✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शापीत मेघ

ग — गणेशा, Tue, 10/12/2010 - 15:21
सार्या उदास वाटा कापीत चाललो मी, होऊन मेघ काळा शापीत चाललो मी झाले उन्हाळे अनेक, ओसाड उदास राने ओल्या अधीर धारा कुरवाळीत चाललो मी श्रुंगार झडून गेला, गर्भगळीत निस्तेज वृक्ष पानगळीत श्वास गुंतलेला शोधीत चाललो मी झाले आप्त ही परके, उदास विराण घरटे दाहक अंतरातला दूरावा तोडीत चाललो मी पसरला गहिरा अंधार, झाकोळला आसमंत दिशाहीन प्रवासात वाहवत चाललो मी ------ गणेशा

प्रतिक्रिया द्या
1792 वाचन

💬 प्रतिसाद (6)

वा.. फारच छान

नेहमी आनंदी
Tue, 10/12/2010 - 16:21 नवीन
सार्या उदास वाटा कापीत चाललो मी, होऊन मेघ काळा शापीत चाललो मी हेच खुप आवडल..
  • Log in or register to post comments

वा..

मदनबाण
Tue, 10/12/2010 - 19:05 नवीन
वा.. :)
  • Log in or register to post comments

>>सार्या उदास वाटा कापीत

नगरीनिरंजन
Tue, 10/12/2010 - 19:09 नवीन
>>सार्या उदास वाटा कापीत चाललो मी, >>होऊन मेघ काळा शापीत चाललो मी छान ओळी. थोडं शुद्धलेखनाकडे लक्ष दिलंत तर दाताखाली खडा आल्यासारखं होणार नाही.
  • Log in or register to post comments

आशय आवडला.

तर्री
Wed, 10/13/2010 - 01:46 नवीन
का महीती नाही पण "तपत्या झळा ऊन्हाच्या " चालीमध्ये वाचताना अडखळलो , परत मुक्त छंदासारखी वाचली तर आवडली. शेवटाचे कडव्यात "पंच" निसटता आलाय.आशय विशेष आवडला.
  • Log in or register to post comments

सर्वांचे आभार

गणेशा
Wed, 10/13/2010 - 16:20 नवीन
या कवितेचा पहिला मतला सोडला तर काहीही व्रुत्ता मध्ये नाही आहे. त्यामुळे ही गेय कविता होउ शकत नाहीये. तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहन पर रिप्लायाबद्दल आभार शुद्धलेखनाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतो नक्की.
  • Log in or register to post comments

मस्त गझल आहे

पाषाणभेद
Wed, 10/13/2010 - 20:57 नवीन
मस्त गझल आहे
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा