.....शेकडो छटांनी खुललेली हिरवाई, ... एक हिरवाकंच बाहावा, आणि पोपटी, झुलता गुलमोहोर...
बाहाव्यावर पिवळ्याजर्द फुलांची चादर चढते, अन उन्हाच्या झळांनी सोन्याची झळाळी येते...
डोकावणारी शर्मिली हिरवाई, मागे फुललेला लालकेशरी, पिवळ्या ठिपक्यांचा झुबकेदार गुलमोहोर...
------- -- --
आज पाऊस कधीचा कोसळतोय...
हिरवा बाहावा ओलाव्यानं जडावलाय...
भारावलेल्या फांद्या, आळसावल्यागत सुस्तावल्यात...
एखादी झुळूक येते, नकोनकोसं होत त्या इकडेतिकडे करतात,
...आधीच पावसाचा मारा, त्यात तो लंपट वारा...
नकोनकोसं होऊन ती फांदी जमिनीकडं झुकते...
हिरव्यागार पानांच्या जडावलेल्या झुबक्यांवरल्या झुलत्या पाण्याच्या थेंबात घुसळणारी
काळोख्या उजेडाची तिरीप तोल सावरता सावरता घरंगळते...
एक चमकता मोतिया जमिनीवर टपकून वाहत्या पाण्यात विरघळतो,
आणि दिसेनासा होतो...
शोधूशोधू करत फांद्या उगीचच झुलतात... चारदोन पातळशी पानंही, पाठोपाठ जमिनीकडं झेपावतात,
थेंब कधीच हरवून गेलेला असतो... पानं, पाण्यावर झुलत, विरघळलेल्या थेंबाला शोधत भरकटतात...
जडावललेला बहावा, हरवलेली पानं शोधत बसतो...
उदास उदास होतो...
फांदीवरली चिंब पाखरं चिडीचूप्प होतात,
पंखात चोच खुपसून अंगाला झटका देतात...
पंखात मुरलेला इवलासा पाऊस पुन्हा पानांवर ठिबकतो...
वार्यानं पळवलेला तो मोती परत पानावर येतो...
पानं पुन्हा मोहोरतात, झुलतात... झुल्यावरल्या झोक्यातला मोती पुन्हा झरंगळतो,
... आणि बाहावा उदास होतो...
--------------------------------------------
प्रतिक्रिया
13 Jul 2010 - 10:10 am | सहज
काहीतरी शोधायचा प्रयत्न केला पण मग मस्त भिजलो व सोडून दिले. :-)
13 Jul 2010 - 10:37 am | शिल्पा ब
छान लिहिलंय...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
13 Jul 2010 - 10:51 am | यशोधरा
मस्तच लिहिलय! एखादा फोटो असता तर अजून छान वाटलं असतं!
13 Jul 2010 - 11:05 am | मोहन
माझ्या कॉरबेट पार्क ट्रीपमधे पाहीलेला बहावा !
From 2006_12_29" />
मोहन
13 Jul 2010 - 12:08 pm | अरुण मनोहर
मस्त वर्णन.
13 Jul 2010 - 3:22 pm | निरन्जन वहालेकर
आधीच पावसाचा मारा, त्यात तो लंपट वारा...
नकोनकोसं होऊन ती फांदी जमिनीकडं झुकते..
व्वा ! क्या बात है ! वर्णन लीहाव तर अस !!!
13 Jul 2010 - 4:27 pm | क्रान्ति
अप्रतिम वर्णन! अगदी भिजलेला बहावा दिसतोय समोर!
क्रान्ति
अग्निसखा
13 Jul 2010 - 5:44 pm | मीनल
वाचन खूण साठवली .
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
14 Jul 2010 - 8:00 am | स्पंदना
घड फुटतात याला नुसत्या पाकळ्यांचे!!
अतिशय सुन्दर झाड, पण अस वर्णन पहिल्यांदा वाचल.
खरच आहे ...जिथ एक स्पर्श याला सोसत नाही तिथ वाक्यांच वजन कस सोसेल्...अफलातुन वर्णन्..अतिशय आवडल.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते
14 Jul 2010 - 10:34 am | दिपक
खल्लास वर्णन !
14 Jul 2010 - 4:53 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त!