तात्याचे हाटेल

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
4 Apr 2008 - 6:12 pm
गाभा: 

आजचे पटलावरचे सगळे विषय पाहीलेत का?
अगदी ठरवुन सुद्धा असे होणार नाही.
सगळे विषय वाचा
१ काय जेवलात.....
२ कोल्हापुरी मिसळ ( फसलेला अनुभव)
३ चिकन६५ स्टार्टर
४ चिकनसाग
५ पांढरा रस्सा
६ संडे स्पेशल ( व्हेज मान्चुरीअन)
७ खयाली पुलाव
८ संडे स्पेशल (खांडवी)
९ मांचुरियन आणि शेजवान !
१० चहा .........
.....झाले तात्याच्या हाटीलाचे मेन्युकार्ड.....
हाय का नाय

प्रतिक्रिया

मीनल's picture

4 Apr 2008 - 6:14 pm | मीनल

तात्याच्या हाटीलाचे नाव ?????
अर्थातच --मिसळ पाव

स्वाती राजेश's picture

4 Apr 2008 - 6:25 pm | स्वाती राजेश

हे नाव असेल...

प्रभाकर पेठकर's picture

4 Apr 2008 - 8:09 pm | प्रभाकर पेठकर

'अनुष्कता' कसे वाटते?

ब्रिटिश टिंग्या's picture

4 Apr 2008 - 6:28 pm | ब्रिटिश टिंग्या

दिसत नाय ते.....येखादी आईसक्रीमची पाकृ येउ देत......

(३ कोर्सप्रेमी) टिंग्या :)

धमाल मुलगा's picture

4 Apr 2008 - 6:32 pm | धमाल मुलगा

टि॑ग्या..
चा घ्यायला क॑पलसरी आमच्या ५ मजली 'चहा-महाल' लाच याच॑!!!!

- (चहा-महाल डायरेक्टर बोर्डाचा मे॑बर) ध मा ल.

रिमझिम's picture

4 Apr 2008 - 6:33 pm | रिमझिम

काय फक्त मेनु कार्ड वाचायच,ओ विजुभाऊ ऑर्डर लिहुन घ्यायला कोनि आहे की नाही :)
फार भुक लागली आहे हो

(उपाशी )रिमझिम

विसोबा खेचर's picture

4 Apr 2008 - 6:33 pm | विसोबा खेचर

मुखपृष्ठावरील आजची खादाडी सदरातलं 'झुणकाभाकर' विसरलात की काय राव?! :)

असो, चार लोकं एकत्र येताहेत, खादाडीच्या गप्पा मारताहेत आहेत, मजा-धमाल करताहेत हेच खूप चांगलं आणि छान आहे.

काही ठिकाणहून, 'मिसळपाव ना? तो फक्त एक गप्पा आणि टीपीचा अड्डा आहे. तिथे गंभीर लेखन काहीच होत नाही, त्यापेक्षा इतर काही संस्थळं शिल्लक आहेत' असे काही प्रचाराचे सूर व काही खरडी खरडल्या जात आहेत, आणि त्या खरडींना चोख उत्तरही खरड प्राप्त झालेल्यांकडून दिले जात नाही, मिपाच्या सन्मानाखातर त्या खरडीचा खरपूस समाचारही घेतला जात नाही, उलटपक्षी उत्तरादाखल "व्यवस्थेत राहून मिपाला सुधारायच्या" गोष्टी काही लोक करत आहेत!

अर्थात, अश्या अस्तनींतल्या निखार्‍यांची आम्हाला फिकीर नाही!!

अरे, अजून तात्याच जिथे सुधारला नाही, तिथे मिपा काय सुधारणार कप्पाळ?! :)

त्यापेक्षा, आपलं हे जे काही छोटं टपरीवजा हाटेल आहे ते बरं आहे! घटकाभर बसा, मिसळपाव खावा, ताक प्या, सुखदु:खाच्या, आपुलकीच्या चार गप्पा मारा, थोडेसे भांडा आणि पुन्हा चालू पडा आपापल्या कामधंद्याला!

काय मंडळी, खरं की नाही? :)

आपलाच,
तात्या मिसळपावकर.

पिवळा डांबिस's picture

5 Apr 2008 - 11:09 am | पिवळा डांबिस

'मिसळपाव ना? तो फक्त एक गप्पा आणि टीपीचा अड्डा आहे. तिथे गंभीर लेखन काहीच होत नाही, त्यापेक्षा इतर काही संस्थळं शिल्लक आहेत' असे काही प्रचाराचे सूर व काही खरडी खरडल्या जात आहेत
भो**त गेले ते लोक! उलट आम्हाला अभिमान आहे की मिपा हा गप्पांचा अड्डा आहे. गंभीर लेखन घालायचं असेल तर इतर ठिकाणी नेऊन घाला की लेको! आणि गंभीर म्हणजे तरी काय, दुसर्‍या कुठल्यातरी प्रसिद्ध लेखकाची स्टाईल कॉपी करायची आणि त्याच स्टाईलमधे पांढर्‍यावर काळे करायचे हेच की नाही? आम्ही काय मूर्ख आहोत का की आम्हाला ते ओळखता येत नाही?
मला खरंखरं सांग की या तथाकथित गंभीर लेखनामध्ये किती वेळा ही कुणाची नक्कल आहे ते ओळखता येत नाही? आम्ही काय चार मराठी पुस्तकं वाचली नाहीत का? उगाच काय घेऊन दुख्खी: होतोस तू? "रोशनी" लिहायला गटस लागतात, नवीन अनुभवांची प्रचीती लागते हे काय आम्हाला कळत नाही का? "बसन्तचं लग्न" लिहायला एक निराळा विचार, द्दृष्टिकोन लागतो!! शुद्धलेखनाचे नियमांविषयी चर्चा करणे अगदी सोपे (आणि नीरस व निरुपद्रवी) असते!!

"व्यवस्थेत राहून मिपाला सुधारायच्या" गोष्टी काही लोक करत आहेत!
हे तर अगदीच हास्यास्पद!! भाईकाकांच्या शब्दांत सांगायचे तर " अहो शाळेत मास्तरांच्या छड्या खाऊन जे जमलं नाही ते असं कुणी सुधारून का होणार आहे?" आम्ही हे असेच! एकतर जुळवून घ्या नाहीतर दुसरीकडे जा!!!:)))

आपलं हे जे काही छोटं टपरीवजा हाटेल आहे ते बरं आहे! घटकाभर बसा, मिसळपाव खावा, ताक प्या, सुखदु:खाच्या, आपुलकीच्या चार गप्पा मारा, थोडेसे भांडा आणि पुन्हा चालू पडा आपापल्या कामधंद्याला!
आता कसं बोललास! आमचं हेच उद्दिष्ट आहे. संपादकांचा आशिर्वाद आहे हे वाचून खूप बरं वाटलं!:)))
आम्हाला यातच अभिमान आहे. जनरल डायरांविषयी म्हणायचं तर एकच मागणं,
"अहंकाराचा वारा, न लागो राजसा|
माझ्या विष्णुदासा, भाविकासी||"

आपलाच,
पिवळा डांबिस

इनोबा म्हणे's picture

5 Apr 2008 - 2:48 pm | इनोबा म्हणे

भो**त गेले ते लोक! उलट आम्हाला अभिमान आहे की मिपा हा गप्पांचा अड्डा आहे. गंभीर लेखन घालायचं असेल तर इतर ठिकाणी नेऊन घाला की लेको
बरुब्बर बोललास डांबीसा!
आयुष्यात सदा गंभीरच राह्यचे असेल तर खुशाल रहा लेकांनो,पण आम्ही मनमोकळ्या गप्पा मारल्या तर तुमच्या बा चे काय गेले?

एकतर जुळवून घ्या नाहीतर दुसरीकडे जा!!!:)))
हेच म्हणतो. तरीही मिपाच्या नावाने बोंब मारणारे मिपावरुन हलायला तयार नाहीत. हीच तर मिपाची ताकत आहे.

आपलं हे जे काही छोटं टपरीवजा हाटेल आहे ते बरं आहे! घटकाभर बसा, मिसळपाव खावा, ताक प्या, सुखदु:खाच्या, आपुलकीच्या चार गप्पा मारा, थोडेसे भांडा आणि पुन्हा चालू पडा आपापल्या कामधंद्याला!
तात्या, अरे आमच्यासाठी ही टपरी फाईव स्टार पेक्षा कमी नाही.

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

विसोबा खेचर's picture

5 Apr 2008 - 3:18 pm | विसोबा खेचर

"रोशनी" लिहायला गटस लागतात, नवीन अनुभवांची प्रचीती लागते हे काय आम्हाला कळत नाही का? "बसन्तचं लग्न" लिहायला एक निराळा विचार, द्दृष्टिकोन लागतो!!

धन्यवाद रे डांबिसा...

शुद्धलेखनाचे नियमांविषयी चर्चा करणे अगदी सोपे (आणि नीरस व निरुपद्रवी) असते!!

हा हा हा! :)

जनरल डायरांविषयी म्हणायचं तर एकच मागणं,
"अहंकाराचा वारा, न लागो राजसा|
माझ्या विष्णुदासा, भाविकासी||"

नाही, अहंकाराचा वारा कधीच लागणार नाही! जे आमच्याशी सरळ आहेत, आमच्या भल्याकरता वेळप्रसंगी आमचे दोषही आम्हाला दाखवून देतात, आम्ही त्यांच्या जिवाला जीव देऊ, परंतु जे विनाकारण आमच्याशी नडतात, आमचा आणि मिपाचा यथेच्छ द्वेष करतात (वास्तविक द्वेष करावं असं आमच्याकडे काहीही नाही,) त्यांना मात्र आम्ही झोडणार आणि त्यांचाशी अहंकरानेच वागणार! नाठाळाच्या डोक्यात काठी मारायलाच आम्हाला तुकोबाने शिकवलं आहे! :)

आम्हीदेखील एका संस्थळाच्या मालकाला अगदी यथेच्छ शिव्या दिल्या, परंतु जोपर्यंत आम्ही त्या संस्थळावर सक्रीय होतो, तिथे लिहीत होतो, तोपर्यंत कधीही नाही! जे काय केलं ते तिथून बाहेर पडल्यावर! तिथल्या कडक शिस्तीच्या, सभ्य, सुसंस्कृत, इस्त्रीच्या, सुरकुतलेल्या लांब चेहेर्‍याच्या वातावरणाला क़टाळून आम्ही तेथून बाहेर पडलो! अहो आम्हाला अजून 'सभ्य', 'सुसंस्कृत' या शब्दांचे धड अर्थही माहीत नाहीत! :)

तात्या, अरे आमच्यासाठी ही टपरी फाईव स्टार पेक्षा कमी नाही.

धन्यवाद इनोबा! हे वाचून भरून पावलो! :)

आपला,
(कृतज्ञ) तात्या.

मनापासुन's picture

4 Apr 2008 - 8:59 pm | मनापासुन

अरे वा.........
चांगले ५ स्टार हाटेल आहे की....
पण विजुभौ.या इथे अजुन काय काय मिळते...
तुमचे शेफ्फ कोण कोण आहेत.
मला वाटते.स्वाति तै ( दोन्ही) का? आन पब्लिकशीट्टी कोण प्राजु तै का?
बार बीर काही नाही का? आश्चर्य आहे तात्याच्या हाटेला हे तसले काही नाही........
पण बाकी काही असो ते आईस्क्रीम चे बघाकी आन काय तरी गोडाचे बी
झालेच तर स्रुष्टी तै ना पण सांगा इथे यायला.
असे मला लई मनापासुन वाटतय.

विजुभाऊ's picture

5 Apr 2008 - 10:15 am | विजुभाऊ

तुमचे शेफ्फ कोण कोण आहेत.
मुख्य शेफ्फः
दुसरे कोण अर्थात स्वाती राजेश.
त्यांच्या शिवाय हायेच कोण.
बाकी लोक
कॅप्टन : जुना अभिजीत
कौंटर वर :स्वतः तात्या
बार बीर काही नाही का? आश्चर्य आहे तात्याच्या हाटेला हे तसले काही नाही........
त्यातले तज्ञ सध्या सगळे प्रकार टेस्ट करण्यात गुंग आहेत. तरी पण डांबीस काका त्या लोकाना गाईड करत आहेत.
पण बाकी काही असो ते आईस्क्रीम चे बघाकी आन काय तरी गोडाचे बी

आईसक्रीमचे मी कोणाच्या तरी आईस विचारतो.
गोडाचे पदार्थ येताहेत्...फक्त ते पुण्याचे चितळे की मुम्बैचे पंजाबी घसीटाराम हलवाई यापैकी कोणाकडुन ते ठरवतोय

पिवळा डांबिस's picture

5 Apr 2008 - 10:28 am | पिवळा डांबिस

जरा चुकलांत!
मुम्बैचे पंजाबी घसीटाराम हलवाई
ते तोतया!! खर्‍या मुंबयकरांचे (मुंबईकरांचे नव्हे) फक्त चन्दू हलवाई कराचीवाले!! दादर टी. टी.!!

बेसनलाडू's picture

5 Apr 2008 - 12:06 pm | बेसनलाडू

आणि चन्दूबरोबरच त्याच्या समोरचा डी दामोदर आणि श्रीखंडासाठी बीबी दादरचा पणशीकर ;) काय काका बरोबर ना?
(पुतण्या)बेसनलाडू

पिवळा डांबिस's picture

5 Apr 2008 - 12:43 pm | पिवळा डांबिस

आणि बुंदीचे लाडू चांदोरकरांकडचे!!

रामदास's picture

5 Apr 2008 - 10:48 am | रामदास

उधारी भेटेल.पगाराला हिसाब. घरी नेण्यासाठी मीठा पान्.तात्याला मघई जोडी. (वरख लावून)

शरुबाबा's picture

5 Apr 2008 - 11:11 am | शरुबाबा

आपलं हे जे काही छोटं टपरीवजा हाटेल आहे ते बरं आहे! घटकाभर बसा, मिसळपाव खावा, ताक प्या, सुखदु:खाच्या, आपुलकीच्या चार गप्पा मारा, थोडेसे भांडा आणि पुन्हा चालू पडा आपापल्या कामधंद्याला!

हेच खरे आहे

विजुभाऊ's picture

5 Apr 2008 - 12:44 pm | विजुभाऊ

चार गप्पा मारा, थोडेसे भांडा ... हाच जर काम धन्धा असेल तर?
मला हे माझ्या कामाचा भाग म्हणुन हे करावे लागते......
मी चालु पडलो तर कामधन्धा कसा करु..........