ते पीठातून करता येते की नाही माहीत नाही. पण साधारणपणे भाजणी म्हणजे वेगवेगळी धान्ये आधी भाजून मग एकत्र दळायची असे काहीसे असते. आमची आई दिवाळीच्या आधी असे सगळे करत असते. त्यामुळे माहीत.
बाकी जाणकार प्रतिक्रिया देतीलच.
तांदूळ पीठी २ वाट्या, बेसन १ वाटी, कणिक १/२ वाटी, उडदाचे पीठ १/२ वाटी, मूग डाळीचे पीठ १/२ वाटी,धणे जीरे पावडर, ओवा पावडर, हे सगळे सुट्टे भाजून मग एकत्र करून बघावे. मी यातले मूग आणि उडदाचे पीठ न घालता बाकीची पीठे घालून थालिपीठे करते. खाण्यालायक नक्कीच होतात.
ऑल द बेस्ट. :)
मीपण अशीच काही करतो.
तांदळाचे पीठ, ज्वारी-किंवा-बाजरीचे पीठ, कणिक, कुठल्यातरी डाळीचे पीठ. प्रमाणे कमीजास्त. यातील बहुतेक प्रयोग खाण्यालायक झालेले आहेत.
भिजवून वाळवलेली, मग भाजलेली धान्ये मिसळून दळलेले पीठ... ती अस्सल चव मात्र नुसत्या भाजक्या पिठांच्या मिश्रणात येत नाही.
तयार पिठांतून करता येणे बहुधा शक्य नसावे.
पण तुमचा स्थानिक देशी वाणी केप्रची वगैरे तयार थालिपिठाची भाजणी ठेवत नाही काय? अटलांटात आता काही वाणी अगदी नियमितपणे नाही, तरी बरेचदा ठेवताना दिसतात.
नाहीतर मग दोनतीन वर्षांतून जेव्हा केव्हा भारतवारी करत असाल तेव्हा बॅगा भरून घेऊन येणे हा एक उपाय. किंवा भारतातून कोणी येत असेल तर त्याच्याबरोबर. चांगला दोनतीन वर्षे पुरेल एवढा ष्टाक मागवायचा. आम्ही हेच करतो. ("कारण शेवटी आम्ही भटेच. त्याला काय करणार?" संदर्भः पु.ल.)
मी तर गेल्या वर्षी ४ किलो भाजणी आणली होती आणि फ्रिज करून ठेवली आहे.
आता त्यातली बरीच कमी झालेली आहे.
आमच्याकडचा वाणी चितळेंचं इडली मिक्स ठेवतो, केळकरांचा वर्हाडी ठेचा ठेवतो.. पण भाजणी आणत नाही. बिचार्याला सांगितलं तर समजतही नाही काय सांगतात ते.
आमच्याकडचा वाणी चितळेंचं इडली मिक्स ठेवतो, केळकरांचा वर्हाडी ठेचा ठेवतो.. पण भाजणी आणत नाही. बिचार्याला सांगितलं तर समजतही नाही काय सांगतात ते.
आमच्याकडे आहे एक वाणी, बर्यापैकी नियमितपणे ठेवतो. सरदारजी आहे. (म्हणजे मालक नव्हे. मालक गुजराती मुसलमान आहे. हा तिथे काम करतो.) त्याला व्यवस्थित कळते आणि माहिती असते सगळी. तुमच्यामाझ्यापेक्षा अस्खलितपणे अस्सल गावरान मराठी बोलतो. (लोणावळ्याचा आहे.)
असो.
झिप लॉकच्या पिशवीत ठेवुन आणि शक्यतीतकी हवा काढुन फ्रिज किंवा फ्रिजर मध्ये ठेवल्यास बरेच दिवस टिकते. ( मी भाजणीच पीठ गेल वर्षभर फ्रिजमध्ये ठेवलय. जेव्हा गरज लागते तेव्हा काढतो.)
"भाजणीच्या थालिपीठाचे पीठ कसे बनवायचे?" -
उत्तर क्र. ०१ भाजणीची थालपीठं करणेत यावीत, मग ती कडक उन्हात वाळवणेत यावित, आणि पिठ काय, मिक्सर मधुन पण करता येईल किंवा खुप जास्त असेल तर चक्कीवरुन करुन आणा. हाकानाका.
इथं फॉर इथिओपिया की काय ?
असो, भाजणिच्या थालपिठं करण्यासाठी पिठ कसं करायचं ते आईला विचारुन सांगतो, थोड्या वेळात.
अवांतर - अजुन एक एकोळी धागा, खाण्याचा पुर्वतयारी संदर्भात '' जनातलं मनातलं ' मध्ये - मिपा अजुन गंडलेलच आहे काय ?
खुप जास्त असेल तर चक्कीवरुन करुन आणा. हाकानाका.
अहो हर्षद मला वाटत शिल्पातैंना इथे म्हणजे परदेशात तयार पिठे मि़ळतात असे म्हणायचे असेल असे वाटते. इथे चक्की/गिरणी कुठली आलीये हो. आणि खाजगी चक्की विकत मिळते असे ऐकले आहे पण फार महाग असते ती. माझ्या एका ओळखीच्या बाईंची तर मागच्या दिवाळीला तर मोडली सुद्धा, चकलीची भाजणी करुन.
आणि एकोळी धागा आहे मान्य आहे, पण आमच्यासारख्यांना यातुन काही माहीती, नविन कल्पना मिळाल्या तर मदतच होते.
१ कप ज्वारीचे पीठ,१ कप बाजरीचे पीठ,१/२ कप डाळीचे पीठ,१/२ कप तांदूळाचे पीठ,पाव कप कणीक,पाव कप मूगाचे पीठ,पाव कप उडीदाचे पीठ, पाव कप सोयाबीन पीठ,१ चमचा मेथीची पूड,पाव कप नाचणी पीठ,२/३ चमचे धणे-जीरे पूड हे सर्व एकत्र करुन मायक्रोवेव्ह मधे ८ मि. भाजा.प्रथम ३ मि नंतर २ मि नंतर १/१ मि आतल्या आत(मायक्रोवेव्ह् मधे) हलवा.या मिश्रणची साधारण १ कि भाजणी तयार होईल.
थालीपीठाऐवजी मोकळी भाजणी म्हणून एक वेगळाच खमंग पदार्थ माझ्या आजीने शिकवला होता माझ्या ब्याचलर दिवसांत.
पण ब्याचलर नव्हे तर सर्वांनाच आवडेल असा आहे.
गोळा मळून थालीपिठे करण्याऐवजी उपम्यासारखे भाजणी वापरून बनवायचे, तेलाच्या फोडणीत खमंग कांदाबिंदा घालून वरुन भाजणी पेरुन..जरा कोरडेच... पाणी बघून बघून घालत.
पटकन तयार, नो कॉम्प्लिकेशन्स आणि टेस्ट झकास.
ऑफकोर्स थालीपीठ ग्रेट आहेच.
तेलाच्या फोडणीत खमंग कांदाबिंदा घालून वरुन भाजणी पेरुन..जरा कोरडेच... पाणी बघून बघून घालत.
मी भाजणीत पाणी घालुन घट्तसर मळुन घेते व मग कान्दे चिरुन फोडणीत घालुन हिच भिजवलेली भाजणी हळु हळु मोकळी करन आत सोडते मग चान्गली परतते. मग थोड्यावेळ झाकण ठेवुन परत परतते म्हणजे ति अजुन छान मोकळी होते.
पेरलेलं पिठलं आणि ओतलेलं यातल्या फरकासारखं.
तसंच मला थालीपीठ आणि भाकरी हे दोन्ही पदार्थ थापून झाल्यावर उचलून तव्यावर टाकता येतील असे बनवता येत नाहीत.
कितीही प्रयोग केले तरी थापून थालीपीठरूप झालेला गोळा तव्यावर टाकण्यासाठी उचलला (उलथने किंवा हातावर) की भेगाळलेल्या जमिनीसारखा तुकडे तुकडे होऊन खाली पडतो.
कोरडा झालाय म्हणून पाणी घालावे तरी तो उचलताना उलथन्याएवढा चौकोन सोडला तर बाकीचा परत खाली गळून पडतो.
प्लॅस्टिक पिशवीवर थापले, पीठ लावून थापले, तेल लावून थापले, तरी तेच.
म्हणून मग मी तव्यावर डायरेक्ट थापतो. अर्थात हे एकाच थालिपीठाबाबतीत करता येतं. कारण मग तवा तापतो.
म्हणून एका थालीपीठाला एक तवा खर्ची पडतो.
घरात दोन तवे असल्याने मी एका वेळी दोनच थालीपीठे करु शकतो..
* प्लास्टिक पिशवीवर थापले, पीठ लावून थापले, तेल लावून थापले, तरी तेच.
प्लॅस्टिक पिशवीवर थापताना आधी काहिहि लावु नका. गोळा प्लस्स्तिकवर ठेवा मग थोडे तेल बोटांना लावुन थापायला घ्या, थापले जाइलच. तव्यावर घालताना आधी हळुच प्लॅस्टिक वरुन एका बाजुने हळुहळु मोकळे करुन हातावर घ्या न मग तव्यावर हळुच घाला. ह्या कामात धसमुसळेपणा कामाचा नाही, नाजुकपणाने काम करायला हवे.
हेही करुन पाहतो..
पण ... तसं आठवलं तर मीही असेच केले होते.
प्लॅस्टिकवर आधी काहीही न लावता थापणे, नाजुकपणे, हलक्या हाताने.. थापला जातो व्यवस्थित. तव्यावर टाकताना प्लॅस्टिक उचलून सोडवायला गेला की संपूर्ण किंवा अर्धासुद्धा अखंड निघत नाही. लपके निघून येतात.
मला वाटतं मुळात तो पिठाचा गोळा भिजवण्यात गंडतं काहीतरी.
शेवटी मीनाकुमारी बेदम जाड झाल्यावर तिच्या चेहेर्याचे वर्णन माझा एक मित्र 'भोकांचे थालीपीठ' असा करत असे.
बाकी भाजणीचे पीठ कसे करायचे यावर तज्ञांनी प्रकाश टाकलाच आहे.
एक वाटी ज्वारीचे पिठ घेउन त्यात एक कांदा बारीक चिरुन घालावा, कोथिंबीर भरपुर,तिखट मिठ आवडीनुसार(चवीनुसार), थोडे जिरे व ओवा , सगळे एक्त्र मळा व तव्याला थोडेसे तेल लावून त्यावर
थालीपिठ थापा, कडेने थोडेसे तेल सोडा व मंद आचेवर थालीपिठ भाजा. हे एकाच बाजूने भाजतो आम्ही,
भाजणी साठी कोणतीही पिठे कमीजास्त प्रमाण झाले तरि चालते, पण पिठे भाजून घेऊ नयेत, नुसतिच एकत्र मिसळून थालिपिठे करा.
माझी आजी अगदी अशीच नुसत्या ज्वारीच्या पीठात कांदा, कोथिंबीर, तिखट,मीठ, हिंग, हळद एवढ्या जिन्नसांवर अतिशय स्वादिष्ट थालिपीठं करायची आम्ही सगळी नातवंडे भरपुर हादडायचो. गेले ते दिवस... आता आजीला कधी भेटायला मि़ळतयं तेही माहीती नाही. :(
बाकी निवेदिताताई माझा पत्ता व्यनि करते बर का, व भाजणीची वाट पहाते. :)
प्रतिक्रिया
ते पीठातून करता येते की नाही
तांदूळ पीठी २ वाट्या, बेसन १
शंका
लाडवासाठी बेसन भाजतो तशीच
ओह
मीपण अशीच करतो
शक्य नसावे
मी तर गेल्या वर्षी ४ किलो
फ्रीझ करण्याची...
अटलांटातील काही भाग माहिती आहेत
क्लेरमाँट रोड
टिकते का?
झिप लॉकच्या पिशवीत ठेवुन आणि
"भाजणीच्या थालिपीठाचे पीठ कसे
चक्की
चकली ताईंचा ब्लॉग
झटपट भाजणी
करुन बघते...
कढइत भाज म्हणजे जास्त खमंग
मोकळी भाजणी
तेलाच्या फोडणीत खमंग
म्हणजे
* प्लास्टिक पिशवीवर थापले,
हेही करुन पाहतो..
तेल घालता कि नाही भिजवताना ?
मीनाकुमारी
धन्यवाद...आणि चुचे, तयार
अग तुझा प्र्श्न नहि बै सम्जला
म्हंजे आमच्याकडे दळणासाठी
चला आता मिच पाठवते सगळ्य़ांना
नुसते ज्वारीचे पिठ असेल तरीही थालीपीठ मस्त होते
माझी आजी
वा