✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अफलातून जाहिराती

न
निमिष सोनार यांनी
गुरुवार, 04/08/2010 - 19:10  ·  लेख
लेख
प्रस्तुत आहेत, काही जुन्या प्रसिद्ध जाहिराती .... "व्यंगचित्रकाराच्या" मिस्कील तिरकस नजरेतून... वाचतांना मूऴ जाहिराती आठवल्यास वाचनाचा आनंद आणखी वाढेल यात शंका नाही.... अशा प्रकारचा माझा हा पहिलाच प्रयोग.... मूळ जाहिराती मुद्दाम येथे सांगत नाही... तो तुमच्यासाठी होमवर्क समजा :-) ------- (1) जांभूळ छाप दंतमंजन - कमनीय शरिरयष्टीचे रहस्य! 'रोहते' या गावी एक 'वीर' खेळाडू , 'उसने' अवसान चेहेऱ्यावर आणून ऊस खाणाऱ्या एका 'पायल' वाजवत असलेल्या अभिनेत्रीला म्हणतो : "काय गं, तुझ्या मजबूत दातांचे रहस्य मला सांगतेस का?" ती म्हणते : " असा ऊस खायला मजबूत दात हवेत. हे दातच नाही तर माझे शरिरसौष्ठव पण बघ. " (असे म्हणून ती कमर हलविते) वीर : " सांग ना गं, रहस्य! " ती : " जांभूळ छाप जांभळे दंतमंजन. याने रोज दात घासल्याने असे माझ्यासारखे मजबूत दात आणि मजबूत शरिरयष्टी बनते." (मग ती पटापट सात आठ ऊस खाते) अहो, तर मग वाट कसली बघता? वापरा, जांभूळ दंतमंजन! मजबूत दात, मजबूत शरिरयष्टी! (2) उटण्याचा अक्स साबण... एक सुंदर मुलगी जमेल तेवढे अंगप्रदर्शन करत सकाळी सकाळी घरातील सदस्यांसमोर आंघोळीची योजना जाहीर करते : " मी आंघोळ करायला चालली आहे, पुतळ्याची! " सगळे घरातील सदस्य तीला बँड बाज्यासह पुतळ्याजवळ घेवून जातात. ती पुतळ्याची आंघोळ घालते. ( 'अक्स' पुतळा साबण! या सोबत एक यंत्र मोफत. ते पुतळ्याजवळ ठेवून त्यात साबण टाकून ठेवा, म्हणजे पुतळा थोड्या थोड्या वेळेने आपोआप धुतला जातो ) (3) सूपर "ठंडा" तेल... एक बायको रागारागात तणतणते : " मी चालले माहेरी कायमची " नवरा पण फणफणतो : "चल, स्टेशनवर सोडायला येतो तुला " रागाने नवरा एके ठिकाणी बसतो. तोपर्यंत बायको कपडे भरते. एकजण नवऱ्याला एक 'सुपर' गरम तेल देतो. नवरा ते डोक्याला लावतो. तेल लावल्यामुळे तो भणभणत उठतो. घटस्फोटाचं सर्टिफिकेट तीला देतो. म्हणतो : " हे नाही का घेवून जाणार सोबत ?" (बघितलंत आमच्या तेलाचा प्रभाव? झटपट असरदार !) (4) चोरांची खिच खिच चोरी करण्यासाठी एक चोर एका घरात घुसतो. त्याच्या गळ्यात 'खिचखिच' व्हायला लागते. घरातील आजीला जाग येते. ती म्हणते, " बेटा, चोरी करायला आला आहेस ना. घाबरू नकोस. हे घे आधी. हे 'गरारा' सायरप आहे. ते पी, खिचखिच दूर कर, आणि मग शांततेने चोरी कर." चोर गरारा सायरप गटागटा पितो. आणि बेशुद्ध पडतो. आजी पोलिसांना फोन करून चोराला पकडून देते. (बघितलंत! आमच्या कंपनीचे गरारा सायरप! चोरांना पकडण्याचा नामी उपाय! आजच घ्या...) (5) साडी में साडी ... प्रतिनिधी : आपण कोणती साडी खरेदी केली? महिला : 'सुपर' साडी ! प्रतिनिधी : का? महिला : फुकटात मिळाली म्हणून! एक अभिनेता : अरे! ही साडी तर माझी पत्नी पण नेसते. प्रतिनिधी : समजूतदार आहे ना ती म्हणून ! अभिनेता : हे! चुप! खबरदार, पुन्हा असे म्हणालास तर! (6) दाग- द फायर... टिकीया प्रतिनिधी : ( आम्ही माफी मागतो की आम्ही सौ. सुनीता यांची मुलाखत त्यांना न विचारता शूट केली ) आपण कोणती टिकीया वापरता? महिला : कोणत्याच टिकिया वर मला विश्वास नाही. तुमच्या कंपनीच्या तर मुळीच नाही. प्रतिनिधी : का बरे? महिला : अहो, चांगल्या पांढऱ्या कपड्यावर डाग पडतात... आहे तेच डाग जात नाहीत आणि धुतल्यावर अजून डाग पडतात!" प्रतिनिधी : समजा , मी ही टिकीया तुम्हाला फुकटात देवू केली, तर? महिला : नको! मुळीच घेणार नाही. प्रतिनिधी : ( दर्शकांना ) बघितलंत ! फुकटात सुद्धा घ्यायला कुणी तयार नाही आमची टिकिया! तुम्ही तरी घ्या हो आणि आमची लाज राखा! (7) उध्वस्त ग्राईप वॉटर "काय झालं?" "बाळ रडत होतं." " ऐकत नसेल तर थोबाडीत दे त्याला. तू लहान असतांना मीही तुला तेच देत होते." (8) धुण्याची शुभ्र वडी एका समारंभात नवरा बक्षीस घेतांना त्याचा सदरा मळलेला असतो. त्याचे वरिष्ठ म्हणतात : " आजच्या दिवशी एवढा मळलेला शर्ट ... मळलेला शर्ट ... मळलेला शर्ट ? " संतापून नवरा समोरच्या खुर्चीवर बसलेल्या बायकोकडे बघतो. बायको म्हणते : " एक वेळ बदलून टाकेल मी नवऱ्याला, पण ... माझी धुण्याची साबण वडी नाही बदलणार! " (पाहिलंत? आमच्या साबण वडीवर किती विश्वास आहे महिलांना! आजच, आताच घ्या आमची वडी...) (9) नाटीका शांपू एक बारा तेरा वर्षाची मुलगी एका तरंगणाऱ्या हिरव्यागार पानावर मोकळे केस सोडून उभी राहून म्हणते : " माझे जहाज, आहे ना छान? .... कोठून आणले विचारता? ... सांगू ? भाड्याचे आहे! मग ती पांढरे स्वच्छ केस दाखवते : " माझे केस! आहे ना पांढरे शुभ्र! ... कसे काय पांढरे झाले विचारता? .... सांगू? ... आं .... मी नाही सांगणार ! " ( बघितलंत.. ती जरी नसेल सांगत तरी, आम्ही सांगतो ना! ही कमाल आहे आमच्या शांपूची... वापरा आमचा शांपू.. केस करा शुभ्र ... शुभ्रतेची चमक ! पुन्हा पुन्हा! ) (10) आला नवा "प्रकाश" -"उ"जाला प्रतिनिधी : " पाहा पहा, ही लगबगीने जाणारी लोकं.. यांना विचारू या आपण यांनी काय खरेदी केलंय ते. " एकीला तो विचारतो : " आपण काय खरेदी केलंत? " ती : " लख्ख-उजेड " धुण्याची पावडर.. प्रतिनिधी दुसरीला : " तीने बघा " लख्ख उजेड " ला आपलंसं केलं...आणी तुम्ही ? " दुसरी : मी? " अंधार " पावडर! ( आला लख्ख उजेड ... चार थेंबांचा हा हा..) (11) पिवळे दंतमंजन शिक्षक : " ही आहे आपल्या दातांची रचना ! , अरे काजू , तुझे दात तर खुप पिवळे झालेत? याचे रहस्य सांग! " काजू : " का नाही होणारे ते पिवळे, मास्टरजी ! मी 'हार्बर' चे पिवळे दंतमंजन वापरतो ना! " --- माझ्या मराठी व्यंगचित्रांच्या ब्लॉगला जरुर भेट द्या- http://cartoonimish.blogspot.com
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3701 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

मस्त

राजेश घासकडवी
Fri, 04/09/2010 - 04:20 नवीन
मी सगळ्या जाहिराती पाहिलेल्या नाहीत, पण मजा आली.
  • Log in or register to post comments

कस वाटल?

स्पंदना
Fri, 04/09/2010 - 07:29 नवीन
लहाणपणी पोटाला गुदगुद्या केल्यावर जस वाटायच ना? तस्स! शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते, ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा