✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर"

इ
इन्द्र्राज पवार यांनी
Fri, 09/03/2010 - 23:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14755 वाचन

💬 प्रतिसाद (67)

प्रतिक्रिया

इ.प. राव..

वाटाड्या...
Sat, 09/04/2010 - 00:01 नवीन
सचिनबद्दल काही म्हणणं नाही पण अश्या गोष्टींनी साध्य काय होतं ते कळ्ळ तर बरं वाटेल. अश्याने काही व्यावसायिक वैमानिक नसलेली मंडळी युद्धात फायटर विमान घेऊन भारतीय सीमेचं रक्षण करायला जाऊ शकत नाहीत. मग हा उपद्व्याप कशासाठी ते कळल नाही... - (फायटर) वाटाड्या...
  • Log in or register to post comments

हवाई दलात भरती होणे.

इन्द्र्राज पवार
Sat, 09/04/2010 - 01:21 नवीन
"पण अश्या गोष्टींनी साध्य काय होतं ते कळ्ळ तर बरं वाटेल." ही शंका रास्तच आहे असे मी मानतो, आणि त्याचा खुलासा असा की, एअर फोर्सने या मानद पदवीबद्दल त्यास जो ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडरचा दर्जा दिला आहे त्यातून सचिन तरुण-तरुणीना 'भारतीय विमान दला'त प्रवेश घेण्यास उद्युक्त करणार आहे. सचिनसारखा "आयडॉल" असे काही आवाहन करीत असेल तर किमान काही तरूणांना त्यातून स्फूर्ती मिळेल अशी आशा आहे. शिवाय तीन दल सोडून देशासाठी समाजात विविध स्थळी या (सचिनच्या) किंवा याहून आगळ्यावेगळ्या दर्जाचे कार्य करणार्‍या "सिव्हीलियन्स" ना यापूर्वी एअर फोर्सने अशी मानद पदे देऊन सार्थ गौरविले आहे. उदा. जे.आर.डी.टाटा, विजयपथ सिंघानिया, आदी. क्रिडाक्षेत्राला हा मान प्रथमच देण्यात आला आहे, आणि तो आपल्या सचिनला मिळाला याचा आनंद जास्तच आहे. इन्द्र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...

इन्द्र्राज पवार

Pain
Sat, 09/04/2010 - 02:00 नवीन
तुमचा हा खुलासा वाचला आणि असे आधी झाल्याचे कळले पण तरिही हे पटले नाही. प्रभावशाली व्यक्तींना विद्यापीठाची मानद पदवी देणे ठीक आहे पण सैन्यातील अधिकाराचे पद ? थोडे जास्त होते आहे असे वाटले. हा प्रकार येथेच थांबवावा, पदकांपर्यंत नेण्यात येउ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

इकडे कसली स्फूर्ती?

भारी समर्थ
Sat, 09/04/2010 - 05:02 नवीन
समाज कार्यामधे कार्यरत असणार्‍या एखाद्या संस्थेचा ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर होऊन जनतेला त्या कार्यासाठी उद्युक्त करणं वेगळं आणि एयर फोर्सचा ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर बनणं सर्वस्वी वेगळं नाही का? देशप्रेमामूळे नाही तर, सचिन किंवा दुसरा एखादा ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर असल्यामूळे सैन्यदलात भरती होणार्‍या सैनिकांपासून काय अपेक्षा ठेवाव्यात? शिवाय, जेव्हा एखादी अशी व्यक्ती असल्या भानगडीत पडते तेव्हा त्याच्या इतर वैयक्तिक गोष्टीही त्याबरोबर जोडल्या जात नाहीत का? उदा. सचिनने कालसर्प का काय ते करून व स्वतःच्या अंधश्रद्धेबद्दल (कोणता पाय आधी मैदानात टाकायचा की असच काही, त्याच्या परम भक्तांनी आमच्या ज्ञानात भर घालावी) जाहीर वाच्यता केली आहे. अशावेळी त्याच्यामूळे हवाई दलात भरती होणार्‍याने आपली श्रद्धा देवापाशी ठेवावी की देशापाशी? उत्तराच्या अपेक्षेत! (मज पामरासी काय थोरपण?) भारी समर्थ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

कालसर्प

इन्द्र्राज पवार
Sat, 09/04/2010 - 22:30 नवीन
"सचिनने कालसर्प का काय ते करून व स्वतःच्या अंधश्रद्धेबद्दल (कोणता पाय आधी मैदानात टाकायचा की असच काही, त्याच्या परम भक्तांनी आमच्या ज्ञानात भर घालावी)" ~~ श्री.समर्थ यांचा हा प्रतिसाद माझ्या नजरेतून सुटला होता, त्यामुळे वेळीच त्याला प्रतिसाद देवू शकलो नाही.... पण आता तो देणे गरजेचे आहे (वरील मुद्द्याबाबत...) प्रतिसादात उल्लेख केलेल्या या बाबीचा (सचिनच्या अंधश्रद्धेचा...) मी त्याचा चाहता असूनही त्यावेळी निषेध केला आहे. इथे आणि अन्य सम संस्थळावर (सचिनने कालसर्पाची पूजा करणे आणि अमिताभ बच्चनने त्याच सुमारास जया भादुरी बरोबर बालाजी मंदिरात जावून होणार्‍या सूनबाईंचा "मंगळ" हटविण्यासाठी गाजावाजा करून घातलेली ५५ लाख रुपये देणगीची पूजा....अधिक ऐश्वर्याचा झाडाबरोबर अगोदर विवाह लावणे...इ.इ. चीड आणणार्‍या बाबी....या दोन्ही घटनांचा त्या त्या वेळी विविध जालावर बरीच गरमागरम चर्चा झाली होती....आणि या बाबींचा विरोध करणार्‍या गटात मीदेखील होतोच).... पण श्री.समर्थ यांना मी इथे विचारतो की, असा विरोध करण्यापलिकडे सचिनचा एक सच्चा हितचिंतक वा चाहता या पलिकडे जावून आणखीन काय करणार? तो आवडतो म्हणून करीत असलेल्य सर्वच कृत्यांचा पाठपुरावा करीत नाही. नीरक्षीरविवेक सूत्र अंगीकारले आहे, इतपतच मी इथे म्हणू शकतो. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भारी समर्थ

पटलं

पैसा
Sun, 09/05/2010 - 10:53 नवीन
आपल्याला त्याच्या खेळाशी मतलब आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

अंधश्रद्ध

प्रकाश घाटपांडे
Mon, 09/06/2010 - 13:17 नवीन
सचिन वा अमिताभ बच्चन ही त्यांच्या क्षेत्रात ग्रेट असली तरी इतर बाबतीत सर्वसामान्य माणसेच आहेत. त्यामुळे डोक्यातील किडा हटवण्यासाठी कालसर्प वा अन्य पुजा त्यांनी घातल्या तर नवल नाही. ते काही अश्रद्ध विवेकी विद्वान नाहीत. उद्या नरेंद्र दाभोलकरांनी नारायण नागबळी ची पूजा घातली तर त्याची बातमी होउ शकेल. मी काही सचिन वा अमिताभचा फॅन नाही . पण त्यांच्या पंखे लोकांनी त्यांच्या या वर्तना बद्दल अवघड वाटुन घेण्याचे काही कारण नाही इतकेच मला म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

लता, सचिन

इन्द्र्राज पवार
Mon, 09/06/2010 - 14:09 नवीन
"सचिन वा अमिताभ बच्चन ही त्यांच्या क्षेत्रात ग्रेट असली तरी इतर बाबतीत सर्वसामान्य माणसेच आहेत." + सहमत. "उद्या नरेंद्र दाभोलकरांनी नारायण नागबळी ची पूजा घातली तर त्याची बातमी होउ शकेल." याच्याशी तर वरील विधानापेक्षा जास्त सहमत. वास्तविक आपणाला लताच्या आवाजाने आणि सचिनच्या खेळामुळे निखळ आनंद मिळत असेल तर त्यांच्या खाजगी आयुष्याकडे पाहुन आपले मत वेगळे का तयार करायचे, हाही मुद्दा आहेच. एकदा श्री.शिरीष कणेकर यांच्याशी घरगुती गप्पा मारताना/बोलताना लतादिदी त्यांना म्हणाल्या, "अहो कणेकर, बाजारात जायची काय सोय राहिलेली नाही, किती महागाई वाढली आहे !!" ~ श्री.कणेकरांना साहजिकच थोडे आश्चर्य वाटले.... पण आमच्याशी बोलताना ही बाब जेव्हा त्यांनी सांगितली त्यावेळी मला लतादिदी भलत्याच भावल्या, इतक्या की त्या आता या क्षणी जवळपास कुठेतरी आहेत आणि त्यांच्या आणि आमच्या सुखाच्या कल्पनांत कसलाही फरक नाही. (कोल्हापूरातील सुप्रसिद्ध 'चन्द्ररूप साडी सेंटर' मधून त्या स्वतःला आणि कुटुंबियांसाठी, तसेच मैत्रीणीसाठी साड्या खरेदी करीत असतात. श्री.कणेकरांच्या किश्श्यामुळे खात्री पटली की त्या साड्या खरेदी करतेवेळीही किंमतीबाबत घासाघास करीत असणारच. का करू नये?) इथे "लता मंगेशकर यांची आर्थिक स्थिती किती चांगली आहे, आणि तरीही त्या कशाकाय बाजारात जातात, अन् त्यांना महागाईचे काय हो?" असले प्रश्न उद्बवू नयेत. त्या तुमच्याआमच्यासारख्याच एक सर्वसामान्य नागरीक आहेत हे मानले तर कुठलाही वाद होण्याचे कारण नाही...तशीच सचिनची 'ती' श्रद्धा. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

आवडले

अनुराग
Sat, 09/04/2010 - 11:21 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाटाड्या...

सचिन चे अभिनंदन.....

कुंदन
Sat, 09/04/2010 - 00:04 नवीन
सचिन चे अभिनंदन..... 'ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर' सचिनला "फ्लाईंग कोफिन" ( उडती शवपेटी) - मिग २९ याबद्दलही वायुसेनेने कल्पना दिलीच असेल.
  • Log in or register to post comments

अभिनंदन

सुनील
Sat, 09/04/2010 - 01:30 नवीन
हे थोडे काही विद्यापीठे नामवंतांना मानद डॉक्टरेट देतात तसे वाटते. अर्थात, असे मानद डॉक्टर आपल्या नावानंतर D. Litt. असे लावू शकत असले तरी त्यांना नावापूर्वी डॉ. अशी पदवी लावता येत नाही. सैन्य दलाच्या मानद पदव्यांबबत काय नियम आहेत? सचिनचे अभिनंदन!
  • Log in or register to post comments

डॉ.

पैसा
Sun, 09/05/2010 - 10:51 नवीन
तर मग जयाललिता अम्मा आपल्या नावामागे डॉ. कसं काय लावतात? त्यानी अशी कुठची पी.एच.डी. केली आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

अरे वा! सचिनचे मानद ग्रुप कॅप्टन्सीबद्दल अभिनंदन.

चतुरंग
Sat, 09/04/2010 - 01:47 नवीन
सचिनला एअरफोर्स ब्रँड अँबॅसिडर बनवण्याची कल्पना चांगलीच आहे, वायुदलाचे ह्या कल्पनेबद्दल अभिनंदन! (बा़की सचिन त्या वायुदलाच्या गणवेशातसुद्धा एकदम स्मार्ट दिसतोय.) रंगा
  • Log in or register to post comments

बातमी डकवणारे पुष्कळ आहेत.

Pain
Sat, 09/04/2010 - 04:38 नवीन
बातमी डकवणारे पुष्कळ आहेत. शिवाय ही गोष्ट प्रसिद्ध झालाशिवाय राहूच शकत नाही अशी आहे. तुम्ही भरपूर फिरता, अनेक लोक आणि प्रसंगांचे साक्षीदार आहात, सखोल ऐतिहासिक, वर्तमानाचे ज्ञान आणि इतके दिवस मिपावर गैरहजर होता (भरपूर वेळ). अनेक धाग्यांवर तुमचे अभ्यासपूर्ण प्रतिसाद वाचले आहेत आणि या पार्श्वभूमीवर तुमचा असा हा पहिलाच धागा. इतक्या अपेक्षा असताना मात्र या धाग्याने निराशा केली.
  • Log in or register to post comments

'लता मंगेशकर', 'सचिन तेंडुलकर'

इन्द्र्राज पवार
Sat, 09/04/2010 - 10:27 नवीन
श्री.पेन.... तुमच्या प्रतिसादातील माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या भावनांची मी दखल घेतोय आणि त्या लिखित स्वरूपात इथे प्रकट केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. एक गोष्ट मला इथे सांगणे फार गरजेचे आहे, अन् ती म्हणजे 'लता मंगेशकर', 'सचिन तेंडुलकर' या दोन नावांने मी चटकन फार भावूक होऊन जातो. (माझ्यासारखे असे करोडो असतील यात शंकाच नाही.) सचिनबद्दल कुठेही काहीही छापून आले की मी ते लागलीच इतरांसमवेत कधी एकदाचे "शेअर" करू असे होऊन जाते. आता या प्रेमाच्या भावनेला म्हटले तर वेडेपणादेखील म्हणू शकता, पण त्याच्याबाबतीत मी फार हळवा आहे हे मान्य करतो. हा धागा देण्याच्या प्रसंगी 'ती' बातमी तासनतास सर्व न्यूज चॅनेल्सवरून दिमाखाने झळकत होती, त्यामुळे देशालाच काय पण जिथे जिथे भारतीय आहे त्या त्या परदेशातदेखील ती पोचली होतीच. तरीही इथे धाग्याच्या रुपाने आणण्याचा उद्देश म्हणजे 'चला त्या निमित्ताने आपल्या लाडक्या सचिनला मिळालेल्या मानाबद्दल इथल्या सदस्यांना काय वाटले हेही जाणून घेऊ या..." ही भावना मनी आली होती. (त्यावेळीही दोन्ही प्रकारची मते येणार याची बालंबाल खात्री होती.) मिपावर मी बराच काळ गैरहजर होतो, ही बाब मान्य.... पण त्यामागील कारण "कौटुंबिक" असल्याने इथे त्याची चर्चा नको. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

पवार साहेब, उगाच कुणाला

Nile
Sat, 09/04/2010 - 14:39 नवीन
पवार साहेब, उगाच कुणाला खुलासे देत जाउ नका हो, च्यायला इथे एखादा हजर राहिल किंवा गैरहजर, कुणी विचारायचे काय काम? मी तर चार शिव्या देईन मला कुणी असे गैरहजर राहण्याबद्दल विचारले तर. (एक धागा टाकुन प्रतिसाद न देता पळुन जाणे वेगळे अन गैरहजर राहणे वेगळे) बाकी सच्या मस्त दिसुन राह्यला. नक्की उद्देश माहित नाही, पण सचिनच्या उपस्थितीने जवान नक्कीच खुश झाले असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

होय...सच्याच !!

इन्द्र्राज पवार
Sat, 09/04/2010 - 15:04 नवीन
"बाकी सच्या मस्त दिसुन राह्यला." व्वा....किती छान वाटते कुणीतरी सचिनला ज्यावेळी "सच्या" असे म्हणते त्यावेळी. हीच आपुलकी त्याच्या पाठीशी सदैव राहिली आहे आणि तो तसे वेळोवेळी जाहीरपणे कृतज्ञतेने बोलूनही दाखवितो. हवाई दलाच्या त्या कार्यक्रमाला हजर असणार्‍या जवानांना त्या प्रसंगी किती आनंद झाला होता त्याचे फोटो तुम्ही पाहिले तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडेल. खराखुरा "आयडॉल" आहे आपल्या सच्च्च्च्या !! जपानचा आणि क्रिकेटचा काही संबंध आहे का? नक्कीच नाही, पण 'कॅनन' कंपनीने सचिनला आशिया खंडासाठी ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर नियुक्त केले होते. दिल्लीतील नीरज द्विवेदी नावाच्या माझ्या एका मित्राने त्या वर्षी झोनमध्ये सर्वाधिक विक्री करून "बेस्ट एक्झेक्युटीव्ह ऑफ द इयर" चा बहुमान मिळविला. दिल्लीच्या मेरिडियन हॉटेलमध्ये एका खास कार्यक्रमात सचिन तेंडुलकरच्या हस्ते त्याचा ती ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला (त्याचे फोटो त्याने मला पाठविले आहेत). सत्कार आणि तोही आपल्या "आयडॉल"च्या हस्ते या कल्पनेने तो इतका हरखून गेला होता की ती संध्याकाळ येईपर्यन्त त्याचे चित्त थार्‍यावर नव्ह्ते. पत्रावर पत्रे पाठवून त्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी आणि सचिनविषयी तो जी भाषा वापरित होता ते वाचून आम्हाला तर त्यावेळी तो केजीचा विद्यार्थी भासू लागला होता. नीरजने हार्वर्ड विद्यापीठातून एमबीए केले आहे, पण त्याच्या मनात "या दहावी नापास विद्यार्थ्याकडून ट्रॉफी कशी स्वीकारायची" असला खत्रूड विचार आला असेल का? हीच आमच्यातुमच्या सच्याची महती. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

मालक हि एक जाहिरातच सगळे काही

परिकथेतील राजकुमार
Sat, 09/04/2010 - 15:20 नवीन
मालक हि एक जाहिरातच सगळे काही बोलुन जाते :) शेवटच्या भागात सचीनला बघुन त्या लहान मुलाच्या चेहर्‍यावरजे अवर्णनीय भाव येतात ते क्लासच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

There are some things money can’t buy

इन्द्र्राज पवार
Sat, 09/04/2010 - 18:01 नवीन
फार सुंदर आहे ही "मास्टरकार्डस्" ची केनया सफारी जाहिरात...आणि विशेषतः तुम्ही म्हणता तसे 'लाडक्या सचिन' ला पाहुन त्या लहान मुलाच्या चेहर्‍यावर येणारे हर्षाचे भाव ! जाहिरातीतील 'There are some things money can’t buy' ~ हे वाक्य सचिनमुळे होणार्‍या आनंदाला पुरेपूर लागू होते. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

-१

सहज
Sat, 09/04/2010 - 18:06 नवीन
शेवटी ही जाहीरात आहे, ते काही उत्स्फूर्त भाव नाही. न जाणो कित्येक रिटेक्स झाले असतील. पैसे देउन करवुन घेतलेले भाव म्हणजे सच्चे असतीलच असे नाही हो. भक्तीभाव पहायचे तर मुंबईच्या मार्गारीटाचे पहा हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

आनंद

इन्द्र्राज पवार
Sun, 09/05/2010 - 10:36 नवीन
"पैसे देउन करवुन घेतलेले भाव म्हणजे सच्चे असतीलच असे नाही हो." ~~ हे मान्यच. पण तरीही एखादी जाहिरात पाहताना त्यातील संबंधित पात्रे जर त्या भूमीतीलच (उदा.केनयातील तो छोकरा....) असतील तर नाही म्हटले तरी त्याला 'सचिन' ला पाहुन व त्याच्याबरोबर कामानिमित्ताने काही काळ व्यतीत करण्यामुळे झालेला आनंद यांचे कुठेतरी प्रतिबिंब जाहिरातीत येतेच येते, तोच आपलाही आनंद. घरातील ज्येष्ठ लोक काहीवेळा (आताचे चित्रपट व त्यातील नायिकांचा अवतार पाहून) असे म्हणतात, "काय सांगू तुला आमच्यावेळी मीनाकुमारी, मधुबाला, वहिदा काय काम करायच्या !! मीनाचा 'दिल एक मंदिर' पाहून आमच्या डोळ्यात पाणी तरळायचे." ~~ आता इथे त्या पिढीच्या लोकाना 'अहो मामा/काका, शेवटी तो अभिनय आहे, मीना असो वा वहिदा त्यांनी त्यासाठी पैसे घेतलेले असतात." असे म्हणून त्यांच्यावर काय परिणाम होणार? शेवटी त्या क्षणापुरता होणारीआनंदाचे बिंदू महत्वाचे...इतकेच ! इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

खरे व खोटे

सहज
Sun, 09/05/2010 - 11:05 नवीन
खरे व खोटे यातला फरक समजुनही वर काहीही कारणे देउन, फरक न समजल्यासारखा केला तर इतिहासाचे पुर्नलेखन होते. ज्या स्क्रिनमधे त्या मसई पोराचा चेहरा हसला, तो कदाचित त्याने ग्रीनस्क्रीनवर दिला असणार. समोर सचिन नसेलही अशी शंका असण्यास प्रचंड वाव आहे. पुन्हा तो शॉट फ्रीज करुन बघणे. पहा ३९ ते ४१ सेकंद. आजकाल बर्‍याच जाहीराती ग्रीन स्क्रीन समोर होतात. संतोषीमाता, राम-सीता, कृष्णाचे काम करणारी कलाकार मंडळी जिथे जातात तिथे दर्शनास लोक लोटतात. असेच सश्रद्ध व अश्रद्ध लोकांच्यातले मतभेद वाढत जातात. मुद्दा हा की खरे व खोटे यातला फरक समजणे महत्वाचे व जिथे शंकेला वाव आहे तिथे शंका घेणार्‍यांना जरुर शंका घेउ दिली पाहीजे. जे काय म्हणायचे आहे ते समजुन घ्या. इतकेच :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

जपानचा आणि क्रिकेटचा....

भारी समर्थ
Sat, 09/04/2010 - 18:47 नवीन
जपानचा आणि क्रिकेटचा काही संबंध आहे का? नक्कीच नाही, पण 'कॅनन' कंपनीने सचिनला आशिया खंडासाठी ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसॅडर नियुक्त केले होते. दुसर्‍या वाक्यातच पहिल्यातील प्रश्नाचे उत्तर, तसेच सदर कंपनीच्या व्यावहारिक चातुर्याचे दर्शन घडते. असो. तुमच्या मित्राचे हार्दिक अभिनंदन! इथे काही सकारात्मक आणि काही नकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. सचिनचे क्रिकेटमधील सर्वोच्च स्थान वादातीतच आहे. त्याचबरोबर वैयक्तिक जीवनातील साधेपणाही बरंच काही शिकवून जाणारा आहे. प्रतिभावंत क्रिकेटपटूंची या देशात वानवा नाही. पण सचिनचा वागण्या-बोलण्यातील संयतपणा व जगण्यातील आदर्शवाद त्याला इतरांपासून खूप उंच नेतो हे इथल्या प्रत्येकाचेच मत असावे यात काही शंका नाही. चर्चेचा मुद्दा हा आहे की, सचिनच काय पण कोणत्याही क्रिडापटूला अशा प्रकारची पदं देणं योग्य आहे की नाही. काहींना वाटतं आहे तर काहींना नाही वाटत तसं. पण म्हणून आपल्या मताविरूद्ध लिहीणारे म्हणजे विचारजंत, मळमळ काय....उगाच सूतावरून स्वर्ग गाठतात राव काही मंडळी. पवारांचे (पवार साहेबांचे लिहीणार होतो, पण उगाच चर्चेला राजकीय रंग चढवला वगैरे म्हणायचे लोक..) लेख फारच अभ्यासपूर्ण असतात....येत राहू द्या. परवा पार्कात मित्रांबरोबर सचिनची बाजू घेऊन बोलणारा जर कोणी तुम्हाला आढळला असेल, तर तो मीच बरं! भारी समर्थ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

सचिनचे अभिनंदन

राजेश घासकडवी
Sat, 09/04/2010 - 04:59 नवीन
मी मानद पदव्यांबाबतीत थोडा उदासीन असतो. बहुतेक वेळा वसंतराव देशपांड्यांना डी. लिट्. देणे वगैरे चांगल्या गोष्टी होतात. पण काही वेळा त्याचा इतका थिल्लर उपयोग होतो की शिल्पा शेट्टीसारखीला मानद पी एच डी वगैरे मिळते तेव्हा अंगाचा तीळपापड होतो. सचिनसारख्याला, ज्याने कुठच्याही पीएचडीपेक्षा अनेकपट अभ्यास केलेला आहे, अशाला जरूर मान मिळावेत. सैन्यात मानद पद दिलं म्हणजे काही त्याला युद्धात लढायला बोलावणार नाहीत अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

शिल्पा शेट्टीसारखीला मानद पी

मृत्युन्जय
Sat, 09/04/2010 - 10:35 नवीन
शिल्पा शेट्टीसारखीला मानद पी एच डी वगैरे मिळते तेव्हा अंगाचा तीळपापड होतो. तिला योगाचा प्रचार आणि प्रसार केल्यामुळे हा बहुमान दिला गेला असावा कदाचित ;) तसेच वंशविद्वेषा विरुद्ध दुर्धर लढा देउन यशस्वी झाल्याबद्दल अजुन एक पी एच डी दिली तरी हरकत नाही :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

तसेच वंशविद्वेषा विरुद्ध

प्रशान्त पुरकर
Sat, 09/04/2010 - 12:50 नवीन
तसेच वंशविद्वेषा विरुद्ध दुर्धर लढा देउन यशस्वी झाल्याबद्दल अजुन एक पी एच डी दिली तरी हरकत नाही .......... :) :) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

वसंतराव

मिसळभोक्ता
Sat, 09/04/2010 - 20:17 नवीन
बहुतेक वेळा वसंतराव देशपांड्यांना डी. लिट्. देणे वगैरे चांगल्या गोष्टी होतात. वसंतरावांना पुणे विद्यापीठाची रीतसर पी एच डी आहे, संगीत विषयात. (मराठी नाट्यसंगीताची वाटचाल, हा त्यांच्या थीसिसचा विषय होता. त्या थीसिसचा आनंद त्या दोन कॅसेट मध्ये मिळतो. बाकी सगळे थीसिस त्यापुढे झूट !) खरे म्हणाल, तर माझा डीलिट वगैरे वर विश्वास नाही. पण एखाद्या १२ वी पास बिल गेट्स ला तशी पदवी हार्वर्डने दिली, तर त्या पदवीचा सन्मान असे मी म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

सन्माननीय पदवी

इन्द्र्राज पवार
Sat, 09/04/2010 - 22:13 नवीन
"पण एखाद्या १२ वी पास बिल गेट्स ला तशी पदवी हार्वर्डने दिली, तर त्या पदवीचा सन्मान असे मी म्हणतो." ~~ होय. आणि खुद्द हार्वर्डची रितसर पदवी घेणारा युवकवर्गही मॅनेजमेन्टच्या त्या निर्णयाचे स्वागत करेल. आज दहावी पास नसलेल्या सचिनचा 'धडा' त्याच दहावीच्या वर्गासाठी क्रमिक पुस्तकात आहे. हा देखील एक सन्मानच आहे. ~~ वसंतराव, पु.ल., कुसुमाग्रज, पं.भीमसेन जोशी, लतादिदी असो वा सुनील, सचिन असो....या व्यक्तींच्या त्या त्या क्षेत्रातील कर्तबगारीमुळे उलट डी.लिट.सारख्या पदव्यांचीच महती वाढते असे समजले जाते. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

सचीन १०वी पास आहे.

वेताळ
Sat, 09/04/2010 - 22:18 नवीन
मला वाटते त्याला १२वी पास करता आली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

दहावी

इन्द्र्राज पवार
Sat, 09/04/2010 - 22:47 नवीन
नाही. दहावीच. शारदाश्रम विद्यामंदिर हीच त्याची पहिली आणि शेवटची शाळा. वयाच्या १५ वर्षी विनोद कांबळीसमवेत हॅरिस ढाल स्पर्धेतील ती "६६४ ची रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशीप" झाल्याझाल्या त्याची शाळा संपलीच कारण तात्काळ दिलीप वेंगसरकरने त्याला गुजरात विरूध्द्च्या रणजी सामन्यासाठी मुंबई संघात घेतले. तेथील पराक्रमानंतर लागलीच वयाच्या १६ व्या वर्षीच त्याने पाकिस्तान विरूध्द आपली 'पहिली कसोटी' खेळली. मगतर मैदान हेच त्याची शाळा, ज्युनिअर, सीनिअर कॉलेज आणि विद्यापीठ बनले. त्यामुळे बारावीकडे येण्याचा प्रश्न आलाच नाही. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

त्यामुळे बारावीकडे येण्याचा प्रश्न आलाच नाही.

dr sanjay honkalse
Mon, 09/06/2010 - 18:34 नवीन
१० वी नन्तर त्याने मुम्बैचे किर्ती कालेज जोइन केले व १२ ची परी़क्शा पण दिली व अर्थ शास्त्रात दाण्डी उडाली .TRUTH MUST AND DOES ULTIMATELY ALWAYS PREVAIL डा.सन्जय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

काय फरक पडतो अर्थशास्त्रात

मृत्युन्जय
Mon, 09/06/2010 - 20:35 नवीन
काय फरक पडतो अर्थशास्त्रात दांडी उडुन सुद्धा? अर्थार्जनात त्याने पी एच डी केली आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dr sanjay honkalse

गावस्कर यांचा सल्ला

इन्द्र्राज पवार
Mon, 09/06/2010 - 23:43 नवीन
"अर्थार्जनात त्याने पी एच डी केली आहे." ~ १००%. पण तरीही तो लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्यासारखा एम.ए. होऊ शकला असता, थोडेफार कॉलेजकडेही लक्ष दिले असते तर...दॅट इज ! मला वाटते त्याचे (सचिनचे) वडील कै.रमेश तेंडुलकर हे स्वत: किर्ती कॉलेजमध्येच अध्यापन करीत होते. (थोडेसे अवांतर : खुद्द सुनील गावस्कर यांनीसुध्दा सचिनला एक वैयक्तीक पत्र पाठवून कॉलेज शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नको असा सल्ला दिला होता....पण तोपर्यंत 'क्रिकेटचे मैदान' हेच त्याचे विद्यापीठ बनले..!) इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मराठी नाट्यसंगीताची वाटचाल,

राजेश घासकडवी
Sat, 09/04/2010 - 22:46 नवीन
मराठी नाट्यसंगीताची वाटचाल, हा त्यांच्या थीसिसचा विषय होता. त्या थीसिसचा आनंद त्या दोन कॅसेट मध्ये मिळतो. बाकी सगळे थीसिस त्यापुढे झूट !
१०० टक्के सहमत. त्या कार्यक्रमाबद्दल 'तारिफ करने कू, अकल नही है ये बंदे कू' इतकंच म्हणता येतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

सचिन आणि हवाई दलात भरती होणे

हुप्प्या
Sat, 09/04/2010 - 06:28 नवीन
सचिनला हवाई दलाचा अ‍ॅंबेसेडर केला आहे त्यामुळे अनेक गुणी मुले आणि मुली हवाई दलाकडे आकर्षित होतील असा विचार मांडला आहे. एक बुद्धीमान व्यक्ती असल्या थिल्लर सन्मानामुळे असा विचार खरोखर करेल का? सचिनला हा सन्मान देण्यामुळे हवाई दलात खरोखर काही बदल झाला आहे का? नव्याने भरती झालेल्या उमेदवाराला जास्त चांगले काहीतरी करायला, शिकायला मिळेल असे नक्की कशामुळे वाटते? एखाद्या तार्‍याने वा तारकेने अमकी टूथपेस्ट वापरा, अमका साबण वापरा, अमके फसफसणारे पेय प्या असा संदेश देणे आणि हे कितीतरी वेगळे आहे. टूथपेस्ट वगैरे तो तारा खरोखरच वापरत असे अशी शंका तरी घेता येईल. मात्र सचिनने "हवाई दलात भरती व्हा ते एक उत्तम करियर आहे. मीही भरती झालो आहे बघा." असे म्हटले तर त्यावर किती लोक विश्वास ठेवतील आणि जे ठेवतील त्यांची बुद्धीमत्ता काय दर्जाची असेल असे वाटते?
  • Log in or register to post comments

बुद्धीमान

राजेश घासकडवी
Sat, 09/04/2010 - 06:48 नवीन
एक बुद्धीमान व्यक्ती असल्या थिल्लर सन्मानामुळे असा विचार खरोखर करेल का?
पण कदाचित हवाई दलाला तितके बुद्धीमान लोक नको असतील तर? समजा त्यांना केवळ आपल्या प्रिय, पूजनीय व्यक्तीसाठी महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणारे लोक हवे असतील तर? बुद्धीमान लोक कधीकधी वाद घालण्यात वेळ घालवतात, कोणाला तरी नेता मानून त्याची आज्ञा शिरसावंद्य मानण्याऐवजी स्वतःचे विचार खरे करण्याचा प्रयत्न करतात. या गोष्टी एका सैनिकासाठी नेहेमीच चांगल्या असतील असं नाही. सेनाधिकाऱ्यांना स्वतंत्र विचार करावे लागतात हे खरं, पण त्यासाठी हजारांतून एक शोधता येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

ही गोष्ट तर बहुतांश ठिकाणी

Pain
Sat, 09/04/2010 - 06:53 नवीन
ही गोष्ट तर बहुतांश ठिकाणी लागू होते. सांगेल ते ऐकणारे लोक निवडायचे असताना प्रत्येक नोकरीच्या जागेसाठी (सैन्यातसुद्धा) नेतृत्वगुण का तपासले जातात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

बुद्धीमान आणि नेत्तृत्त्वगुण

Nile
Sat, 09/04/2010 - 14:41 नवीन
बुद्धीमान आणि नेत्तृत्त्वगुण एकच आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pain

Nile

Pain
Sun, 09/05/2010 - 08:40 नवीन
बुद्धीमान लोक कधीकधी वाद घालण्यात वेळ घालवतात, कोणाला तरी नेता मानून त्याची आज्ञा शिरसावंद्य मानण्याऐवजी स्वतःचे विचार खरे करण्याचा प्रयत्न करतात. या प्रतिसादकर्त्याला विचारा. हा मुद्दा मी मांडलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

बुद्धीमान लोक कधीकधी वाद

अप्पा जोगळेकर
Sat, 09/04/2010 - 09:11 नवीन
बुद्धीमान लोक कधीकधी वाद घालण्यात वेळ घालवतात +१. सदर धागा हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. एक सरळसोट घटना पण ती एवढी चिवडण्यात काही हंशील आहे असे वाटत नाही. सचिनचे अभिनंदन इतकेच म्हणेन..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

समजा त्यांना केवळ आपल्या

मृत्युन्जय
Sat, 09/04/2010 - 10:50 नवीन
समजा त्यांना केवळ आपल्या प्रिय, पूजनीय व्यक्तीसाठी महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणारे लोक हवे असतील तर?गुर्जी तुमचा युक्तिवाद नेहेमीच बिनतोड असतो पण यावेळेस काही पटला नाही. विषय वायुदलाचा आहे. तिथे भरती होणार्‍यांनी देशासाठी काहीतरी करुन दाखवायची उर्मी आहे म्हणुन किंवा देशावर अतोनात प्रेम आहे म्हणुन भरती व्हायला पाहिजे. एखाद्या पूजनीय व्यक्तीसाठी वायुदलात लोकांना भरती करुन घेण्यात काय हशील आहे. तुम्ही म्हणतात तसे एखादा माणुस केवळ सचिनला कॅप्टनचा दर्जा मिळाला म्हणुन वायुदलात भरती झाला (असे कोणी करेल असे कल्पनेतही वाटत नाही तरी...) तरी त्याला आयुष्यात पुढे कधी सचिनचे नख तरी दिसेल की नाही ही शंका आहे. असा माणुस जर वायुदलाच्या किंवा देशाच्या प्रेमापोटी भरती झाला नसेल तर समरप्रसंगी एकुण आनंद असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

समजा त्यांना केवळ आपल्या

राजेश घासकडवी
Sat, 09/04/2010 - 11:39 नवीन
समजा त्यांना केवळ आपल्या प्रिय, पूजनीय व्यक्तीसाठी महत्त्वाचा निर्णय घेऊ शकणारे लोक हवे असतील तर?
हे थोडं उपरोधाने म्हटलं होतं, पण फार नाही. आता ब्रॅंड अॅंबॅसेडर कोण आहे यावरून पूर्णपणे एखादा निर्णय घेण्याइतका कोणीच बुद्धीहीन नसतो. पण सबकॉन्शसली या गोष्टींची थोडी थोडी भर पडते. सचिन अर्थातच हवाई दलाच्या जाहिरातींमध्ये येईल. या जाहिरातींवरून देखील कोणी निर्णय पूर्णपणे घेत नाही. पण त्यांचा उपयोग त्या निर्णयासाठी मुळात विचार करावा हा असतो. हवाई दलाला सचिन इतका चांगला ब्रॅंड अॅंबेसेडर कुठे मिळणार? त्याचा चेहेरा सगळ्यांना ठाऊक आहे. भारत देशावर असावी तशीच लोकांची सचिनवर भक्ती आहे. तितका अभिमान जागवणारं दुसरं कोण आहे? मुळात सचिनच्या चेहेऱ्यामुळे जे येतील ते बुद्धी वापरून निर्णय घेणाऱ्यांपेक्षा कुठच्यातरी आदर्शापायी हेलावू जाऊ शकणारे असतील ना... (पुन्हा - हा व्यक्तीगत युक्तीवाद नसून सांख्यिकी युक्तीवाद आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मुळात सचिनच्या चेहेऱ्यामुळे

मृत्युन्जय
Sat, 09/04/2010 - 12:00 नवीन
मुळात सचिनच्या चेहेऱ्यामुळे जे येतील ते बुद्धी वापरून निर्णय घेणाऱ्यांपेक्षा कुठच्यातरी आदर्शापायी हेलावू जाऊ शकणारे असतील ना... मला नेमके हेच मत पटत नाही आहे. बाकी सगळे पटले (पटण्यासारखेच लिहिता नेहेमी तुम्ही). प्रश्न हवाइदलाचा आहे. तिथे आदर्शाने हेलावुन जाणारे लोक हवेत हे पुर्ण मान्य. पण हे आदर्श देशासाठी देह अर्पण करणारे महान सैनिकच असावेत. त्यांच्या त्यागाने आणि शौर्याने जर तुमचा स्फुल्लिंग पेटुन निघणार असेल तर त्याला अर्थ आहे. सचिनच्या आकर्षणापायी तसा विचार करणारे सीमेवर लढताना उपयोगी नाहीत. स्वतः सचिनही एकुण टॉप गनमधल्या टॉम क्रुझ मुळे प्रभावित् झालेला वाटतो. असे कुठल्यातरी हीरोमुळे प्रभावित होउन सैन्यदलात प्रवेश घेणारे लोक परिस्थितेचे आणी सैन्यातल्या कडक शिस्तीचे चटके बसल्यावर फटकन विरघळुन नाही गेले तरच नवल. पण तुमचा मुद्दा मला मान्य आहे की सचिन जाहिरात योग्य प्रकारे करु शकेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

वाईट वाटले 'त्या' उल्लेखाने

इन्द्र्राज पवार
Sat, 09/04/2010 - 11:24 नवीन
"सचिनला हवाई दलाचा अ‍ॅंबेसेडर केला आहे त्यामुळे अनेक गुणी मुले आणि मुली हवाई दलाकडे आकर्षित होतील असा विचार मांडला आहे." नाही, असा विचार मी तरी मांडलेला नाही. "तरूणाई ज्या ठिकाणी आहे अशा शैक्षणिक संकुलात सचिन वेळोवेळी अनेक कार्यक्रमांना प्रमुख पाहुणा म्हणून हजर राहील, तर त्यांने आपल्या भाषणात तिन्ही दलात भरतीच्या संधीकडे पाहावे" असे आवाहन करावे ही अपेक्षा असते. तिकडे जावे कि ना जावे अर्थात ही बाब त्या त्या तरूणाची आणि त्याच्या पालकांची वैयक्तिक बाब आहे. "एक बुद्धीमान व्यक्ती असल्या थिल्लर सन्मानामुळे असा विचार खरोखर करेल का?" या वाक्यातील "थिल्लर सन्मान" शब्दप्रयोजन वाचून फार वाईट वाटले. म्हणू नका असे प्लीज. 'ग्रुप कॅप्टन' ही रॅन्क सैन्यदलातील 'कर्नल' शी समकक्ष आहे. सचिनला हा सन्मान मिळाल्यावर तो कार्यक्रम संपला असे नाही. उद्या तो काही निमित्ताने पुण्यातील खडकी कॅन्टोनमेन्टमध्ये गेला तर तेथील ले.कर्नल, मेजर, लेफ्टनंट, सेकंड लेफ्टनंट या पदाच्या अधिकार्‍यांनी खाडकन उभे राहुन त्याला "मानाचा सल्युट" देणे आवश्यक ठरते. शिवाय नॉन-कमिशन्ड ऑफीसर्स (उदा.सुभेदार, नायब सुभेदार) यानी तो जितका वेळ त्या एरियामध्ये फिरेल तो पर्यन्त त्याच्या मागे रक्षकासारखे राहणे अटळ असते. कोणत्याही टेरिटोरियल आर्मी बेस आणि पोलिस हेड्क्वार्टर्समध्ये २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दिवशी "झेंडा" त्याच्या हस्ते फडकविण्याचा आता त्याला (घटनेनुसार) सन्मान प्राप्त झाला आहे. अशा कार्यक्रमाचे जर त्याने निमंत्रण स्वीकारले तर त्याला त्याच्या घरातून आणण्यासाठी 'मेजर' दर्जाचा ऑफीसर आणि चार सशस्त्र जवान तैनात केले जातील. इतकेच नव्हे तर सचिन (ग्रुप कॅप्टनच्या गणवेषात) घरातून बाहेर येऊन त्या मिलिटरी जीपमध्ये स्थानापन्न होईतोपर्यन्त ते अधिकारी रस्त्यावर बाजुला अदबीने उभे राहतील, आणि तो बसल्यानंतर त्याच्या शेजारी फक्त मेजरच बसतील. हा सारा त्या सन्मानातील "प्रोटोकॉल" चा भाग आहे, जो कटाक्षाने आणि मिलिटरी शिस्तीने पाळला जातो. नवी दिल्ली येथे प्रतिवर्षी होत असलेल्या "प्रजासत्ताक दिन परेड" च्या सन्माननीय निमंत्रितांच्या रांकेत "ग्रुप कॅप्टन सचिन तेंडुलकर" यांच्यासाठी खास खुर्ची राखीव ठेवणात येईल. सचिन आपल्या पत्नी आणि अपत्यासमवेत या प्रसंगी दिल्लीत हजर राहिलाच तर त्याना त्या रात्री राष्ट्रपती भवनावर होणार्‍या (परदेशातून आलेल्या सन्माननीय पाहुण्यांच्यासमवेत) भोजनाचे आमंत्रण असते व त्याची त्या पाहुण्यांना ओळख करून देणात येते. या आणि तत्सम घडामोडीचा मान "थिल्लर" कॅटेगरीत येतो का? इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

थिल्लर

हुप्प्या
Sat, 09/04/2010 - 17:53 नवीन
सचिन हा क्रिकेटचा बादशाह आहे पण हवाई दलाकरता काही केलेले नसताना इतके राजेशाही सन्मान त्याला देणे गैरलागू वाटते. हवाई दलाला टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, ब्रेकफास्ट सिरियल, साबण, दुधात घालायची कुठलीशी पावडर ह्यांच्या पंक्तीत बसव्ल्यासारखे वाटते आणि हे अत्यंत उथळ वाटते. केवळ अमक्या क्षेत्राकडे लोकांनी यावे म्हणून कुठल्याशा सेलेब्रिटीला उच्चपदस्थ सदस्य बनवणे ज्याचा त्या क्षेत्राशी काही संबंध नाही हे अगदीच सवंग आहे. हा सन्मान समजा दिला नसता आणि हवाई दलाने त्याला कार्यक्रमासाठी निमंत्रित केले असते आणि तिथे त्याने एक पाहुणा म्हणून हवाई दलाची महती सांगितली तर फार वेगळे काय झाले असते? काही वर्षापूर्वी गोविंदाला मराठी नाट्य संमेलनात कुठल्याशा सन्माननीय पदावर नेमले होते त्याची आठवण झाली. केवळ गर्दी वाढवण्याकरता. असो. आंधळ्या भक्तीपुढे तर्क, वाद फारसा उपयोगी नसतो. .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

आता काय बोलणार?

वेताळ
Sat, 09/04/2010 - 18:05 नवीन
गोविंदा आणि सचीन ची तुलना तुम्ही करता,अश्या थिल्लर विचारसरणीच्या लोकांशी कसा वाद घालायचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

आकलनशक्तीची कीव वाटते

हुप्प्या
Sat, 09/04/2010 - 18:35 नवीन
अहो ही दोन घटनांची तुलना आहे. गोविंदा आणि सचिनची तुलना नाही आणि मराठी नाट्यसंमेलन आणि हवाई दलाचीही नाही. एका संस्थेने आपल्या क्षेत्राशी संबंध नसलेल्या वलयांकित व्यक्तीला केवळ गर्दी खेचण्याकरता, ग्लॅमरकरता सन्माननीय पद देणे हे ह्या दोन घटनांमधले साम्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

ग्रुप कॅप्टन सचिन तेंदुलकर

llपुण्याचे पेशवेll
Sat, 09/04/2010 - 09:17 नवीन
ग्रुप कॅप्टन सचिन तेंदुलकर बरं . कमीतकमी वायुसेनेला ड अक्षराचं वाकडं असावं.
  • Log in or register to post comments

घटनेतील तरतूद

इन्द्र्राज पवार
Sat, 09/04/2010 - 10:13 नवीन
वरील सर्व प्रतिसादांना (दोन्ही प्रकारचे ~ मान दिल्याबद्दल खुषीचे वा नाखुषीचे) एकत्रीत उत्तर देण्याचा हा प्रयत्न : "देशाची सेवा" या सदराखाली येणारी जी व्याख्या आहे तिचे स्वरूप केवळ "सैनिक" या संज्ञेशी मर्यादित नसून देशाच्या जडणघडणीत, नावलौकिकात भर घालणार्‍या, विविध क्षेत्रात जगाच्या नजरेत भरणारी कामगिरी करणार्‍या सामान्य 'नागरिक' ला देखील तीत स्थान देणारी आहे. विद्यापीठ ज्यावेळी डी.लिट.चा मान एखाद्या कर्तबगार व्यक्तीला प्रदान करते त्यावेळी ती व्यक्ती 'शिक्षणक्षेत्रा'शीच निगडित असली पाहिजे असा दंडक अजिबात असत नाही (उदा.लता मंगेशकर). डी.लिट. ही जशी शिक्षणाशिवाय इतर क्षेत्रातील सेवेची/कार्याची/कर्तबगारीची पावती आहे, तद्वतच त्यातून समाजातील त्या व्यक्तीने समाजासाठी दिलेले योगदान (इथे पैशाचा प्रश्न नाही, म्हणजे 'त्याने/तिने त्या क्षेत्रातून काय कमी पैसा मिळविला आहे काय? तो पैसा गरीबांत वाटला आहे काय?" असले सदासर्वकाळ उपस्थित होणारे प्रश्न साहजिकच विचारत घेता येत नाहीत.) किती महत्वाचे आहे हीच गोष्ट सन्मानाच्या कारणाची यथार्थता अधोरेखीत करीत असते. सचिन तेंडुलकर याच्या (त्याच्या क्षेत्रातील) कर्तबगारीबद्दल काही न लिहिलेलेच बरे, कारण वयगट १० ते १०० यात येणार्‍या प्रत्येक क्रिडाप्रेमींना ते माहित आहे. त्या कर्तबगारीला भारतीय हवाई दलाने दिलेली एक सलामी इतपतच त्या "ऑनररी ग्रुप कॅप्टन" पदाचे महत्व. असे असले तरी 'सचिन' ही एकमेव व्यक्ती अशा 'मानद' सन्मानाला पात्र ठरली असे नाही. आज २०१० साली हा मान एकाला मिळाला पण सन १९४४ साली जोहारचे राजे यशवंत राव याना त्यावेळेच्या एअर फोर्सने 'फ्लाईट लेफ्टनंट' ही मानद पदवी दिली होती आणि ते राजे असा मान मिळविणारे पहिले "सिव्हिलियन" ठरले होते. त्यानंतर तब्बल १९७४ मध्ये जेआरडी टाटा. (आतापर्यंत असे एकूण २० 'मानद' झाले आणि सचिन २१ वा.). डी.लिट.सम पद्धतीची तरतूद खुद्द आपल्या घटनेत केली असून त्या अनुषंगाने ही तिन्ही दले हा निर्णय घेतात. सचिनला दिलेल्या मानपत्रातील खालील वाक्यरचना पाहातील~~ "Under the provision of grant of honorary rank by Armed Forces to eminent personalities acknowledging their contribution towards the nation, the President and the Supreme Commander of the Armed Forces of India is pleased to confer Sachin Ramesh Tendulkar the honorary rank of Group Captain of the Indian Air Force,” (या रचनेतील 'eminent personalities' हा उल्लेख फार महत्वाचा आहे, जो केवळ क्रिडा नव्हे तर अन्य क्षेत्रालाही समानार्थाने लागू होतो.) म्हणजेच हा निर्णय एकट्या एअर फोर्सचा नसून घटनेतील तरतुदीनुसार राष्ट्रपती आणि तिन्ही दलाचे सुप्रीम कमांडर यांनी घेतलेल्या निर्णयानुसार हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे. या अगोदर सेनादलानेदेखील कपिल देव यांना 'लेफ्ट्नंट कर्नल' हे मानद पद दिले आहे. आता या सन्मानामुळे वा सचिनमुळे महाराष्ट्रातील तरुण मोठ्या संख्येने हवाई दलात भरती होतील का? देशाची सेवा करण्याची त्यांच्यात उर्मी जागृत होईल का? आदी रास्त प्रश्न जरी कुणाच्या मनात उभे राहत असले तरी त्या प्रश्नांचे उत्तर शोधत असताना, त्यामुळे सचिनला असे सन्मान मिळू नयेतच असेतरी कृपया म्हणू नये. कितीही झाले तरी तो आणि लतादिदी 'आपले' आहेत. इन्द्रा
  • Log in or register to post comments

सचिनचे हार्दिक अभिनंदन......

वेताळ
Sat, 09/04/2010 - 10:31 नवीन
इंद्रा माझ्या आवडत्या खेळाडुबद्दल लिहल्याबद्दल पण मी आभारी आहे.सचिनला ही जी पदवी दिली आहे त्यामुळे सचीनची लोकप्रियता वाढली असे म्हणणे चुकीचे आहे. सचीन कडे एक लक्ष्य आहे,एक जिद्द आहे व ती पुरी करण्यासाठी घ्यायला लागणार्‍या प्रचंड मेहनतीस हो सदैव तयार असतो.सचीन कडुन खुपश्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्याचा आदर्श घेवुन कोणी पायलट झाले तर त्या व्यक्तीचे कर्तुत्व कमी होईल असे मला तरी वाटत नाही. परत एकदा सचीनचे हार्दिक अभिनंदन.....
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा