Skip to main content

पहिला पाऊस पहिली भेट

लेखक स्वप्निल मन यांनी शुक्रवार, 18/06/2010 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला पाऊस आमची पहिली भेट ती आडोशाला उभी मी तिच्या बाजूला तिचा तो त्रासिक चेहरा आणि माझं मिश्कील हास्य अचानक ओळख निघणं एकत्र छ्त्रीत जाणं तिचं ते भिजल्यानं कुडकुडणं अन् माझं तिच्या स्पर्शानं शहारणं तिचं घर येणं मला निरोप देणं यावेळी, तिचा तो हसरा चेहरा आणि माझं उसनं हास्य

वाचने 2247
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

माझी प्रतिक्रिया काय झाली? सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

In reply to by शुचि

माझा उपप्रतिसाद काय झाला ? कवतिक वाटे मला| ध्याना नसे ही मना || कोण उडवी प्रति सादा|| व्यनि त दे खुलासा ||

असो ! कविता आवडली. >> यावेळी, तिचा तो हसरा चेहरा आणि माझं उसनं हास्य>> छानच : ) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||