | निवेदिता-ताई

जागतिक महिला दिनाच्या सर्व भगिनींना, या भगिनी निवेदिताच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!!!!!!!

नितिन थत्ते's picture

8 Mar 2011 - 1:36 pm | नितिन थत्ते

>>आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्व मिपाकर महिला, तरुणी, बालिका आणि आज्ज्या, पणज्ज्या, खापरपणज्ज्या यांना शुभेच्छा !!!

वरील सर्व आणि चुचु यांना शुभेच्छा. :D
(ह घेणे)

महिला दिनानिमित्त महिलांचे कैवारी युयुत्सु यांच्या लेखाची वाट पहात होतो.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रत्येक स्त्रीने आपापल्यापरिने स्त्रीभृणहत्या रोखण्याचा संकल्प केला तरच महिला दिन साजरा करण्याचे खर्‍या अर्थाने सार्थक होईल!
महिला दिनाच्या मन:पुर्वक शुभेच्छा

वपाडाव's picture

8 Mar 2011 - 5:16 pm | वपाडाव

स्त्रीभृणहत्या
हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे.
आणी शासनाने अंमलात आणलेल्या योजनांचे जनतेने स्वागत न करता अवलंबन करावे.

परिकथेतील राजकुमार's picture

8 Mar 2011 - 1:40 pm | परिकथेतील राजकुमार

Practise makes a man perfect baecause women are already perfect.

महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

टारझन's picture

8 Mar 2011 - 2:09 pm | टारझन

Practise makes a man perfect baecause women are already perfect.

And I'd like to append something " Wemen are already perfect .. and its impossible to improve perfection "

महिलांसारखं वर्तन असणार्‍या महिलांचं आणि पुरुषांचं ही अभिनंदन ... पुरुषांसारखं वर्तन असणार्‍या महिला आणि पुरुषांना फाट्यावर मारल्या गेले आहे :)

( भिकारी १७ जन्मांचा आई मुळे श्रीमंत ) टारझन
कांदा घालुन केलेले पोहे हे गर्भश्रीमंत असल्याचे उदाहरण आहे.

मुलूखावेगळी's picture

8 Mar 2011 - 2:49 pm | मुलूखावेगळी

पुरुषांसारखं वर्तन असणार्‍या महिला आणि पुरुषांना फाट्यावर मारल्या गेले आहे Smile

म्हन्जे काय?
आनि महिला दिनी तरी तुझी मुक्ताफळं आवर ना महापुरुषा :)

याचा अर्थ , " जे पुरुषांसारखे पुरुष आहेत , म्हणजे माझ्या सारखे , आणि पुरुषांसारख्या महिला आहेत म्हणजे ज्यां महिलांचे वर्तन पुरुषांसारखे आहेत त्या "
ह्यात मी काय मुक्ताफळं उधळली आहेत ते सांगा . आज महिला दिन आहे म्हणुन तुमच्या ह्या दु:साहसाला माफ केल्या गेले आहे. अन्यथा प्रतिसाद वेगळा आला असता.

धन्यवाद.

- भैरवनाथ मुक्ताफळे
मला गोट्या खेळायचा अधिकार आहे की नाही माहित नाही, पण मी जालावर आपली निरिक्षनं नोंदवत असतो.

मुलूखावेगळी's picture

8 Mar 2011 - 3:49 pm | मुलूखावेगळी

आज महिला दिन आहे म्हणुन तुमच्या ह्या दु:साहसाला माफ केल्या गेले आहे. अन्यथा प्रतिसाद वेगळा आला असता.

ओहो. ती कसर काय कधीही पुर्ण करालच :)
तुम किसिका उधार रखतेच नही ना? :)

नरेशकुमार's picture

8 Mar 2011 - 4:38 pm | नरेशकुमार

टारु शायेबांनि उधारिचा बिजीनेस चालू केलाय काय ?

पर्नल नेने मराठे's picture

8 Mar 2011 - 3:28 pm | पर्नल नेने मराठे

सर्व पुरुशांना धन्यवाद व महिलांना शुभेछ्हा!!!

We are Cool as Vodka,Hard as Tequila,Warm as Cognac,Exotic as Malibu,Mixed as a Cocktail & as Special as a Champagne.Cheers to us.....!!!!!

अवलिया's picture

8 Mar 2011 - 3:36 pm | अवलिया

We are Cool as Vodka,Hard as Tequila,Warm as Cognac,Exotic as Malibu,Mixed as a Cocktail & as Special as a Champagne.Cheers to us.....!!!!!

हा हा हा मस्त !!

साधा_सरळ's picture

8 Mar 2011 - 3:40 pm | साधा_सरळ

समस्त महिलांचे हार्दिक अभिनंदन!
(असा काही वेगळा दिवस आहे तर... आमच्याकडे तर नेहेमीच महिला दिन असतो! आंतरराष्ट्रीय पुरुष दिन पण असतो का हो? :) )

म्हैला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा

सूर्यपुत्र's picture

8 Mar 2011 - 5:27 pm | सूर्यपुत्र

>>लवकरात लवकर लिंगभेदानुसार होणारा अन्याय दूर व्हावा आणि मानवजात अधिक प्रगल्भ व्हावी ही मनोकामना !!
म्हणूनच, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्व मिपाकर पुरुष, तरुण, बालक आणि आज्जे, पणज्जोबे, खापरपणज्जोबे यांना शुभेच्छा !!! ;)

(ह.घ्या.) :)

महिला दिनाच्या सर्व संबंधितांना शुभेच्छा!! :)

सर्वांचे कल्याण होवो !! :)

-सूर्यपुत्र.

विकास's picture

8 Mar 2011 - 7:30 pm | विकास

आज "जागतिक महीला दिन" चालू करून शंभर वर्षे झाली आहेत. त्यानिमित्त, वास्तवीक असा आठवण करायला, दिन साजरा करायची वेळ न येवो इतक्या महीला सबला होवोत अशा शुभेच्छा! :-)

शुचि's picture

8 Mar 2011 - 7:38 pm | शुचि

Moods of a Woman
Author: unknown
An angel of truth and a dream of fiction,
A woman is a bundle of contradiction.
She's afraid of a wasp, will cream at a mouse,
But will tackle her boyfriend alone in the house.
She'll break open his head and then be his nurse,
But when he's well and can get out of bed,
She'll pick up the tea pot and aim for his head.
Beautiful and keenly sighted, yet blind and crafty and cruel,
Yet simple and kind.
She'll call him a king, then make him a clown,
Raise him on a pedestal, then knock him flat down.
She'll inspire him to deeds that ennoble a man,
or make him her lacked to carry her fan.
She'll run away from him and never come back,
But if he runs away, then she'll be on his tracks.
Sour as vinegar, sweet as a rose,
She'll love you one minute then turn up her nose.
She'll be stronger than brandy, milder than milk.
At times she'll be vengeful, merry, and sad,
She'll hate you like poison and love you like mad.

पैसा's picture

8 Mar 2011 - 7:40 pm | पैसा

महिला दिनाच्या पाशवी शक्तीना शुभेच्छा! आणि अपाशवी भक्ताना धन्यवाद!

धागाकर्ते म्हणून अवलियाना दुप्पट धन्यवाद!

रेवती's picture

8 Mar 2011 - 7:50 pm | रेवती

धन्यवाद नाना!

प्राजु's picture

8 Mar 2011 - 8:22 pm | प्राजु

नानुस!! धन्यवाद..
:)

अग्रजा's picture

8 Mar 2011 - 8:57 pm | अग्रजा

सर्वांनाच !!!

डावखुरा's picture

8 Mar 2011 - 11:54 pm | डावखुरा

माझ्याही शुभेच्छा....

मी-सौरभ's picture

9 Mar 2011 - 12:00 am | मी-सौरभ

गुमान परत लढाईला सुरवात करा :)
उद्यापासून...

विकास's picture

9 Mar 2011 - 12:33 am | विकास

गुमान परत लढाईला सुरवात करा Smile
उद्यापासून...

-----
सौरभ

हे म्हणत असताना, नावात (आयडीप्रमाणे) साधासुधा घातले नाहीत ते बरे झाले. :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Mar 2015 - 1:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आज सकाळी विनाकारण अवलिया या जालमित्राची आठ्वण झाली. साला खोड्या आणि धागा काढायला एक लंबर असायचा. अवलियाने महिला दिनाचा धागा काढला असेल का, असे वाटले. शोधला आणि सापडला.

क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष केला तो ८ मार्च १९०८ ला. आणि हा महिला दिनाचा प्रवास ८ मार्च १९४३ साली भारतातही साजरा झाला. युनोने १९७५ ला अधिकृत जागतिक महिला दिन साजरा करायला सुरुवात केली आणि तेथपासूनचा प्रवास आजतागायत चालु आहे, जगभरातल्या लढावू बाण्यांच्या सर्व महिलांना एकदा महिला दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!

स्वातंत्र्यपूर्व आणि आता स्वातंत्र्यानंतर महिलांचा विचार केला तर स्त्री आता पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून जगव्यवहारात अतिशय आनंदाने जगते आहे. आता फार क्वचित ठिकाणी तिची नाकाबंदी असेल असे वाटते. भारतीय पारंपरिक मानसिकतेतून बाहेर पडायला जवळ जवळ तिला शंभर वर्षाचा प्रवास करावा लागला.

आधुनिकतेने स्त्री विचारांनी आणि अनेक बंधनांनी मुक्त झाली. स्त्रीबद्दल समाजात आदर निर्माण झाला. शासन आणि समाज आज तिला आदराने वागवतांना दिसतो असे असले तरीही अजूनही असंख्य स्त्रीयांवरील अन्याय अत्याचाराच्या बातम्यांनी आपले मन व्यथित होतांना दिसते.

आज स्त्री समाजात वावरतांना अधिक उदार विचारांची झाली तशी ती आता अधिक स्वमग्न आणि संकुचित होत चालली आहे का असाही विचार महिला दिनाच्या निमित्ताने डोकावून जातांना दिसतो, माझं कुटुंब, माझे पैसे, माझं जग, असं करुन मुक्ततेतून पुन्हा बंदिवासात असा तिचा प्रवास सुरु झालाय का ? स्त्रीया बोलत्या झाल्या म्हणजे समाज आणि कुटुंबापासून दुरावत चालल्या आहेत का ? असाही विचार यायला लागतो. स्त्रीयांचे अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत नव्या समाजासमोर तिच्या नव्याने मागण्या येत आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे येत्या काळात मिळतील आणि स्त्रीच्या बदलत्या स्वरुपाची चर्चा भविष्य काळातही होत राहील. स्त्रीयांची पुरुषांशी स्पर्धा नाही आणि पुरुषांचीही स्त्रीशी स्पर्धा नाही. स्त्रीने अधिकाधिक समृद्ध,सजग, कर्तुत्ववान व्हावं यासाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्त जगभरातील महिलांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं अवलियाच्या धाग्यातलं मनोगत पूर्ण करतो.

-दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर's picture

8 Mar 2015 - 3:00 pm | प्रभाकर पेठकर

डॉक्टरसाहेब,

पुरुषांच्या मानसिकतेच्या बदलाची नक्कीच गरज आहे त्याच बरोबर स्त्रीच्या मानसिकतेच्या बदलाचीही आजच्या घडीला बरीच गरज आहे.
शारीरिक दुर्बलता नैसर्गिक आहे. तिथे संरक्षणाच्या दृष्टीकोनातून स्त्रीला पुरुषाची गरज लागते आणि लागणारच त्यात वावगं कांहीच नाही. मला मुद्दा मांडायचा आहे तो, त्यांनी ज्ञान संपादन, अनुभवांचे विश्लेषण आणि बारीकसारीक गोष्टीतही पुढाकार घेऊन कार्य उऱकण्याची वृत्ती ह्या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याचा आहे. ह्या विषयांमध्ये आजही अनेक महिला परावलंबी राहणे पसंद करतात. पुरुषांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वः शी स्पर्धा अत्यंत गरजेची आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Mar 2015 - 5:56 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्त्रीकडे उपभोगाची वस्तू म्हणुन पाहण्यापेक्षा एक व्यक्ती म्हणुन पाहिलं पाहिजे याच्याशी सहमत. पण, बदलत्या काळानुसार स्त्रीनेही आपली मानसिकताही बदलली पाहिजे, स्वातंत्र्य मिळालंय तेव्हा त्याचा सदुपयोग झाला पाहिजे. स्त्री आत्मर्निर्भर झाली पाहिजे, स्त्रीने प्रसंगी समाज काय म्हणेल याची भिती बाळगु नये असे वाटते.

उदा. लग्न होऊन अवघ्या दीड वर्षात विधवा म्हणुन जीणं वाट्याला आलंय आणि पदरात एक मुलगी आलीय तेव्हा उरले आयुष्य केवळ मुलीला सांभाळण्यात घालवणारी एक स्त्री पाहतोय मला तिचं वाईट वाटतं ती काहीच निर्णय घेऊ शकत नाही आणि तिला कुटुंबाकडून फारशी मदत मिळत नाही. पारंपरिक विचारातून स्त्रीने आता काही नव्या वाटा शोधायला हव्यात असेही वाटून गेले.

-दिलीप बिरुटे

खटासि खट's picture

8 Mar 2015 - 2:36 pm | खटासि खट

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री आयडी असणा-या तमाम पुरुषांना आणि युवकांना हार्दीक शुभेच्छा !