माझ कोकण..........श्रीमंत!

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in कलादालन
18 Jun 2010 - 11:53 pm

मुळ लेख येथे आहे
दीलेले फोटो आमच्या गावच्या घराबाजुचे आहेत,गावातल्या स्थितीबद्दल माहीती नाही.आमच्या कंपाउंडच्या आतमधली चित्र आहेत.
फोटो मोठ्या आकारात असल्याने load व्हायला वेळ लागत असल्यास,जमवुन घ्यावे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
आज फक्त आंबेच बघु.अजुन फोटो आहेत पण ते सवडीने.

शहरात आंब्यांचे फार कौतुक होत,'हापुस हय्,हपुस' बोलुन काही लोक काहीही चिपकवतात.पण गावाला 'रायवळी'ला काही कींमत नसते,हे बघा.
15052010019" alt="" />

15052010018" alt="" />

झाडावरचे आंबेसुध्दा वाळीत टाकल्यासारखे दुर्ल़क्षित असतात.झाडावर हे असे गडच्या गड असतात.
15052010021" alt="" />

15052010022" alt="" />

ही हालत फक्त रायवळीची हां! पण हापुस खुप भाव खाउन जातो, त्याबद्दल व इतर खुप काही सांगायच आहे,वेळ नाही म्हणून बस करतो.

गावची माणस फार प्रेमळ असतात्,म्हणजे चाकरमन्यांना तरी तसच वाटत.ही माणस जवळच्या माणसांची फार काळजी करतात.गावची माणस झाडाचीसुध्दा कशी काळजी घेतात बघा....
15052010028" alt="" />

15052010027" alt="" />

आपण ह्या भावना फार मागे सोडुन आलोय्.......

....असो.

स्थिरचित्र

प्रतिक्रिया

शुचि's picture

19 Jun 2010 - 12:02 am | शुचि

ते रायवळ आंबे चटचट वेचावेसे वाटताहेत.

(बेचव मेक्सिकन आंबे खाऊन कंटाळलेली) शुचि

मदनबाण's picture

19 Jun 2010 - 12:31 am | मदनबाण

वा...फोटो पाहुन जुने दिवस आठवले...एके काळी असेच आंबे मी वेचले होते,कैर्‍या तर प्रचंड तोडल्या होत्या...आई त्याचे लोणचं, पन्ह करुन थकुन जात असे... आता फक्त कॉक्रीटचे जंगल पहायला मिळते. :(

मदनबाण.....

"Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep."
Carl Sandburg

शानबा५१२'s picture

19 Jun 2010 - 12:39 pm | शानबा५१२

अहो छोटेपणी आंबे वेचायचे असतात का?
ते दगड मारुन पाडायचे असतात,मी अजुनही पाडतो.पण झाडाखाली एवढे पडुन खराब होतात की जास्त मजा येत नाही,मग पेरुकडे मोर्चा!
बाकी दगड मारुन पडलेल फळ खाण्यात जास्त मजा येते,ते अळुच फळ.आपल्यास माहीती असेल,खुप मस्त लागत.
आम्ही छोटे होतो तेव्हा जेव्हा खुप वादळासारखी हव यायची तेव्हा खुप आंबे पडायचे हे आंबे अगदी योग्य प्रमाणात पिकलेले असल्याने मस्त आंबट गोड लागतात.बाजुच्या घरातल एक मुलगा,नात्यातला,पळत येउन आंबा घेउन पळत असे,मग आंबा पडला की एक भाउ त्या मुलाला पकडायला धावत असे व दुसरा आंबा घाईने जाउन उचलायला. :D :D :D
त्याला आंबा भेटला की तो चिडवुन पळायचा तेव्ह खुप जळायची! :D :D
बाकी ही आठवण करुन दील्याबद्दल धन्यवाद.
आज आमच्यासमोर आंबे धपाधप पडतात पण आम्ही ते फक्त उचलुन ठेवतो(कधी तेपण नाही)आता पहील्यासारख आंबे खात नाही.

*************************************************
दील दो दील दो,या तो इंटरनेट का बिल दो!

मदनबाण's picture

19 Jun 2010 - 6:10 pm | मदनबाण

अहो छोटेपणी आंबे वेचायचे असतात का?
हा.हा.हा...हो वेचलेत आणि तोडलेत सुद्धा अगदी होलसेल मधे...
राखणदाराची वेळ आणि नजर चुकवुन कैर्‍या तोडण्याची मजा काही औरच !!! दीड एक गोणी कैर्‍या प्रत्येकाला मिळायच्या याच्यावरुन किती आंबे/ कैर्‍या मी तोडल्या असतील याचा अंदाज येईल तुम्हाला.
मोठ्या बांबुला एक छोटीशी बांबुचीच पट्टी आडवी लावुन त्याचा आकडा बनवुन देखील कैर्‍या /आंबे पाडले आहेत इतके की शेवटी झाडाच्या कडे वर मान करुन पाहणे देखील नंतर जमत नसे इतकी मान धरुन यायची... जवळापास ३००+ आंब्याची झाडे त्यावेळी मी आत्ता जिथे राहतो आहे तिथे होती... एक आमराईच होती ती...पण या २० वर्षात इतक्या बिल्डर लॉबी आल्या इथे की पार वाट लागली... आता फक्त जुने दिवस आठवणीतच राहिले आहेत...

मदनबाण.....

"Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep."
Carl Sandburg

इंटरनेटस्नेही's picture

19 Jun 2010 - 12:51 am | इंटरनेटस्नेही

चांगले आहेत पिक्स.,, अगदी गावी गेल्या सारखे वाटले.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

शिल्पा ब's picture

19 Jun 2010 - 2:20 am | शिल्पा ब

गावची आठवण झाली..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पाषाणभेद's picture

19 Jun 2010 - 12:17 pm | पाषाणभेद

लय भारी फटू हायती. एक प्रकारचा लेखच आहे हा.
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

जागु's picture

19 Jun 2010 - 12:24 pm | जागु

छान.