सचिनचा अजून एक विक्रम...
क्रिकेटमधला विक्रमादित्य सचिनने आज अजून एक वेगळा विक्रम केला आहे:
वास्तवीक रेनवॉटर हार्वेस्टींग / पर्जन्य संचय हे आता नवीन बांधकामासाठी मुंबई महापालीकेने सक्तीचे केले आहे. पण, "शेजारी करतील मी कशाला करू?" अथवा "असले नियम सामान्यांसाठी असतात, व्हिव्हिआयपींना नसतात" असे गृहीत धरले जाते...
मात्र नुकताच बांद्र्याला नवीन बंगला घेत असताना तेंडूलकर दांपत्याने पर्जन्य संचय करण्यासाठी टाकी बांधून अतिरीक्त वापरासाठी १० लाख लीटर्स पाणी पावसातून गोळा करायचे ठरवले आहे. अर्थात त्यामुळे एकट्या सचिनच्या कुटूंबाकडून मुंबईचे १० लाख लिटर्सचे पाणी वाचणार आहे!
आता किमान सचिन करतो म्हणून का होईना इतरपण स्वतःच्या हातात असेल तितके पाणी जिरवा पाणी वाचवा करणे मनावर घेतील का?
म.टा. मधील बातमीचा दुवा: सचिन वाचवणार १० लाख लि. पाणी
प्रतिक्रिया
छान बातमी.
हो मीही आजच बातमी वाचली
कंसातील
हे दहा लाख लिटर
देणार आहे
सक्काळ सक्काळ सचिण च्या घरी ?
आत्ता ग बय्या!
चला चला
स्क्काळी सक्क्कळी सचिनच्या
आयला हा
हो रे!
असा पुरुषोत्तम क्वचितच जन्माला येतो!
सचिन....वैभव !
सचिन पाणी
आनंद झाला
+१
आपणही..