फसवणूक प्रकरण २२
मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये प्रोग्रॅमर म्हणून काम करतो. तेथे माझ्या स्वतःच्याच बाबतीत घडलेली एक छोटीशी घटना. सुमारे २ वर्षांपूर्वी मी या कंपनीत पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून रुजू झालो. २००९ सालच्या जानेवारी महिन्यात कंपनीला एक अजस्त्र बजेट असलेले अमेरिकन प्रोजेक्ट मिळाले आणि एप्रिल २००९ मध्ये रीतसर इंटरव्ह्यू घेउन आधीच्या प्रोजेक्टवरुन या प्रोजेक्टवर मला रुजू करण्यात आले. या प्रोजेक्टचे वैशिष्ट्य हे की एखाद्या माणसाच्या क्षमतेबद्दल जराशीसुद्धा शंका आली तरी त्या माणसाला ताबडतोब कामावरुन कमी करण्यात येत असे. त्यामुळे प्रोजेक्ट जरी खूप चांगले असले तरी ती सुळावरची पोळीच होती. ५० माणसांच्या प्रोजेक्ट्मधून जवळपास १५-२० माणसांना २ महिन्यांत अशा प्रकारे कमी करण्यात आले. रेसेशन संपायला सुरुवात झाली आणि ऑक्टोबर ०९ पासून लोकांनी धडाधडा राजीनामे द्यायला सुरुवात केली. आणि मॅनेजमेंट्ची मस्ती उतरायला सुरुवात झाली. डिसेंबर महिन्यापर्यंत लोकांची गयावया करण्यापर्यंत मजल गेली आणि जे सोडून गेले त्या जागी जे मिळतील ते लोक भरण्यात आले. सहा महिन्यांपूर्वी हात सोडून बोलणी करणारे आता हात जोडून बोलणी करु लागले. मे २०१० मध्ये मला इन्क्रिमेंट लेटर देण्यात आले. इन्क्रिमेंट जूनपासून लागू होईल आणि विथ एफेक्ट फ्रॉम एप्रिल असेल असे लेटर मध्ये लिहिले होते. शिवाय हे इन्क्रिमेंट कोन्फिडेन्शियल असून कुठेही डिस्क्लोज करु नये असे सांगितले गेले. हे लपवाछपवीचे धंदे पाहून हे लोक विश्वासार्ह नाहीत अशी शंका त्याच वेळी माझ्या मनात डोकावून गेली होती. पण २८% इन्क्रिमेंटची नशा वास्तविकतेच्या जाणीवेपेक्षा जास्त प्रबळ असावी. २००९ मध्ये ४०% आणि २०१० मध्ये २८%. लॉटरी लागली आहे असंच मला वाटत होतं. जॉब चेंज करण्याचा विचार डोक्यात रेंगाळत होता तो सोडूनच दिला. जून गेला, जुलै गेला पण इन्क्रिमेंटचा पत्ता नाही. मॅनेजरला मेल टाकला तर स्पीड (या कंपनीत इन्क्रिमेंट साठी जी प्रोसेस आहे त्यास 'स्पीड' असे म्हणतात.) चालू आहे असे सांगण्यात आले.ऑगस्ट महिन्यात वैतागून मी समोरासमोर बसून काय ते रोखठोक विचारु असे ठरवले होते. पण त्याआधीच मॅनेजरने मला बोलावून घेतले. आणि गोड गोड शब्दांमध्ये तुला ४ आउट ऑफ ५ रेटिंग देण्यात येत आहे. तुझी या कंपनीला जरुरी आहे. कोणताही नविन निर्णय घेण्याआधी आमच्याशी बोलून घे. धिस इज अॅन ओपन वर्ल्ड वगैरे चर्पटपंजरी ऐकवली. त्यानंतर आमच्या कडून प्रोसेस संपायला उशिर झाला याबाबत दिलगिरी व्यक्त करण्यात आली. मीसुद्धा सलग दोन वर्षं चांगल्यापैकी रेटिंग मिळाल्याने थोडासा हवेतच होतो. शेवटी या महिन्याच्या सॅलरी मध्ये इन्क्रिमेंट रिफ्लेक्ट झाले ते १३% च्या कॅलक्युलेशने. लेखी कमिटमेंट देताना २८% आणि प्रत्यक्ष देताना १३%. तेसुद्धा इतक्या उशिरा. आणि तेदेखील विथ इफेक्ट फ्रॉम अप्रिल नाही तर गेल्या महिन्यापासून. वा! मी तर सर्दच झालो. कारण नसताना त्या लेटर वर अवलंबून राहिलो. लेखी कमिटमेंट आहे म्हणून अगदी निर्धास्तपणे विश्वास ठेवला. आता मॅनेजरला आणि एचआर ला एक खरमरीत इ-मेल पाठवणार आहे. पण त्याने काही फारसा फरक पडेल असं वाटत नाही. पण याहून अधिक काही करुही शकत नाही. आणि मर्यादेच्या बाहेर जाउन या लोकांशी पंगाही घेउ शकत नाही. आणि समजा या लेटरने फरक पडला तरी माझा काही या मॅनेजमेंटवर विश्वास राहिलेला नाही. असो. तुम्हाला असा अनुभव आला आहे का ?
- (नविन जॉबच्या शोधात) अप्पा
प्रतिक्रिया
अप्पा आपल्या हिंदूस्थानात
युनियन हवी ....>>> सहमत
फसवणूक भाग - ****
सगळी मालक लोक एकाच माळोच मनी
मालक्-नोकर
...आपली लाळ गळते, हेच
>>समाजात चोर असतात हे वास्तव
मी वर जे उदाहरण दिलं त्या
अरे रे ! फसवणुकीचा बदला
मंडळी, घण मोडून पडणार अशी