वैकुंठ

उग्रसेन's picture
उग्रसेन in जे न देखे रवी...
18 Apr 2010 - 12:12 pm

प्रिय तुकाराम,
काल तु सपनात आला
अन् म्हणला, चल वैकुंठाला.

मी हापकुनच गेलो
हातापायाला दरदरुन घाम फुटला.

च्यामारी तुक्या,
तुला काय सवसारात इंट्रेस नव्हता.
तु बरा आन तुव्हा इट्टल बरा.

माहं तसं नव्ह रं दादा,
पोरासोरायचं शिक्षान, म्हातारा-म्हतरी,
त्यायच्या हौशी-मौजी,
अजुन लय गोष्टी राह्यला
आन तु म्हणतो चल वैकुंठाला.

आपल्याच्यानं काय होनार नाय.
तुव्ह मी काय ऐकणार नाय.

टाळ चिपळ्याच्या आवाजात
आरामात झोपलो.
पर, माह्याच तसबीरीजोळ
माहं गणगोत काहून रडून राह्यलं
हे मातर कळत नव्हतं ?

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

18 Apr 2010 - 12:25 pm | पाषाणभेद

लय भारी हाय बरं का बाबूराव. तुमी बी आमच्या लायनीत आले म्हना की मग.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

उग्रसेन's picture

18 Apr 2010 - 1:20 pm | उग्रसेन

आरं हा गड्या.
माणूस मरुन गेलाय आन त्याला लय इचार सुचुन राह्यला
असा लय भयकथेत येऊन गेलंय. :(

बाबुराव :)

टारझन's picture

18 Apr 2010 - 12:31 pm | टारझन

राम नाम ....

- प्रो.प्रा. टारझन
मालक, हॉटेल वैकुंठ लॉजींग बोर्डींग , वेताळटेकडी खुर्द

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Apr 2010 - 6:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ते प्रो.प्रा. मी चुकून प्रा.डॉ. असं वाचलं.
बाकी कविता समजली नाही.

अदिती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Apr 2010 - 6:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रत्येक धाग्यावर अवांतर चर्चा, गप्पा होऊ नयेत हे मान्य, पण ही शिस्त प्रत्येकानेच लावून घ्यायला हवी.

ओळखा पाहू हे वाक्य कोणी कोणास आणि का म्हटले असावे ....! :)

- प्रा.डॉ.

टारझन's picture

19 Apr 2010 - 8:51 pm | टारझन

बरोबरंच आहे ... वरिल उपप्रतिसात पहिल्यांदाच दिल्या गेला आहे असे वाटते. तेंव्हा वरील करड्या शाईतल्या वाक्याची पुर्तता होते आहे.

- टारंजय

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Apr 2010 - 9:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>वरिल उपप्रतिसात पहिल्यांदाच दिल्या गेला आहे असे वाटते.
टार्‍याला बरेच संदर्भ माहिती नसतात आणि गडबडीत काही तरी लिहून जातो.
आणि मला विनाकारण टारुला उत्तरे देत बसावे लागते. जरा, अभ्यास करत जा...! :)

आणि उपप्रति'सात' यातले 'सात' काय आहे ?
उपप्रति'आठ' का नाही...!>:) >:) >:)

-दिलीप बिरुटे

धमाल मुलगा's picture

19 Apr 2010 - 9:09 pm | धमाल मुलगा

बाबुराव तशे मोठ्या मनाचे हायेत. नक्की क्षमा करतील त्ये. :)

>>उपप्रति'आठ' का नाही...
=)) =))

टारझन's picture

19 Apr 2010 - 9:26 pm | टारझन

=)) =)) =)) =))
कसलं लिहीलंय ... "उपप्रतिसात" व्वा !! =))

बाकी हल्ली रिकामटेकडा वेळ कमी असल्याने अभ्यास कमी आहे हे मान्य केलेच पाहिजे ... बाकी मला आजिबात माहिती नाहीये बरकां .. की तुम्ही रिकर्सिव प्रतिसाद दिला होतात ते :)

- (नापास) अभ्याश प्रतिसातवी

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Apr 2010 - 7:34 am | llपुण्याचे पेशवेll

असो, मोठे व्हा!
सांगा बरे असे कोण कोणास म्हणाले..
पुण्याचे पेशवे

प्रमोद देव's picture

18 Apr 2010 - 2:32 pm | प्रमोद देव

लय डेंजर लिवलंय बगा. :)

शुचि's picture

18 Apr 2010 - 4:57 pm | शुचि

बाबुराव मस्त लिहीलय हो : )
दिवसाची सुरुवात छान झाली. झकास. =D>
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सरेंडर इज द टेंडरेस्ट इंपल्स ऑफ द हार्ट, अ‍ॅक्टींग आउट ऑफ लव्ह टू गिव्ह व्हॉटेव्हर द बिलव्हड वॉन्ट्स.

मीनल's picture

18 Apr 2010 - 5:11 pm | मीनल

लेखन आवडलं.
मला वास्तव वाटलं. भाषा ही आवडली.

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

sur_nair's picture

19 Apr 2010 - 5:56 am | sur_nair

sixth sense चित्रपट आठवला. बाकी इथून पाय निघणे जरा अवघडच असते आपल्या सारख्या सामान्य माणसांना

फ्रॅक्चर बंड्या's picture

19 Apr 2010 - 6:06 pm | फ्रॅक्चर बंड्या

छान लिहलय ....
मस्तच
binarybandya™

धमाल मुलगा's picture

19 Apr 2010 - 8:56 pm | धमाल मुलगा

टाळ चिपळ्याच्या आवाजात
आरामात झोपलो.
पर, माह्याच तसबीरीजोळ
माहं गणगोत काहून रडून राह्यलं
हे मातर कळत नव्हतं ?

अगाबाब्बो!
शेवटच्या कडव्यानं शीनच पालटवला की. ब्येस ब्येस.
आक्षी खरं लिवलंया बाबूराव तुमी.

धनंजय's picture

19 Apr 2010 - 9:01 pm | धनंजय

आवा चालली पंढरपुरा, वेशीवरुनी आली घरा...
:-)

राजेश घासकडवी's picture

19 Apr 2010 - 10:58 pm | राजेश घासकडवी

मला या कवितेची सुरवातीची कडवी आवडली. त्यात तुकोबासारख्याला जे जमतं ते सर्वसामान्यांना का जमत नाही याविषयी साधीभोळी पण समर्पक टिप्पणी वाटत होती. किंबहुना तुकोबाचा विठ्ठल त्याला घराबाहेर सापडला तसा खूप लोकांना आपला विठ्ठल घरात, संसारात, नात्यागोत्यांच्या पाशात सापडतो. यात छान आयरनी होती. शेवटच्या कडव्यात कलाटणी आहे, पण माझी तरी अंमळ निराशा झाली.

राजेश

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Apr 2010 - 7:36 am | llपुण्याचे पेशवेll

कविता बरी वाटली.
पुण्याचे पेशवे