फ्लॅशबॅक
निव्वळ वासाने/गंधाने सुद्धा मी नास्टालजिक होतो. कुणाला मातीचा वास, तर कुणाला फ़ुलांचा वास आवडतो. कुणाला फ़ळांचा आवडत असेल तर कुणाला आजुन कश्याचा वास/गंध आवडत असेल. मला खुप विविध गंध आवडतात. पेट्रोल च्या धुराचा, फ़टाक्याच्या धुराचा. कुठेही व कधीही फ़टाक्याच्या धुराचा वास आला की लगेच मला माज़्या बालपणाच्या दिवाळीची आठवण येते. मुसळधार पावसात आडोश्याला म्हणुन बंद दुकानच्या पायरीशी उभ -हाव आणि कुठुनतरी जळत्या सिगरटेचा वास यावा. या पावसाळ्यात भिजताना तर खुप भास होतात आल/गवती चहाचा नाही तर कांदाभजीच्या तळणाचा खमंग वास हमखास गारुड घालतात मनावर. दुस-या दिवशी सकाळी उशीला येणारा गज-याचा गंध असुदे कींवा न्हाल्यानंतर येणारा शिकेकाईचा गंध खुळ लावतो जिवाला.
तसच काहीस वळिवाच्या सरीनंतर येणा-या म्रुदगंधाची धुंदी मला माझ्या गावतल्या शिवारावर घेउन जाते. नांगरलेल्या जमिनीवर तो ढेकळांचा जत्था आणि त्या पहील्या पावसाच्या सरीनंतर (मिठीत विरघळावा तसा) अलगद विरघळणारा तो काळ्या मातीचा गोळा. त्या मिलनाचा आसमंत भरुन आणि भारुन टाकणारा सुवासीक दरवळ. मी खरोखरीच हरवुन जातो स्वत:ला आणि भानावर आल्यावर एका समाधी अवस्थेची त्रुप्ती झळाळते डोळ्यात.
काल रविवारी एका मित्रासाठी नेटवरुन लहान बाळांचे फ़ोटो डाउनलोड करत होतो. मला (लहानपणापासुनच) लहान बाळांची खुप आवड. चाळीतली बरीच मुल फ़ेरफ़टका मारुन आणायला माझ्याच खांद्यावर असत. त्यातच बोनसची भर म्हणजे आमच्या शेजारील मावशी पाळणाघर चालवत असत.
तर ते फ़ोटो डाउनलोड करताना नकळत परत एकदा "त्या" गंधाने झपाटलं तो म्हणजे दुपट्याला येणारा दुधाचा,पावडरचा,तेलाचा,काजळाचा ई.चा. संमीश्र वास. त्या आठवणितल्या वासानेच मला अस हातात तान्ह बाळ असल्याचा भास होतहोता. त्या एका वासाच्या आठवाने किती बाळं झरझर डोळ्यासमोरुन गेली म्हणुन सांगु. (आज त्या पैकी काहींची लग्ने झाली असुन आता त्यांची बाळे माझी खेळणी झाली आहेत.) त्यांना न्हाउ, खाउ घालण्यापासुन, लंगोटे बदलण्या पर्यंत सर्व गोष्टी मी आनंदाने केल्या होत्या त्याची ही सव्याज परत फ़ेडच होती जणु.
या वासाच्या आठवणी मला एकदम फ़्लॆशबॆक मधे घेउन जातात. त्या मधे पुतण्यांचा जन्मापासुन ते माझ्या मुलाच्या जन्मा पर्यंतच्या सगळ्या गोष्टी/घटना लख्ख आठवतात.
त्यांना वाटी चमच्याने दुध पाजल्यावर ढेकर येण्यासाठी पाठीवर हालके हालके धपाटे मारत फ़े-या मारणारा मी दिसतो. वहिनींचा आर्जव आठवतो "आहो भावजी जरा याला झोपवाना" भावजी लगेच सेवातत्पर :D . त्याला मांडिवर घेउन जोजवण खाली ठेवताना जरा जरी हालचाल जोरात झाली की ट्यां,
मग मांडीला मुंग्या येइपर्यंत जोजवण चालुच, पण त्यात सुद्धा समाधान होतं. खांद्यावर निवांत डोक ठेवुन ती बाळं किती निरागसपणे झोपतात नाही? आपल्याला पण जरा जोरात हालाचाल करायचा मग धिर होत नाही. घरातल बाळ आजारी असेल तर आख्ख घर आजारी असल्याचा भास होतो मला. आज पण माझ्या मुलाला झोप लागे पर्यंत बाबाच्या हाताची उशी लागते.
एका वासाच्या निमीत्ताने असा सगळा आठव जागा होतो आणि मग भानावर आल्यावर बघतो तर काय मुलगा हासत म्हणत असतो"आई बाबा हारवले बघ परत एकदा"
लेखन हा माझा प्रांत नाही म्हणुन लेखन/विचार कदाचित विस्कळीत वाटतील. पण तुम्हा सर्वांसाठी मनापासुन एकच प्रार्थना करीन "तुमच्यातले लहान मुल सदैव हासर राहुदे आणि त्याच्यासारखीच शांत+चिंतामुक्त झोप तुम्हाला लाभुदे"
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेख
"या
सुन्दर
वा
छान!
जयपालशेठांचा..
छान...
गंधांची ती
बरोबर आहे
खुप मोठ्ठा
संजाजी
सल्ल्याबद
सर्व वाचक आणि
अरे काय लिहिलंय !
+१ हेच!!
स्सह्हीच
मस्त लेख...
खुप छान