इंचा- इंचाने आपण मिपा वरून माघार घेत आहोत ?
मिसळपाव या संस्थळावरील ही बातमी वाचून मिपाचे काय होणार अशी काळजी कुणाच्याही मनात उभी राहील. आपणही ही बातमी वाचा आणि विचार करा.
मुख्य लेख वाचण्यासाठी "काथ्याकुट " हे tab वापरा तर वाचकांचे प्रतिसाद वाचण्यासाठी Comments हा tab वापरावा लागेल. (आतापर्यंत ७२ प्रतिसाद आले आहेत व सारे ही वाचण्यासारखे आहेत.)
http://www.misalpav.com/node/16000
अलीकडे मी वाचलेल्या बातम्यातली ही एक अतीशय गंभीर बातमी आहे. इंचा-इंचाने आपण मिपा मधून माघार घेत आहोत! आज जोरदार कारवाई न केल्यास एक दिवस आपल्याला मिपावर 'उदक सोडून' बाहेर पडावे लागेल. आपले 'परा'न मंत्री, आपले टारुपती, आपले 'अवली' लष्कर अशी सारी गुमान कां बसली आहेत? त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर मिपापासून सुरुवात होऊन संस्थळे एक-एक करून फुटतील आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील. आणि इथले दोन आयडी अण्वस्त्रधारी आहेत हाही एक महत्वाचा मुद्दा आहे.
मिपामध्ये आपण राष्ट्रपती राजवट आणावी आणि खंबीर मार्गाने "जातीयवाद भडकव्णाऱ्या आयडी " देशद्रोह्याला शिक्षा करून परिस्थिती आटोक्यात आणून मग नव्या निवडणुका घ्याव्यात!
असे आजच केले नाहीं तर सारी-सारी पुण्याई व हजारो सदस्यांचे रक्त वायाच गेले असे समजावे लागेल!
या अर्थाची पत्रे मी संपादक मंडळांना इंग्रजीत व मराठीत पाठविली आहेत. आपणही पाठवा!
जय मिपा !
प्रतिक्रिया
25 Dec 2010 - 8:46 am | टारझन
हा हा हा .. ते अण्वस्त्रधारी आयडी कोण रे ? बाकी लेका तु प्रेमपत्रे लिहायला लाग ,, ही इंग्रजी आणि मराठी पत्र पाठवुन ते ही संपादक मंडळाला पाठवुन काय हाशिल होणार ? त्यातल्या त्यात मंडळात कोणी उमेद्वार म्हैला नाही त्यामुळे तिथेही तुझा चाण्स लागणार नाही :)
आलाचे झिंगलबेल झिंगलबेल चा सण तर सिंगल मिंगल काय करता ;)
बाकी प्रतिसादांचे विडंबण वाचण्यास उत्सुक.
अवांतर : ह्या विषयांतर परिकथेतिल राजकुमार आणि अवलियांचा_राजा यांचा अभ्यास खुप खोलवर आहे त्यांचे विचार वाचण्यास उत्सुक .
25 Dec 2010 - 8:47 am | प्रीत-मोहर
हा हा =))
25 Dec 2010 - 9:17 am | स्पा
हा हा हा .. ते अण्वस्त्रधारी आयडी कोण रे ? बाकी लेका तु प्रेमपत्रे लिहायला लाग ,, ही इंग्रजी आणि मराठी पत्र पाठवुन ते ही संपादक मंडळाला पाठवुन काय हाशिल होणार ? त्यातल्या त्यात मंडळात कोणी उमेद्वार म्हैला नाही त्यामुळे तिथेही तुझा चाण्स लागणार नाही





25 Dec 2010 - 9:55 am | सूड
हे अण्वस्त्रधारी आयडी म्हणजे काय हे न कळाल्यामुळे पास !! ;)
25 Dec 2010 - 10:11 am | नरेशकुमार
आता हे इंच इंच मैलात, मोजावे लागनार आहे.
25 Dec 2010 - 11:13 am | अवलिया
:)
25 Dec 2010 - 11:18 am | परिकथेतील राजकुमार
स्पा काका...मिपा तर हातचे जाण्याच्या स्थितीत आहे,पण 'पराक्रमी' चा धोका त्याहुन मोठा होत चालला आहे.
पराक्रमी आयडी मिपात बंदर (पोर्ट) बनवणे आणि पराक्रमी ते मिपा रस्ते बनवणे इं अनेक उपक्रम त्यांनी हाती घेतले असुन मिपाला घेरण्याचे हर तर्हेचे प्रयत्न सध्या पराक्रमी करत असुन आता त्यांचा मिलेटरी बेस मिपास्थानात स्थापण्याचे त्यांचे मनसुबे आहेत...
25 Dec 2010 - 11:21 am | अवलिया
किती अतिरेकी.. आपलं .. खंदे कार्यकर्ते घुसले आहेत?
25 Dec 2010 - 11:23 am | नरेशकुमार
पराशि शेमत आहे,
एकतर मिपाचे सर्व लेख पनाला लाउन मिपा वाचवावे, अन्यथा सोडुन द्यावे, पन हे असेच चालु ठेउन अन्य लेखकांचा बळि देउ नये.
25 Dec 2010 - 11:53 am | स्पा
बातमी चिंता वाढवणारी आहे.. मात्र अधिक तपशील मिळेपर्यंत काहिच भाष्य करता येणार नाहि
त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर मिपापासून सुरुवात होऊन संस्थळे एक-एक करून फुटतील आणि भांडणे चालूच राहिल्यामुळे नवी जागतिक युद्धे इथेच लढल्ली जातील.
हे कशावरून ठरवले? काहि तर्क आहे का आपले उगाच एक वाक्य लेखनाला भारदस्तपणा येण्यासाठी टाकले आहे?
----लांबलांबकेश
25 Dec 2010 - 1:22 pm | यकु
असे काही नाही रे स्पावल्या..
मिपाला आणि येथील लेखक, प्रतिसादकांना सध्या पठारावस्था आलीय.
आणि उनाड प्रतिसादकांच्या आंगात वारं भरलंया ...
हेही दिवस जातील!
25 Dec 2010 - 1:24 pm | अवलिया
शक्यता नाकारता येत नाहि.
25 Dec 2010 - 1:23 pm | स्पा
पठारावस्था ????
म्हन्जे काय रे भाउ?
25 Dec 2010 - 8:03 pm | यकु
म्हणजे काय ते डिट्टेलमध्ये पाहायचे असेल तर त्यासाठी तुला शिक्षणशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम पाहावा लागेल.
एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जोरात प्रगती होत जाते, नंतर प्रगतीला खीळ बसून ती ठप्प होते .. असाच काही काळ जातो.. आणि नंतर पुन्हा एकदा प्रगती सुरू होते..
त्या ठप्प होण्याच्या काळाला पठारावस्था म्हणतात असं काहीसं आठवतं...
25 Dec 2010 - 1:37 pm | विजुभाऊ
या अर्थाची पत्रे मी संपादक मंडळांना इंग्रजीत व मराठीत पाठविली आहेत
ही पत्रे हिन्दीसारख्या न पाठवून तुम्ही फूट पाडायची कारस्थाने करीत आहात.
अशी पत्रे पाठवताना पुण्यातील बीहारी सदस्यांचा विचार करावा.
...अजानुघोर्णं
25 Dec 2010 - 10:49 pm | अविनाशकुलकर्णी
चलो जकार्ता......काळे काका मार्ग दाखवतील
25 Dec 2010 - 10:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मिपा कसलं इंचाइंचाने जातंय? लोकं इथल्या मोकळ्या आणि कौटुंबिक वातावरणाच्या 'तक्रारी'सुद्धा आधी भलभलत्या ठिकाणी करत आहेत; पण इथे येऊन मैत्रीपूर्ण प्रतिसाद लिहीण्यास कांकू करत आहेत.
31 Jan 2013 - 2:55 pm | स्पा
प्रतिसाद दिसत नाहीयेत
31 Jan 2013 - 8:07 pm | पैसा
तुला मेल्या कर्णपिशाच्च नक्कीच अवगत आहे!
31 Jan 2013 - 8:14 pm | जेनी...
अरे देवा !
1 Feb 2013 - 4:19 am | नंदन
चिंताजनक परिस्थिती! 'युनो'सारखी एखादी संस्था समस्त मराठी संकेतस्थळांसाठी असणे अतिशय आवश्यक आहे.
1 Feb 2013 - 5:22 am | स्पंदना
स्पा हा उघडाहेर आहे का?
(गुप्त च्या विरुद्ध उघडा अश्याअर्थी)
1 Feb 2013 - 9:11 am | चिंतामणी
1 Feb 2013 - 11:09 am | बॅटमॅन
हाहाहाहा =))
1 Feb 2013 - 1:56 pm | सूड
मी उघड+आहेर असा संधीविग्रह केला.
1 Feb 2013 - 2:06 pm | बॅटमॅन
बरीक संधीसाधू हो सुडक्या ;)
2 Feb 2013 - 11:14 pm | बिपिन कार्यकर्ते
स्पा उघडा उभा राहिला तर (शत्रू पळून गेल्यामुळे) युद्धाचा चान्सच नाही राहणार! काय समजलात?