काळेकाकांचा प्लेझंटली सरप्राइजिंग लेख.
अजून येऊद्या.
यंदाच्या गणपतीच्या सुमारास मुंबई गोवा महामार्ग असाच तुंबला असल्याचे पेपरांतून वाचले होते.
(सौदी अरेबियात लोकल मायग्रंट लेबर किती असतो ते माहिती नाही. अशी घरी जाण्याची प्रथा मायग्रंट माणसांतच असावी).
जकार्तासुद्धा जावा बेटावरच आहे व त्यामुळे जकार्ताहून जावातील खेडोपाडी जाणारे लोक म्हणजे मुंबई-पुण्याहून महाराष्ट्रातील खेडोपाडी जाणार्या लोकांसारखेच आहेत. सौदी अरेबिया हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे व तिथल्या छोट्या गांवांतून रियाध किंवा अल जुबैलसारख्या औद्योगिक शहरांत लोक येतच असतील. पण ते ईदला आपल्या 'मुलुक'ला जातात कीं नाहीं हे जाणून घ्यायचा मी प्रयत्न केला होता तेंव्हां मला माझ्या तिथल्या मित्रांनी सांगितले होते कीं ते जात नाहींत कारण बर्यापैकी ओव्हरटाईम मिळतो! म्हणून बिपिन-जी किंवा चुचु किंवा मनाली यांच्याकडून खात्री करून घ्यायची होती.
चीनी लोकांच्यात त्यांच्या सणाला (नववर्षाला) गावी जाण्याची पद्धत आहे. आपल्याकडे मुंबईत काम करणारा चाकरमानी जसा सणाला कोकणात जातो. तशी ही मोठ्या सणाला गावी जायची प्रथा आली असावी का?
'ओरांग उटान' हे त्या एप जातीतल्या प्राण्याकरता व 'ओरांग असली' म्हणजे आदिवासींकरता वापरतात ना?
लेख खूप आवडला!!
उटान नव्हे, हुतान!
असली म्हणजे original. पण 'ओरांग असली' हा शब्दप्रयोग आदिवासी या अर्थाने फारसा ऐकलेला नाहींय्. उलट 'जकार्ता असली' म्हणजे जकार्तात जन्मलेला व वाढलेला (म्हणजे इमिग्रंट नसलेला, अगदी 'अस्सल पुणेरी'ची आठवण करून देणारा शब्दप्रयोग).
'जकार्ता असली' लोकांना 'बटावी' (Batavia वरून) असेही म्हणतात!
जे विषय माझ्या मनाला भिडतात त्यावर मी लिहितो. इथेच नव्हे तर जकार्ता पोस्ट अथवा इतर ठिकाणीही. लोकांना आवडलं तर उत्तमच. पण एकादा विषय एकाद्याला नाहीं आवडत. पण लिहिणार्याला तो जे लिहितो ते बव्हंशी आवडतच असते.
आपल्याला जे आवडते ते वाचावे हेच बरे.
लिहिणाराही पहातच असतो कीं कुठला विषय कुठल्या लोकांना भावतोय्?
जे मी मिपावर लिहू शकतो (प्रो-मराठी) ते मी 'जपो'त नाहीं लिहू शकत कारण तो वाचकवर्ग वेगळा आहे.
एवढीच शिस्त मी पाळतो.
राहणीमानाचे, जीवनाचे काही पैलू दाखवल्या बद्दल आभार :)
भारतात ईदच्या दिवशी जेव्हा मुस्लिम मित्रांसोबत भेट होते तेव्हा ते गळा भेट घेतात. ही गळा भेट पद्धत फक्त भारतातच आहे का ?
संध्याकाळी उपवास सोडल्यानंतर (रोजा खोलनेके बाद), मुंबईतल्या भेंडीबाजार, महंमद अली रोडवर खाद्य जत्रा भरते.
विविध सामिष व गोड पदार्थांची जंत्री खादाडीला उपलब्ध असते.
इंडोनेशीयातही असेच असते काय?
'लबारान'ला सगळा देश सुटीवर असतो पण आम्ही फॅक्टरीवाले maintenanceची वर्षाची कामे करण्यात गुंग असतो.
या लेखासाठी मी माझ्या इथल्या 'मुलुक'ला जाणार्या मित्रांना येता-जाताचे आणि गांवातले फोटो काढून आणायची विनंती केली होती. तसे त्यांनी आणले. तेच इथे जोडले आहेत.
'लबारान'ला जकार्ता शहर नव्या नवरीसारखे नटलेले असते, दिव्यांची रोषणाई तर फारच मस्त असते. पण फॅक्टरीतल्या कामामुळे मला त्या रोषणाईचे फोटो घ्यायला या वर्षी जाता आले नाहीं.
पाहू कुणाचे आयते फोटो मिळतात का! मिळाले तर इथे जोडेन, पण ४ ऑक्टोबरनंतर...
प्रतिक्रिया
मस्त. अभ्यासपूर्ण वर्णन. टॅग
मस्त
असेच म्हणते.
छोट्या गांवांतून रियाध किंवा अल जुबैलला लोक पोटासाठी येतच असतील
मस्त
ओरांग असली हा शब्दप्रयोग फारसा ऐकलेला नाहींय्
रमाझान ईद आणि इंडोनेशीया छान
उद्यापासून मी १० दिवस जकार्तात नाहींय्
मस्त
एवढीच शिस्त पाळतो
छान लेख. बोलक्या फोटोंमुळे
लेख आवडला.
लेख व बरीचशी माहिती नवी आहे.
इंडोनेशियातील
इथे फक्त हस्तांदोलन करायची पद्धतइथे फक्त शेकहँड करायची पद्धत आहे
सुधीरभाई, क्या लिखेला है!....
फटाके उडविण्याचीही प्रथा आहे
मस्त लेख. अतिशय माहितीपूर्ण..
'लबारान'ला जकार्ता शहर नव्या नवरीसारखे नटलेले असते