कविता माझी होशील का ?
कविता माझी होशील का ?
भेटलीस तू अवचित मजला,
प्रीतिचा नव वसंत फुलला,
प्राजक्त होऊनी वसंतातले,
कवनी माझिया बरसशिल का ?
कविता माझी होशील का ?
रिमझिम रिमझिम पावसातल्या,
च्रोरून अपुल्या भेटीगाठी,
आठवणीत त्या चिब होऊनी,
कवनी ओलेती प्रगटशिल का ?
कविता माझी होशील का ?
काय जाहले गमे न मजला,
आभासे तू ठायी ठायी,
आभासांचे गंध होऊनी,
कवना गंधित करशिल का ?
कविता माझी होशील का ?
सांगायचे मज बरेच काही,
मनांत तुझिया तसेच विरले,
उकलूनीया ती गुपिते सगळी ,
कवन सांगता करशील का ?
निरंजन वहाळेकर
कविता मस्त आहे.
छान आहे कविता ..
तुमची कोणी कविता नावाची
हेच