मिसळ पाव कट्टा, पुणे

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in जनातलं, मनातलं
23 Mar 2008 - 10:26 am

मित्रहो, काल आम्ही पुण्यातले मिसळ-पाव.कॉम प्रेमी एकत्र जमलो होतो..मजा आली. सविस्तर वृत्ता॑त विजुभाऊ लिहितच आहेत, तोपर्य॑त हे फोटो पाहा..

From Lt to Rt- Keshav Sumar (Aniruddha Abhyankar), Chittaranjan Bhat (Chittar), Kaiwalya Deshmukh (Dhamal) & Vinayak Anivase (Inoba)

From Lt to Rt- Shantanu Vaidya (Chhatrapati), Ajay Gogate (Bhuinala), Vivek Vidwans (Vivek V), Omkar Joshi (Omkar) & Dr.Prasad Dadhe

Enjoying Tandoor..Chhatrapati & Dhamal

Omkar & Chittar with 'Patiyala'

Keshvsumar in witty mood

Cigarette n Leg Piece~ Bhuinala & Inoba

Vivek V n Dr. Dadhe~ Hardy & Laurel

Vijubhau (Vijay Shah) at his best!

प्रतिक्रिया

केशवसुमार's picture

23 Mar 2008 - 10:34 am | केशवसुमार

दिसत नाही आहेत..

केशवसुमार

डॉ.प्रसाद दाढे's picture

23 Mar 2008 - 10:34 am | डॉ.प्रसाद दाढे
डॉ.प्रसाद दाढे's picture

23 Mar 2008 - 10:38 am | डॉ.प्रसाद दाढे

केशवसुमार तुमचा इमेल द्या, तुम्हालाच पाठवतो, प्लीज अपलोड कराल का, मी प्रयत्न करतोय, पण लेकाच॑ जमत नाहिये

डॉ.प्रसाद दाढे's picture

23 Mar 2008 - 10:40 am | डॉ.प्रसाद दाढे

Chhatrapati & Dhamal

डॉ.प्रसाद दाढे's picture

23 Mar 2008 - 10:42 am | डॉ.प्रसाद दाढे

डॉ.प्रसाद दाढे's picture

23 Mar 2008 - 10:43 am | डॉ.प्रसाद दाढे

अर्रेच्च्या..आता आपोआप दिसायला लागलेत..

विसोबा खेचर's picture

23 Mar 2008 - 10:46 am | विसोबा खेचर

फोटू सर्वांना दिसतील अशी व्यवस्था आता आम्ही केली आहे!

धन्यवाद दाढेसाहेब!

कट्टा अगदी जोरदार झालेला दिसतोय! :)

सर्व मंडळींना पाहून बरं वाटलं! :)

छत्रपती आणि धमाल्याचा कोंबडीची तंगडी खातांनाचा फोटू तर क्लासच!

केशवसुमाराच्या निर्मळ हास्यावर जाऊ नका! महा डँबिस आणि बदमाश माणूस आहे तो! विडंबन्या कुठला!! :)

चित्त आणि ओंकार! दोघांपैकी कोण अधिक हलकट असावा हे कोडे मला अजूनही सुटलेले नाही! :)

असो, सर्व मिसळपाव कट्टेकरींचे हार्दिक अभिनंदन.. सर्वच फोटू झकास...

आपला,
(महाहलकट मिसळपावकर) तात्या.

प्रसाद,

खूप मस्त काम केलेत.यानिमित्ताने आपल्या मिसळपावच्या सर्व हिर्‍यांचे (तुमच्यासकट :)) प्रत्यक्ष दर्शन घडले
एका छानशा पार्टीला नक्कीच मुकलो...

पण पार्टी (आणि तरंगते संम्मेलनदेखील)प्रत्यक्ष डोळ्यांसमोर उभे केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद,
थेट तुमच्याबरोबर बसल्याचा भास झाला...
सागर

चतुरंग's picture

23 Mar 2008 - 5:55 pm | चतुरंग

ठरवल्याप्रमाणे कट्टा केलात तर!!
डॉ.साहेब आणि तात्या आभासी जगातल्या काही हिर्‍यांना तरी प्रकाशचित्रातून चमकवल्याबद्दल धन्यवाद!!

छत्रपती आणि धमाल्या तंगडी खाताना 'कोंबडी पळाली तंगडी धरुन...'गाणे बॅकग्राऊंडला होते का?:))) (दोघांचेही भाव त्यांच्या नावाला साजेसे!;०)

केशवसुमार! तात्या म्हणतात तसे अगदी फसवे हास्य हो हे! आत्ता हसताहेत आणि बघता बघता विडंबनाचा एखादा धोबीपछाड टाकतील की बत्ती गुल!!!:))

विवेक आणि डॉ. सायबांची लॉरेल्-हार्डी जोडी भावली!

इनोबा मात्र अंमळ गंभीर वाटतात (अचानक 'संपली' होती का?!!ह्.घ्या.)

विजुभाऊंची छबीही खास!!

एका छान कट्ट्याला मुकलो खरे! पुन्हा योग केव्हा ते बघायचे आता!!

चतुरंग

आजानुकर्ण's picture

23 Mar 2008 - 6:03 pm | आजानुकर्ण

कट्टा यशस्वी झाला हे पाहून आनंद झाला.

(आनंदित) आजानुकर्ण

ब्रिटिश टिंग्या's picture

23 Mar 2008 - 6:12 pm | ब्रिटिश टिंग्या

कट्टा जोरदार झालेला दिसतोय.....
फोटो तर लै भारी आलेत.....जियो...

असो, सध्यातरी सविस्तर वृत्तांताच्या प्रतीक्षेत....

आणि पुनश्च सर्व कट्टेकर्‍यांचे अभिनंदन.........

- छोटी टिंगी ;)

अवांतर - पुढचा कट्टा कधी व कोठे भरवणार याबाबत काही चर्चा झाली का? कारण आम्ही लवकरच मायभुमीत परतत आहोत....त्यामुळे थोडक्यात मुकलो ह्या कट्ट्याला :(

नंदन's picture

23 Mar 2008 - 6:16 pm | नंदन

फोटोज सही आलेत. वृत्तांताची वाट पाहतोय.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

ऋषिकेश's picture

23 Mar 2008 - 6:23 pm | ऋषिकेश

वा! कट्ता जोरात दिसतोय. यानिमित्ताने फोटोतून का होईना बर्‍याच जणांचे दर्शन झाले! धन्यु!
बाकी तिथे काय काय झाले तेही कळू द्या की :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Mar 2008 - 6:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळकट्ट्याच्या कार्यक्रमाचे फोटो जबरा आले आहेत.
वृत्तांत जरा डिटेल द्या राव !!! :)

सहज's picture

23 Mar 2008 - 6:58 pm | सहज

मिसळप्रेमींना बघुन मजा आली.

मिसळ दिसली असती तर आनंद द्विगुणीत झाला असता. :-)

केशवसुमार यांना समोर प्लेटमधे शव पाहुन शहारा आला असल्याचे दिसते. डोळे मिटुन घेतले आहेत. :-)

स्वाती राजेश's picture

23 Mar 2008 - 7:27 pm | स्वाती राजेश

पहिलीच मि.पा.ची पार्टी सक्सेसफुल झाली... मस्त वाटले.
फोटो तर मस्तच आलेत्...फोटोमुळे सगळ्या मंडळींची ओळख झाली.
आम्ही सविस्तर वृतांताची वाट पाहात आहोत..

पिवळा डांबिस's picture

23 Mar 2008 - 8:42 pm | पिवळा डांबिस

मंडळी, फोटो सुरेख आले आहेत, आता वृत्तांत येऊ द्या....
नाही म्हणजे तशी घाई नाही, आधी पूर्ण 'उतरू' वगैरे द्या...:))

इनोबा, धमाल्या व कंपनीचे सदेह दर्शन झाल्याने आता आम्ही अगदी उन्मनी अवस्थेतच गेलो आहोत!
अगदी, 'अवघेची झाले, देहब्रम्ह!!'

केशवसुमार यांना समोर प्लेटमधे शव पाहुन शहारा आला असल्याचे दिसते.
केशवं पतितं दृष्ट्वा, कैवल्यः हर्षनिर्भरः....:)))

तुम्ही मंडळींनी हा योग जुळवल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन!!
नायतर आमची कॅलिफोर्नियाची पोरं! इथे मी स्वखर्चाने माझ्या घरी सगळी सोय करण्याची तयारी दाखवून सुद्धा फक्त ड्रायव्हिंग करायला लागेल म्हणून टाळाटाळ करता आहेत!!
(जरा डिवचून बघतो, यायला तयार होतात का ते!!!:))))

आपला,
डांबिसकाका

प्राजु's picture

23 Mar 2008 - 10:31 pm | प्राजु

फोटोज पाहून धन्य धन्य वाटले...
कट्टा एकदम जोरदार झाला असणार यात शंका नाही. वृतांताची वाट पहात आहे. फोटो एकदम छान आले आहेत. अभासी जगातले हे 'तारे कट्टेपर'... खूप आनंद झाला सगळ्यांचे हसरे आणि आनंदी चेहरे बघून. इनोबाही (फोटोमध्ये)थोडे हसले असते तर चाललं असतं.. पण असो.
कट्टा यशस्वी झाला .. आणखी काय हवे?

- (सर्वव्यापी)प्राजु

पिवळा डांबिस's picture

24 Mar 2008 - 12:46 am | पिवळा डांबिस

इनोबाही (फोटोमध्ये)थोडे हसले असते तर चाललं असतं..

एका जाज्वल्य, कडव्या आणि ज्वलंत मर्‍हाटी कार्यकर्त्याला हसा-बिसायला सांगतेस!!
उद्या म्हणशील, "शिवाजीमहाराज सुद्धा (फोटोमध्ये) थोडे हसले असते तर चाललं असतं.....:)))
"कोण आहे रे तिकडे? हिला सिंहगडावरच्या कोठडीत डांबून ठेवा..."

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Mar 2008 - 6:59 am | llपुण्याचे पेशवेll

प्राजुताई तुम्हाला स्मरत असेत तर त्याप्रमाणे 'इस्ट कोस्ट'चा कट्टा तुम्ही आल्यावर भरवायचे ठरले आहे. :)
म्हणून तुमची मी आतुरतेने वाट पाहत आहेत सगळे..... :)

पुण्याचे पेशवे

प्राजु's picture

24 Mar 2008 - 6:47 pm | प्राजु

अहो पेशवे साहेब... परत येण्याचं काय.. जाऊ तरी द्या आधी मला.
मी जून मध्ये साधारण १० तारखेच्या दरम्यान येणार आहे परत.
आपन ईस्ट कोस्ट स्पेशल कट्टा... या पुणेकरांच्या इतकाच भारी करू.. नक्की.
- (सर्वव्यापी)प्राजु

शरुबाबा's picture

24 Mar 2008 - 10:35 am | शरुबाबा

एका छानशा पार्टीला नक्कीच मुकलो...
वृत्तांताची वाट पाहतोय.

धमाल मुलगा's picture

24 Mar 2008 - 11:17 am | धमाल मुलगा

डॉक्टरसाहेब, एकदम फर्मास फोटू आल॑ आहेत :-))))
आणि त्याच्याखालच्या कॉमे॑ट्स तर लय भारी !!!

केशवसुमाराच्या निर्मळ हास्यावर जाऊ नका! महा डँबिस आणि बदमाश माणूस आहे तो! विडंबन्या कुठला!! :)
हा हा हा...जबरा...चार दोन विड॑बन॑ तिथ॑ बसल्याबसल्या टाकली केसुशेठ या॑नी !

चित्त आणि ओंकार! दोघांपैकी कोण अधिक हलकट असावा हे कोडे मला अजूनही सुटलेले नाही! :)
काय सा॑गता तात्याबा घाबरायला पाहिजे दोघा॑ना :-))
चित्तर आणि छत्रपति या॑चा प्रेमळ स॑वाद ऐकायला आणि पहायला तरी आपण असायला हवेच होता हो !!!

छत्रपती आणि धमाल्या तंगडी खाताना 'कोंबडी पळाली तंगडी धरुन...'गाणे बॅकग्राऊंडला होते का?:)))
चतुर॑गराव,
"आम्ही खाल्ली तेव्हा पाऊस निनादत होता" ... कुठल॑ही गाण॑ चालल॑ असल॑ तरी ऐकायला एकही अक्षर येत नव्हत॑ बॉ!

(दोघांचेही भाव त्यांच्या नावाला साजेसे!;०)
अरे वा, खर॑ की काय? उगाच न्युनग॑ड बाळगत होतो म्हणा की मी !!! चला आता तो॑डावरुनच आम्ही काय चिज आहोत ह्याची लोका॑ना कल्पना येते म्हणल्यावर उगाच शहाणपणाचा आणि सभ्यतेचा आव आणण्याची गरज स॑पली...हो, म्हातारीन॑ कोबड॑ झाकल॑ म्हणून उजाडायच॑ राहत॑ का????

केशवसुमार यांना समोर प्लेटमधे शव पाहुन शहारा आला असल्याचे दिसते.
आयला, अजुन उतरली नाही की काय माझी? मी आधी शेव अस॑ वाचल॑ :-)))

केशवं पतितं दृष्ट्वा, कैवल्यः हर्षनिर्भरः....:)))
डा॑बिसकाका, ह्या इब्लिस पुतण्याला हाक मारलीत काय?

छोटी टि॑गी,
कधी परतताय? कळवा...भेटूच की...क्काय?

अवा॑तरः विजुभाऊ, कट्ट्याचा वृत्ता॑त कधी टाकताय? तुमच्या 'एक्सपर्टस् कॉमेंट्स' ची वाट पाह्तो आहोत.

आपला,
अजूनही शनिवार स॑ध्याकाळच्या मिपा कट्ट्याच्या आठवणीत रममाण,
ध मा ल.

आनंदयात्री's picture

24 Mar 2008 - 11:39 am | आनंदयात्री

चित्तर आणि छत्रपति या॑चा प्रेमळ स॑वाद ऐकायला आणि पहायला तरी आपण असायला हवेच होता हो !!!

आता हळुहळु गप्पांच्या पोतड्या उघडायला लागल्यात ... आन दो !

डॉ.प्रसाद दाढे's picture

24 Mar 2008 - 11:41 am | डॉ.प्रसाद दाढे

कट्टा यशस्वी झाला ह्याचे श्रेय 'धमाल, छत्रपती, विवेक आदी॑ना आहे. त्या॑नी खूप कष्ट घेतले..त्या॑ना माझे जाहीर आभार (हा 'ईर्शाद' नाही बर॑ का.. :) )

धमाल मुलगा's picture

24 Mar 2008 - 11:46 am | धमाल मुलगा

आभार बिभार कस॑ले काय हो डॉक्टरसाहेब?

बाकी गाणी बेष्ट म्हणता हा॑ तुम्ही !!!! नरड्यात मज्जा आहे बॉ तुमच्या ! गुलाम अली आणि सैगलसाहेब तर मस्तच. मोघे स्पेशल एकदम खास :-))))

(हा 'ईर्शाद' नाही बर॑ का.. :) )
हा हा हा.............
ज ह ब ह र्‍ह्या

सरदार ध मा ल.

बापु देवकर's picture

24 Mar 2008 - 3:56 pm | बापु देवकर

एका छानशा पार्टीला नक्कीच मुकलो...
राज....

डॉ.प्रसाद दाढे's picture

24 Mar 2008 - 6:06 pm | डॉ.प्रसाद दाढे

मला खात्री आहे की हे सगळे फोटो पाहून व विजुभाऊ॑ची बखर वाचून पुष्कळ मिपाकरा॑ना प्रत्यक्ष स॑मेलनात सहभागी न होता आल्याबद्दल ख॑त वाटली असणार. त्याचा परिणाम म्हणजे पुढील मिपा-कट्ट्यास आधीपेक्षा जास्त प्रतिसाद मिळेल व आणखी मजा येईल.

सचिन's picture

24 Mar 2008 - 11:53 pm | सचिन

पार्टी १दम जोरात झालेली दिसते.
नवरत्नांचे दर्शन याचि देही याचि डोळा करून दिल्याबद्दल डॉ. साहेबांचे मनःपूर्वक धन्यवाद !!!

मुक्तसुनीत's picture

25 Mar 2008 - 12:45 am | मुक्तसुनीत

मिपाच्या कट्ट्याबद्दल अभिनंदन ! जरा आणखी डीटेलवारी वृत्तांत येऊ द्या !

नीलकांत's picture

25 Mar 2008 - 2:39 pm | नीलकांत

मिसळपाव चा कट्टा झकास झालेला दिसतोय. मी अश्या झकास पार्टीला मुकलो या बद्दल खेद वाटतो. या लोकांना भेटायची आणि या पार्टीत सामील व्हायची खुप इच्छा होती. पण मी पुण्याबाहेर होतो त्यामुळे नाही जमलं.

बाकी फोटो आणि बखर वाचून खुप छान वाटलं.

पुढच्या वेळेला नक्की येईल.

नीलकांत

विजुभाऊ's picture

10 May 2011 - 10:42 pm | विजुभाऊ

अरे वा . ही लिंक मला गुगल करून सापडली.
पुनःप्रत्ययाचा आनंद आला

अविनाशकुलकर्णी's picture

10 May 2011 - 11:35 pm | अविनाशकुलकर्णी

अभिनंदन..मजा आलि तुमच्या मजेत सहभागी होताना..
असेच आनंदी हसत रहा..आमचे ब्रिद वाक्य आहे..

Eat..Drink and Be Merry....

पाषाणभेद's picture

11 May 2011 - 12:33 am | पाषाणभेद

पतियाळा पाहून मनाला फारच रुखरुख लागलेली आहे.

चिंतामणी's picture

11 May 2011 - 2:22 am | चिंतामणी

त्यासाठी लिड घ्या. कट्टयाची घोषणा करा आणि आनंद घ्या.

चिअर्स.

इंटरनेटस्नेही's picture

11 May 2011 - 2:53 am | इंटरनेटस्नेही

आय विश आय वॉज देअर..

मुक्त विहारि's picture

17 Dec 2024 - 5:34 pm | मुक्त विहारि

विना पेय झालेले कट्टे, शोधता शोधता , हा धागा मिळाला.

कट्टा पेयपानासकट असला तरी, एक खंत जाणवली..

विजुभाऊ वगळता, आज तरी ह्या सदस्यांपैकी बरेच जण , आता हजेरी लावत नाहीत.

विजुभाऊ पण फार कमी वेळा हजेरी लावतात.

धन्यवाद मुवि. एक जुनी आठवण वर आणलीत
त्या कट्ट्याचा वृत्तान्त
https://www.misalpav.com/node/1207 चौक १
https://www.misalpav.com/node/1213 चौक २
https://www.misalpav.com/node/1219 चौक ३

बरीचशी जुनी मंडळी आता इथे दिसत नाहीत.

पूर्वीचे कट्टे फक्त दारुचेच व्हायचे असे दिसते.

मुक्त विहारि's picture

18 Dec 2024 - 7:40 pm | मुक्त विहारि

संमिश्र कट्टे पण होतात.

हजर असलेल्या प्रत्येक सदस्याने दारू प्यायलाच हवी, असा काही आग्रह नसतो.

कंजूस आणि सुबोध खरे, दारू पित नाहीत, तरीही ते हजेरी पण लावतात आणि कुणीही त्यांना दारूचा आग्रह पण करत नाही.

अहो मी आपल्या काळातले नव्हेत तर त्या आधीच्या काळातल्या कट्ट्याबद्दल म्हणतोय.

म्हणजे आताचे दारूण होतात की काय?

टर्मीनेटर's picture

18 Dec 2024 - 8:50 pm | टर्मीनेटर

कंजूस आणि सुबोध खरे, दारू पित नाहीत, तरीही ते हजेरी पण लावतात आणि कुणीही त्यांना दारूचा आग्रह पण करत नाही.

हुश्श.. हे वाचून हायसे वाटले बघा... नाहीतर फोटोज पाहिल्यावर आमच्या सारख्या अपेय पानापासून काही प्रकाशवर्षांचे अंतर राखून असलेल्यानी कट्ट्याला कधी हजेरी लावावी की नाही ह्या गहन विचारात बुडालो होतो 😀 😀 😀

मुक्त विहारि's picture

19 Dec 2024 - 6:43 am | मुक्त विहारि

भेटणे महत्त्वाचे आहे...

ज्यांना दारू पित गप्प मारायला आवडते ते पण असतात आणि ज्यांना दारू पासून दूर रहायचे असते, ते पण असतात.