संगणकाच्या मदतीने उत्कृष्ट लेखक बनण्याची कळा

संतोषएकांडे's picture
संतोषएकांडे in जनातलं, मनातलं
31 Aug 2010 - 7:25 pm

विषय नक्की करा. संगणक चालू करा. गूगल ओपन करा. निवडलेला विषय त्यांत टाका.
अँटर द्या. कमीत कमी सात आठ फाइली तरी आढळतील. प्रत्येकीतून दोन चार पॅरेग्राफ
कॉपी करून ' एक्सेल वर्ड ' मधे पेस्ट करा. नविन फाइल ओपन करून त्यात सेव केलेले
पॅरेग्राफ्स इकडे तिकडे कुठेही जागा मिळेल तिथे पेस्त करा. आणी ब्लोग वर प्रकाशित करा
बरेचशे वाचतील. बर्याचशांनां कळणार नाही. पण घाबरायचे कारण नाही. ते समजतील,
' लेखक उंच दर्ज्याचा आहे....' बरेचशे प्रतिभाव मिळतील. आणि एक उत्कृष्ट लेखक म्हणून
प्रसिध्ध व्हाल. एकदम पक्की ग्यारंटी.

विनोदमौजमजाआस्वाद

प्रतिक्रिया

अवलिया's picture

31 Aug 2010 - 7:26 pm | अवलिया

आयला जबरा पाककृती !
करुन पहातोच !!

बाकी हा लेख लिहायला तुम्ही काय सर्च केलं होतं?

विषय नक्की करा. संगणक चालू करा. गूगल ओपन करा. निवडलेला विषय त्यांत टाका.
अँटर द्या. कमीत कमी सात आठ फाइली तरी आढळतील. प्रत्येकीतून दोन चार पॅरेग्राफ
कॉपी करून ' एक्सेल वर्ड ' मधे पेस्ट करा. नविन फाइल ओपन करून त्यात सेव केलेले
पॅरेग्राफ्स इकडे तिकडे कुठेही जागा मिळेल तिथे पेस्त करा. आणी ब्लोग वर प्रकाशित करा
बरेचशे वाचतील. बर्याचशांनां कळणार नाही. पण घाबरायचे कारण नाही. ते समजतील,
' लेखक उंच दर्ज्याचा आहे....' बरेचशे प्रतिभाव मिळतील. आणि एक उत्कृष्ट लेखक म्हणून
प्रसिध्ध व्हाल. एकदम पक्की ग्यारंटी.

मराठी संस्थळावरील दखल घेण्याजोग्या काही लेखांमधील एक लेख आहे हा.

डोळ्यात फक्त पाणी यायचं बाकी राह्यलय.

सुंदर!!

संतोष फॉर्मात! मस्त संतोष मस्त. खूप आनंद दिलात या लेखानी.

बादवे, 'एक्सेल वर्ड' याबद्दल थोडं लिहिलंत तर अजून आनंद होईल!

--परासुर

मेघवेडा's picture

31 Aug 2010 - 7:38 pm | मेघवेडा

>> बादवे, 'एक्सेल वर्ड' याबद्दल थोडं लिहिलंत तर अजून आनंद होईल

असेच म्हणतो. गोराईच्या 'एस्सेल वर्ल्ड' ला बरेच जण 'एक्सेल वर्ड' म्हणतात म्हणे! =)) =))

बेसनलाडू's picture

31 Aug 2010 - 11:45 pm | बेसनलाडू

रुपारेल कॉलेजला बृहन्मुंबई प्रज्ञा शोध, राष्ट्रीय प्रज्ञा शोध इ. परीक्षांची तयारी करून घेणार्‍या प्रशिक्षण वर्गाचे बादवे आडनावाचे मुख्याध्यापक होते. त्यांचे आडनाव बादवे, बडवे की अजून काही यांवर आजवर कुणाचे एकमत झाले नाही. मास्तर अगदी खाष्ट, आगाऊ प्रकारात मोडणारे होते. असो. वरच्या प्रतिक्रियेतील बाय द वे चे बादवे झालेले पाहून मास्तरांची आठवण झाली.
(प्रज्ञावंत)बेसनलाडू

असुर's picture

31 Aug 2010 - 11:53 pm | असुर

आमच्या काही लिहिण्यामुळे शत्रूपक्षातल्या लोकांची आठवण होत असेल तर दोष आमचा आहे. मुख्याध्यापक, मास्तर वगैरे लोकांना मी लहानपणापासून प्रामाणिकपणे घाबरतो. आपल्यात कोणी त्यातला असेल तर या प्रतिसादाबद्दल मनापासून सॉरी.
यापुढे नक्की "बाय द वे" असेच लिहेन. आत्तासुद्धा चान्स असता तर जुने बदलून बाय द वे केले असते!

--(शाळेपासूनचा) असुर

बेसनलाडू's picture

1 Sep 2010 - 12:02 am | बेसनलाडू

ऐकताय ना?
(विद्यार्थी)बेसनलाडू

प्रचेतस's picture

31 Aug 2010 - 8:19 pm | प्रचेतस

>>लेखक उंच दर्ज्याचा आहे....' बरेचशे प्रतिभाव मिळतील. आणि एक उत्कृष्ट लेखक म्हणून
प्रसिध्ध व्हाल. एकदम पक्की ग्यारंटी.

कालांतराने वाचकांना त्यातील फोलपणा पटायला लागेल. उचलाउचली कळायला लागेल. हुशार ब्लॉगर्स विशेषतः ज्यांचे लेखनअंश त्यात सामावले गेले आहेत ते पाळेमुळे खणायला लागतील. काही जण अजून पुढे जाउन सायबर गुन्हा विभागात तक्रार दाखल करतील. तत्पर पोलीस खाते लगेच दखल घेइल. लवकरच हातात बेड्या पडतील. एकदम पक्की ग्यारंटी.