मस्तानी
चार घोडे चार हत्ती
त्यांच्या मागून चंद्रबत्ती
मेणा हवे संगे डोलतो
त्यातून गोरा हात डोकावतो
नितळ कांती हातावरती
बोटे नाजूक निमुळती
नखामध्ये खेळे जास्वंदी
आकार त्याचा कुसुम्बी
मेणा अचानक थांबतसे
"काय झाले?" ती हळूच पुसे
मधुर तो आवाज तिचा
नाद मुरलीचा भासतसे
कांचन सोने फिके पडे
अशी ती गौर सौंदर्या
हिर्याचेही तेज निमाले
अशी तिची कर्पूर चर्या
मुखडा जणू आभाळी
चंद्र पौर्णिमा उधळतो
नयनाचे दोन दिवे
नक्षत्र साक्षात्कार घडवितो
धनुष्याची जणू प्रत्यंचा
असा भुवईचा बाक झोकदार
वळण सफाई अशी तिची की
ढंग भासे छबीदार
नाक चाफेकळी नाजूक नथनी
जणू जडावली रत्न कोंदणी
ओठांचा तलम पडदा लाल
झाकून टाके दंतकळी
हनुवटी निमुळती अशी
तलवार जणू ती लखलखती
त्यावर उमटे खळी नाजुकशी
चांदणी नभी जशी चमचमती
डौल मोराचा मान मिरविती
वक्षी रतीचा भास असे
संगमरमरी कटी नितळसी
लावण्यावर साज दिसे
अशी मोहक रमणी मायेने
फुरसदिने घडवली असे
घेवूनी कुंचला सौंदर्याचा
पिंड तिचा सजलासे
कायेला तिच्या रंग देण्या
इंद्रधनु हे वापरले
गळ्यात तीचिया देवाने
जणू मधुगंध फुलांचे ओतिले
तिच्या मादकतेचे तेज जणू
सौदामिनीने मढले असे
तिच्यातील नाजूक मार्दव हे
जाई जुई चा अर्क असे
तिला भेटला असा मर्द की
कुर्बान तिने केली जवानी
माय अश्या प्रेमकहाणीची ती
बाजीरावाची मस्तानी
बाजीरावाची मस्तानी
अनुजा(स्वप्नजा)
कविता
+१
+१
साक्षात
सुंदर
आभार
भाग २ मस्तानी
छान आहे
हो म्हन्जे