मिपाचे धोरण..

मिपावर फक्त मिपाच्या सभासदांचेच लेखन प्रसिद्ध व्हावे असेच पहिल्यापासून धोरण आहे. ज्या व्यक्ति मिपाच्या सभासद नाहीत अश्या व्यक्तिंचे लेखन केवळ संदर्भ म्हणून दोनचार ओळीत किंवा संबंधित लेखनाचा केवळ दुवाच येथे दिला जावा, असे मिपाचे धोरण आहे. मग ती व्यक्ति अगदी कुणीही असो!

वारंवार हे सांगूनदेखील काही मंडळी पुन्हा पुन्हा मिपावर, जी मंडळी मिपाच्या सभासद नाहीत अशांचे लेखन मिपावर प्रकाशित करत असतात, पुढे ढकललेल्या इपत्रातील साहित्य तसा उल्लेख न करता मिपावर प्रकाशित करत असतात याचा अत्यंत खेद वाटतो. असे साहित्य कोणतीही पूर्वसूचना दिल्याशिवाय मिपावरून अप्रकाशित वा काढून टाकण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी आणि मगच मिपाबाह्य व्यक्तिंचे लेखन इथे कॉपीपेस्ट करण्याचे फुक्कटचे कष्ट उपसावेत!

पुढे ढकलेल्या इपत्रातील साहित्य मूळ लेखकाचा नामोल्लेख न केल्यास तर नाहीच, परंतु जरी नामोल्लेख केला असला तरी ते मिपावर राहू द्यायचे किंवा नाही, हेदेखील ठरवण्याचा संपूर्ण अधिकार मिपाकडे आहे याचीही कृपया नोंद घ्यावी!

मिपा हे केवळ अन् केवळ मिपाच्या सभासदांनाच स्वत:चे लेखन करण्याकरता आणि त्यावर इतर सभासदांना त्यांचे स्वत:चे वैयक्तिक प्रतिसादात्मक मत व्यक्त करण्याकरता तयार केले गेलेले संकेतस्थळ आहे याची कृपया नोंद घ्यावी!

मिपा हे मिपाबाह्य व्यक्तिंचे साहित्य वाचण्याचे किंवा पुढे ढकललेले साहित्य वाचण्याचे (शक्यतोवर!) ठिकाण नाही हे सर्व सभासदांना शेवटचे सांगणे आहे.

यापुढे कुठलेही निवेदन न देता केवळ 'डिलिट'चे बटण दाबले जाईल याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे अशी कळकळीची व शेवटची विनंती!

-- जनरल डायर.

सहमत. राजे (

सहमत.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

अतिशय योग्य धोरण!

डायरसाहेब असे कडक धोरण घेतल्याशिवाय काही लोकांना कळतच नाही. तेव्हा आपण असे हडसून खडसून लिहीलेत हे खूपच चांगले केलेत. आमचा आपल्या ह्या धोरणाला निसंदिग्ध पाठिंबा आहे.
लगे रहो डायर साब!

वा..

योग्य तो निर्णय..

- (सर्वव्यापी)प्राजु

धडा!

मिपाच्या या धोरणापासून इतरही काही संकेतस्थळांनी धडा घेतल्याचे पाहून आनंद वाटला!

पूर्वी काही संस्थळांवर जी एंच्या कथा जश्याच्या तश्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या, त्याकरता अनुमती लागत नव्हती परंतु मिपाने 'इतरत्र प्रकाशित साहित्याबद्दल आणि कॉपीराईट कायद्याच्या सन्मानाबद्दल' वेळोवेळी जे धोरण जाहीर केले ते पाहून इतर काही संस्थ़ळांचे प्रशासकही सुधारले आणि आता संबंधित साहित्याबद्दल 'अनुमती घोषित करावी' असे धोरण त्यांनीही जाहीर केल्याचे कळते!

मिपाला याचे समाधान वाटते! Smile

तात्या.

वाटलेच होते....

आपल्याला वारा सरल्यामुळे पृथ्वीवर हिमवादळे येतात या भ्रमातून मिपाच्या मालकांनी दूर रहावे. कुणाच्या धोरणाने कोण सुधारले आहे, हे सर्वज्ञात आहे. मूळ कथालेखक, ती कथा देणारे आणि 'प्रशासक' जे काय आहे ते बघून घेतील. 'जिथे फुले वेचली तिथे गोवर्‍या वेचणार नाही' अशी प्रतिज्ञा करणार्‍यांनी काही दिवस काड्या न घालता आपल्याला रहाता येते का, ते पहावे. दरम्यान खरे धाडस असेल तर हा प्रतिसाद न उडवता तसाच ठेवावा आणि जळजळ कमी करण्यासाठी सूतशेखराची मात्रा घ्यावी...
सन्जोप राव

:)

आपल्याला वारा सरल्यामुळे पृथ्वीवर हिमवादळे येतात या भ्रमातून मिपाच्या मालकांनी दूर रहावे.

काय रावसाहेब, मालकंनी पाठवलं वाटतं? मला वाटलंच होतं!Smile

मूळ कथालेखक, ती कथा देणारे आणि 'प्रशासक' जे काय आहे ते बघून घेतील.

बरं बरं! घ्या बघून! आमचं काहीच म्हणणं नाही! Smile

'जिथे फुले वेचली तिथे गोवर्‍या वेचणार नाही' अशी प्रतिज्ञा करणार्‍यांनी काही दिवस काड्या न घालता आपल्याला रहाता येते का, ते पहावे.

नाय राहता येत बुवा! अहो काड्या घालायची आणि घालून घ्यायची जुनी सवय आहे आमची! Smile

दरम्यान खरे धाडस असेल तर हा प्रतिसाद न उडवता तसाच ठेवावा

तसाच ठेवत आहे! आणि यात काही धाडस लागते असं वाटत नाही! अहो अत्यंत फुटकळ गोष्ट आहे ही! Smile

आणि जळजळ कमी करण्यासाठी सूतशेखराची मात्रा घ्यावी...

ते आमचं आम्ही पाहू! मात्र आमची मात्रा मात्र बरोब्बर लागू पडून आपली जळजळ मात्र निश्चितच बाहेर पडली! Smile

तात्या.

अभिनंदन !!!

जनरल डायर,
अभिनंदन !!!!
'मिसळपाव'मराठी संकेतस्थळावरील साहित्यविषयक धोरणाचे आम्हाला कौतुक वाटत आहे, आपले मनःपुर्वक अभिनंदन.

पूर्वी काही संस्थळांवर जी एंच्या कथा जश्याच्या तश्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या,
काय म्हणता ? धीस इज टू मच हं Smile

त्याकरता अनुमती लागत नव्हती परंतु मिपाने 'इतरत्र प्रकाशित साहित्याबद्दल आणि कॉपीराईट कायद्याच्या सन्मानाबद्दल' वेळोवेळी जे धोरण जाहीर केले ते पाहून इतर काही संस्थ़ळांचे प्रशासकही सुधारले आणि आता संबंधित साहित्याबद्दल 'अनुमती घोषित करावी' असे धोरण त्यांनीही जाहीर केल्याचे कळते!

प्रशासकाच्या अनुमतीचं फॅड 'ते' संकेतस्थळ बंद झाल्याशिवाय उतरणार नाही ? बाकी 'त्या'संस्थळाला साहित्याविषयक 'अनुमती' चा धडा मिसळपाववरुन घ्यावा लागतो, ही गोष्ट एक मिसळप्रेमी म्हणुन मला अभिमानाची आणि आनंदाची वाटते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अतिशय योग्य धोरण जनरल साहेब!

चतुरंग

अगदी योग्य निर्णय ........

प्रशासक असाच कर्तव्यकठोर असावा. डायरसाहेब अभिनंदन आणि धन्यवाद.

परंतु रसास्वाद देण्यास हरकत नसावी. माझ्याकडे असे एकदोन रसास्वाद तयार आहेत.

जशी च्या तशी कथा नाही.

अर्थात मिपा च्या शिस्तीत बसत असेल तरच अपलोड करीन.

शिस्तीमुळे राष्ट्र पुढे जाते.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

प्रशासक?

प्रशासक असाच कर्तव्यकठोर असावा. डायरसाहेब अभिनंदन आणि धन्यवाद.

सुधीरभाऊ, तुमच्या भावनेशी आम्ही सहमत आहोत.
पण डायरसायबाला 'प्रशासक' म्हटलंत तर तो चमचाभर पाण्यात जीव देईल हो!!!Smile)

प्रशासक पदवी लागली तात्याला,
म्हणे, 'हेचि फल काय मम तपाला!' Smile)))))

काय तात्या, बोलतो ते सच्ची का झूठ?

-पिवला दाम्बिस

एकदम सच! :)

डांबिसा,

पण डायरसायबाला 'प्रशासक' म्हटलंत तर तो चमचाभर पाण्यात जीव देईल हो!!!Smile)
प्रशासक पदवी लागली तात्याला,
म्हणे, 'हेचि फल काय मम तपाला!' Smile)))))
काय तात्या, बोलतो ते सच्ची का झूठ?

तुझं म्हणणं एकदम सच्ची! आम्ही 'प्रशासक' ही शिवी समजतो हो! Smile

तेव्हा एक वेळ आम्हाला 'रंडीबाजारातील रांडांच्या पाठीला साबण चोळणारा 'तुंग्रुस' म्हणा' पण तेवढं ते प्रशासक हे बिरुद आम्हाला लावू नका हो कांदळकरशेठ! Smile

तात्या.

तुझं म्हणणं एकदम सच्ची!

आरे, इतनी दूरी पे बैठा है तो क्या हुआ?
आपुनको बराब्बर मालूम!

तात्या, येक बार तुम्हारा आउर हमारा कुंडली एकसाथ वो धोंडोपंतजी को देखने को देना मंगताय! क्या साला पैले जनम का भाईबंद था क्या, पूछना मंगताय!!!Smile)
-पिवला दाम्बिस कुरेशी

काहीच हरकत नाही..

परंतु रसास्वाद देण्यास हरकत नसावी. माझ्याकडे असे एकदोन रसास्वाद तयार आहेत.

रसास्वाद देण्यास काहीच हरकत नाही. आपले रसास्वाद अवश्य येऊ द्या!

आपला,
तात्या शिंत्रे. Smile

च्यायला गोळी बिळी तर ........

घालणार नाही ना?

आमची सौ. बलवान आहे बरे. गोळी घातली तर पाहून घेईल. सांगून ठेवतो. मग रडू नका म्हणावं. चमचाभर पाणी तयार ठेवा आणि मगच गोळी घाला.

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

अर्धवटराव

अर्धवटराव आचरटाचार्य,
सुधीर कांदळकर.

योग्य!

मिपाच्या धोरणात्मक निर्णयाशी सहमत आणि सहकार्याचे आश्वासन!

नविन सभासद

ही साठमारी काय आहे? याचा उलगडा कराल काय?

कुठली साठमारी म्हणताय? मुळात साठमारी या शब्दाचा अर्थ कळेल का? म्हणजे उत्तर देण्याचा विचार करता येईल! अर्थात, उत्तर मिळेलच असे नाही!

--जनरल डायर.

साठमारी

दोन हत्तींची टक्कर्.समोरा समोर धडका.अर्थातच माहूताच्या इशार्‍यावर्.
या वादात पडण्याची इच्छा नाही.कुतुहूल .एवढेच.
इरेस पडण्याची वेळ यायला नको.

मिसळपाव डॉट कॉमच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी येथे लेखन करण्यापूर

जरी नामोल्लेख केला असला तरी ते मिपावर राहू द्यायचे किंवा नाही, हेदेखील ठरवण्याचा संपूर्ण अधिकार मिपाकडे आहे याचीही कृपया नोंद घ्यावी!
काय राव!!! गुडी पाडव्याच्या द. कृ. सोमण च्या माझ्या लेखा मुळे सर्वाना भुर्दड तर नाही ना?

संजीव

नविन सभासद

मिपाच्या सर्व सभासदाना माझा नमस्कार....

डायरसाहब

मान्य ! एकदम मान्य !!!

मिपाचे धोरन

आदरनिय जनरल डायर साहेब ,
माझे आनी इतिहासचे ऐतिहासिक वैर आहे.
आनी तरीही आपन जे काही धोरन राबवत आहात त्यास मी अनुमोदन देत आहे..
(जनरल डायर नावातच अशी धमक आहे नाही म्हनुच शकत नाही)
--आपला बैल

नविन सभासद

मिपाच्या सर्व सभासदाना माझा नमस्कार....

Kiss

स्वागत

आज मी इथे पहिल्यान्दाच आले आहे. खूप छान आहे. मी इथे जरूर लिहिन. माझे लेखन वाचत रहा

अजून एक स्वाती...

वेलकम!

शंका!

मिसळपाव च्या सर्व सभासदांना सप्रेम नमस्कार.
(मिपा हा "शॉर्टफॉर्म" वाचून मजा वाटली!!)

दुसर्‍या कोणाचे लेखन "ढापून" स्वतःच्या नावावर खपवू नये, हे तर पटण्या सारखे आहे.
पण समजा, एखादे चांगले लेखन (दुसर्‍याचे) द्यावेसे वाटत असेल, तर काय करावे?

म्हणजे मिपा वर फक्त स्वतःचेच लेखन पाठवायचे का?
कदाचित माझा गैरसमज झाला असेल.
पण तरीही डोक्यात किडा वळवळला!
(काही चूक झाल्यास, नवा समजून क्षमा करावी.)

निलकांता

निलकांता !
तात्या साहेब !

एक विनंती आहे, चर्चा व लेख चालू करण्यासाठी कमीत कमी १० ओळीच्या लेखनाची मर्यादा घाला जेणे करुन एक एक ओळीचा विषय असलेले लेख / चर्चा प्रकाशीत होणार नाहीत.

टिप :- फक्त सुचना केली आहे , बदल कराच असे काही नाही आहे.

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

नाही राजेसाहेब ...

मिपावर अशा अनेक चर्चा गाजल्या की ज्यांची सुरवात वा प्रारंभ फक्त एका ओळीने केला तरी पुरेसा होता ...

उदा. : तुम्ही काय जेवलात ? ऑफीसमध्ये टाईमपास कसा करावा ? ऑफीसमध्ये झोप येऊ नये म्हणून काय करावे ? चहा

फक्त प्रथमदर्शनी फालतू वाटणार्‍या चर्चा उडवाव्यात या बाबतीत मी आपल्याशी सहमत आहे ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

फक्त

फक्त प्रथमदर्शनी फालतू वाटणार्‍या चर्चा उडवाव्यात
ह्यासाठी देखील आवडले / नावडले असे काही तर करा जेणे करुन जे सदस्यांना आवडेल तेच राहील बाकी नष्ट करुन टाका ( जे फालतू आहे ते लेखन)

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

सहमत आहे ...

ह्यासाठी देखील आवडले / नावडले असे काही तर करा जेणे करुन जे सदस्यांना आवडेल तेच राहील बाकी नष्ट करुन टाका ( जे फालतू आहे ते लेखन)
सहमत आहे .........

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

चहा

चहा ही एक पाककृती होती. लोकानी त्यावर चर्चा करणे एन्जॉय केले.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

चहा

चहा ही एक पाककृती होती. लोकानी त्यावर चर्चा करणे एन्जॉय केले.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

कौल आहे की.

आवडले नाही आवडले यासाठी कुणीही मिसळपाव वर कौल घेऊ शकतं.

राजचा रोख लक्षात घेतला तर या आधी असंच दोन ओळींचा चर्चा प्रस्ताव टाकून नंतर त्या चर्चेतून मूळ चर्चा प्रवर्तकाने पोबारा केलेला आठवतो.

एखादी चर्चा किंवा लेख तुम्ही विस्ताराने लिहीता आहात म्हणजे तुम्ही त्या विषयाबद्दल गंभीर आहात असं मानल्या जातं असा राज यांचा रोख असावा असं मला वाटतं.

मात्र मिसळपाव वर छोट्या लेखांतून मोठ्या चर्चा घडलेल्या आठवतात. मिसळपाव मोकळं आहे ते तसंच रहावं असं मला वाटतं. कुणी याचा गैरफायदा घेत असेल तर ज. डायरची नियुक्ती त्यांना सरळ करण्यासाठीच तर आहे ना ! Smile

नीलकांत

ज. डायर..

तर ज. डायरची नियुक्ती त्यांना सरळ करण्यासाठीच तर आहे ना !

जनरल डायरने निरपराधांचे बळी घेतले होते. जालियनवाला बाग हे हत्याकांड होते. त्यामुळे मुळातच 'जनरल डायर' नांवात दहशत असली तरी ते मिपाच्या हलक्या-फुलक्या वातावरणात विसंगत वाटतं. बाकी आपली मर्जी.

माझी कसली आलीये मर्जी?

अहो पेठकर काका,

माझी कसली आलीये मर्जी? मर्जी 'त्या' जनरल डायरची. Wink

(निरपराध) नीलकांत.

हा: .. ह्हा:.. ह्ह्हा:......

हा: .. ह्हा:.. ह्ह्हा:...... मान्य..!

(निरपराध) नीलकांत.

सांभाळा.... जनरल डायर , अपराधी - निरपराधी वगैरे काही पाहात नाही........फ्फाय्यर........

नीलकांत

नीलकांत आणी तात्या दोघांचे....
पाककृतीचा वेगळा विभाग निर्माण केल्याबद्दल विषेश आभार.

विद्याधर

नमस्कार

मिपा वरील सर्व सभासदांना माझा नमस्कार. आपली मतं मांडण्या साठी चांगली साइट आहे. मला साइट आवडली.

धन्यवाद,

मिपा वरील सर्व सभासदांना माझा नमस्कार. आपली मतं मांडण्या साठी चांगली साइट आहे. मला साइट आवडली.

धन्यवाद जयंतराव! मी आपल्याशी सहमत आहे, मलाही ही साईट आवडली! Smile

तात्या.

मस्तच

परखड्पणा , आणि निर्णय आवडल्यानेच मिपा चा सदश्य झालो आहे.
आजच जोइन झालो आहे .. वाचतो आणि जमल्यास लिहितो येथे.

धन्यवाद ..

गणेशा

धन्यवाद.

अरेच्च्या इतके वेळा वाचूनही इथे मी प्रतिक्रिया कशी नाही दिली. Thinking Sad

जनरल डायर ह्यांच्याशी सहमत. चांगले धोरण आहे.
ह्या सोबत एक प्रश्न.
इथे प्रसिद्ध झालेले लिखाण जर इतर ठिकाणी वापरायचे असेल तर फक्त लेखकाच्या परवानगीची गरज आहे की मिसळपावच्या संमतीचीही गरज आहे?

उत्तर..

इथे प्रसिद्ध झालेले लिखाण जर इतर ठिकाणी वापरायचे असेल तर फक्त लेखकाच्या परवानगीची गरज आहे की

त्याबाबतची परवानगी संबंधित लेखकांनाच विचारावी, मिसळपाव डॉट कॉम त्याबाबत काहीच निर्णय देऊ शकत नाही/देणार नाही.

मिसळपावच्या संमतीचीही गरज आहे?

इथे प्रसिद्ध झालेल्या लेखनावर मिसळपाव डॉट कॉमचा कुठलाही कॉपीराईट/हक्क/अधिकार नाही. सबब, मिसळपाव डॉट कॉम वर प्रसिद्ध झालेले लेखन इतरत्र कुठे प्रसिद्ध झाल्यास त्याबाबत सदर लेखनाचा लेखक व ते लेखन प्रसिद्ध करणारी व्यक्ति यांनी काय ते पाहून घ्यावे. मिसळपाव डॉट कॉमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, तसेच मिसळपाव डॉट कॉम त्याबाबतीत कुणालाही उत्तरदायी नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी...

कळावे,

आपला नम्र,
तात्या अभ्यंकर ऊर्फ जनरल डायर ऊर्फ सरपंच,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.

नविन सभासद

आपना सर्वाना मयुर चा नमस्कार!!!

नमस्कार.

नमस्कार, मयुर.
मिसळपाववर तुमचे स्वागत आहे.

योग्य निर्णय

हिन्दुस्तानात आमच्या कथा चोरुन सिनेमे बनवतात...
आणी रोयल्टी पण देत नाहीत...

माझे प्रतीसाद स्वीकारले जात नाही

तुम्हाला मुभा नाहि असा संदेश येत आहे काय करावे ?????????????

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

नविन सभासद

मिपा च्या सर्व मंड्ळीना माझा नमस्कार.

तमाम मिपाकरांना नमस्कार!

नमस्कार,
मला सदस्य होऊन तसे बरेच दिवस झाले. पण "येण्याची नोंद करण्याचा" आम्हाला भारी कंटाळा Yawn ! आता मात्र शक्य तितका सक्रिय राहण्याचा प्रयत्न करेन..
-- अजित