✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

नाच नाचूनी नाचू मी किती

प — पाषाणभेद, Fri, 04/09/2010 - 06:12
नाच नाचूनी नाचू मी किती
पैंजण वाजे छुम छुम छननन | नाचतांना गेले भान हरपून || थांबायाची वाटे मज भिती | नाच नाचूनी नाचू मी किती || ||धृ|| सुरूवातीला राही अवखळ अदा | मीच झाले माझ्यावर फिदा || नाचण्याचा छंद लागूनी | जडली वेडी प्रिती || ||१|| काळी चंद्रकळा आली नेसून | खडी त्यावरी चमके चमचम || मिलन होता जगदिशाशी | तुझी अन माझी एकच मिती || ||२|| थांबायाची वाटे मज भिती | नाच नाचूनी नाचू मी किती || ||धृ||
----------------------------------------------------------------------------------------------------------
***************************** (पैंजण वाजे छुम छुम छननन | नाचतांना गेले भान हरपून || काळाचे चक्र चालू आहे. त्यात सेकंदा सेकंदाची भर पडत आहे. | "नाचतांना" म्हणजे जीवन जगतांना भान हरपून गेले || थांबायाची वाटे मज भिती | नाच नाचूनी नाचू मी किती || ||धृ|| हे सगळे थांबायची (शेवटाची) भिती मला वाटते आहे. | असे असतांना मी जीवन जगू किती? || सुरूवातीला राही अवखळ अदा | मीच झाले माझ्यावर फिदा || बालपण/ तरूणपणी मी अवखळ होतो. | मी माझ्याच गुर्मीत होतो. || नाचण्याचा छंद लागूनी | जडली वेडी प्रिती || ||१|| जीवन जगण्याचा छंद लागला | तेच मला आवडू लागले. || काळी चंद्रकळा आली नेसून | खडी त्यावरी चमके चमचम || जन्मा आलो ते मरण (काळी चंद्रकळा) घेवून | जन्मानंतर फक्त जगण्याचा आनंद होता || मिलन होता जगदिशाशी | तुझी अन माझी एकच मिती || ||२|| मरणानंतर मी जगदिशाशी एकरूप झालो | त्याची अन माझी मिती एकच झाली (One Dimension)|| थांबायाची वाटे मज भिती | नाच नाचूनी नाचू मी किती || ||धृ|| हे सगळे थांबायची (शेवटची) भिती मला वाटते आहे. | असे असतांना मी जीवन जगू किती? || ) *****************************
- पाषाणभेद (दगडफोड्या) ०९/०४/२०१०

प्रतिक्रिया द्या
1531 वाचन

💬 प्रतिसाद (1)

काळाचे

पाषाणभेद
Fri, 04/09/2010 - 12:44 नवीन
काळाचे चक्र चालू आहे. त्यात सेकंदा सेकंदाची भर पडत आहे. "नाचतांना" म्हणजे जीवन जगतांना भान हरपून गेले. हे सगळे थांबायची (शेवटाची) भिती मला वाटते आहे. असे असतांना मी जीवन जगू किती? बालपण / तरूणपणी मी अवखळ होतो. मी माझ्याच गुर्मीत होतो. जीवन जगण्याचा छंद लागला. तेच मला आवडू लागले. जन्मा आलो ते मरण (काळी चंद्रकळा) घेवून. जन्मानंतर फक्त जगण्याचा आनंद होता. मरणानंतर मी जगदिशाशी एकरूप झालो. त्याची अन माझी मिती एकच झाली (One Dimension). हे सगळे थांबायची (शेवटची) भिती मला वाटते आहे. असे असतांना मी जीवन जगू किती?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा