रेसीपी हवी आहे... रबडी / बासुंदी

जाई अस्सल कोल्हापुरी's picture
जाई अस्सल कोल्हापुरी in पाककृती
29 Jul 2010 - 3:13 pm

दिर्घकाळ टिकाऊ दुधा (long life milk) पासुन किंवा टिनबंद आटिव दुधापासुन (condenced milk) बासुंदी बनवता येते का? कशी बनवायची?

प्रतिक्रिया

अवलिया's picture

29 Jul 2010 - 3:34 pm | अवलिया

मला माहित आहे.

पण एका ओळीच्या असल्या धाग्यांवर प्रतिक्रिया देउ नये असे अभिजनांचे मत आहे आणि अशा त-हेच्या पृच्छा एका ओळीत न करता कशा केल्या म्हणजे प्रतिक्रिया देणे योग्य असते याचा खुलासा अभिजनांनी अजुन न केल्याने प्रतिसाद देउ शकत नाही.

(बहुजन)

सुरुवातीला भरपूर अवांतर लिहून - जसं गोडधोड कोणाला आवडत नाही अगदी साक्षात देव गणपती मोदकप्रिय समजला जातो वगैरे वगैरे पाल्हाळ लावलं मग ते कितीही "टॅकी" असेना.... की काही लोकांना मजा येते निदान त्यांचा टाईमपास होतो वर टीका करायला मिळते ते वेगळच.

असं पाल्हाळ लावून शेवटी आपला महत्त्वाचा मुद्दा मांडायचा.

मग बर्‍याच जणांना वाटतं की अरे हा तर १२ ओळींचा धागा झाला. अरे हो- नव्या लाईनीवर नवी ओळ टाका.

स्वाती दिनेश's picture

29 Jul 2010 - 5:28 pm | स्वाती दिनेश

रबडी येथे पहा.
स्वाती

llपुण्याचे पेशवेll's picture

30 Jul 2010 - 9:13 am | llपुण्याचे पेशवेll

मला बासुंदी (रबडी) फार आवडते. अभिजनाना देखील आवडत असावी.
-(बासुंदीप्रेमी) रबडिया

अप्पा जोगळेकर's picture

30 Jul 2010 - 9:53 am | अप्पा जोगळेकर

दूध पावडर्चा उपयोग केला तर बासुंदी सही होते. ती सर मिल्क्मेड पासून बनवलेल्या बासुंदीला नाही. फक्त प्रमाण मात्र अगदी बिनचूक असावे लागते. आणि दूध आटवून जर बासुंदी करायची असेल तर मग ४-५ तास गेलेच म्हणून समजा.

अविनाशकुलकर्णी's picture

30 Jul 2010 - 10:02 pm | अविनाशकुलकर्णी

चितळे..एकच नाव

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

1 Aug 2010 - 7:36 am | जाई अस्सल कोल्हापुरी

.... आपल्या चितळ्यांची दुबईस शाखा वगैरे असेल तर तोहि पत्ता कळवा....!
.... आधीच दु:खात असलेल्या आम्हाला असे चितळयांची आठवण करुन देउन हिणवण्यात काय समाधान मिळाले तुम्हास?

कवितानागेश's picture

31 Jul 2010 - 12:46 pm | कवितानागेश

वेगळे काय बनवायचय, मिल्कमेड असताना..
मिल्कमेडलाच 'बनवायचे' थोडी वेलची आणी केशर घलून!

गमत्या's picture

3 Aug 2010 - 2:59 am | गमत्या

बुर्ज खलीफा च्या उजव्या गल्ली च्या दुसर्‍या टोकाशी.
दुबई - उनायटेड अरब अमीरात.

कृपया : बासुंदी ध्यायला येताना न विसरता आपला डब्बा धेउन जाने अन्यथा अपमान केला जाईल व बासुंदी मिळणार नाही.