✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अर्ध्या तासाचा फरक

अ
अरुंधती यांनी
Sat, 03/20/2010 - 20:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2965 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

नशीबवान आहात.

प्रमोद देव
Sat, 03/20/2010 - 22:17 नवीन
अरूंधतीतै, तुम्ही खरंच नशीबवान आहात... माझ्या बाबतीतही अशीच एक घटना घडली होती. ८८-८९ मध्ये मी दिल्लीत होतो. राहायला गोल मार्केट परिसरात आणि तिथून नेहमी बसने संसदभवन मार्गावरील माझ्या कार्यालयात जात असे. तो काळ म्हणजे खलिस्तानी चळवळीचा बहराचा काळ होता. दिल्लीत अधून मधून बाँबस्फोट होत असत. असेच एक दिवस मी बस थांब्यावर येईपर्यंत माझ्या नजरेसमोर माझी बस धडधडत निघून गेली. त्यानंतरची बस साधारण अर्ध्या तासाने होती म्हणून मी चालतच निघालो. मी माझ्या कार्यालयाच्या जवळ पोहोचलो आणि मला कळले की रस्ता, वाहतुक पोलिसांनी बंद केलाय. थोडी चौकशी केल्यावर कळले...की बसमध्ये बाँबस्फोट झालाय...बरेच जण मेले/जखमी झालेत. लांबून ती भग्न बस दिसत होती...तिच्यावरचा मार्गक्रमांक वाचला..तो मात्र शाबूत होता...(त्यावेळी दिल्लीत बसवर खूप ठळक अक्षरात पुढे आणि मागे मार्गक्रमांक लिहायचे..आता सद्द्या काय आहे माहित नाही. ....योगायोगाने ती तीच बस होती...जी मला न घेताच निघून गेली होती. :( त्या विलक्षण योगायोगाचा विसर मला आजही पडलेला नाहीये.
  • Log in or register to post comments

???

तिमा
Sun, 03/21/2010 - 11:27 नवीन
तो काळ म्हणजे खलिस्तानी चळवळीचा बहराचा काळ होता
देवसाहेब; विषारी झाडांना फुले, फळे आली तरी त्याला बहर आला असे म्हणत नाहीत. वाक्य खटकले म्हणून लिहिले. ति. माणूसघाणे(री) हर शख्सको अपना बनाके देख लिया मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

देवसाहेब,

अरुंधती
Sun, 03/21/2010 - 12:42 नवीन
देवसाहेब, तेव्हा मला खरंच जाणवले की आपली घरी कोणीतरी काळजी करत असते, देवाकडे :) आपण सुखरूप राहावे म्हणून प्रार्थना करत असते....त्या प्रार्थनेत किती ताकद असते ते अशा प्रसंगातून गेल्यावरच कळते! तुमचा अनुभवही तितकाच अंगावर काटे आणणारा..... बचावलात! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

खरं आहे तुमचं म्हणणं!

प्रमोद देव
Sun, 03/21/2010 - 13:06 नवीन
पण एकूणच काळ आणि वेळ एकत्र आल्याशिवाय आपल्याला इथून सुटका नाही. ;) असाच एक प्रसंग म्हणजे..मुंबईत एकाच वेळी घडलेले बॉंबस्फोट...बाबरी पतनानंतर मुंबईत जे घडले ... त्याच दिवशी मी मुंबई शेयर बाजारच्या इमारतीत जाऊन परत चर्चगेटला आलो..तिथे माझा एक मित्र भेटला...त्याने विचारले मला...शेयर बाजारात बॉंबस्फोट झाला ना...नक्की काय झाले सांग ना. मी त्याच्याकडे वेड्यासारखा पाहात राहिलो...म्हटलं नाही रे...आत्ताच तर मी तिथून येतोय...तर म्हणाला...काही तरीच काय? आत्ता बातमी आलेय की तिथे बॉंबस्फोट झालाय...तळघरात...जिथे पार्किंग होतं.... आता आश्चर्य करण्याची पाळी माझी होती. तसाच त्याला बरोबर घेऊन परत फिरलो आणि शेयर बाजाराची वाट धरली...ते चित्र फारच भीषण होतं. :( मध्यंतरी मी तिथून निघून जरा वाट वाकडी करून माझ्या एका मित्राला भेटायला गेलो होतो आणि मधल्या काळात बहुधा ही घटना घडलेली असावी...तरीही फार नाही पण मधे जेमतेम १५-२० मिनिटांचा वेळ गेला असावा. एकदा ह्यावर सविस्तर लिहावं लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुंधती

अनुभवकथन

अभिज्ञ
Sat, 03/20/2010 - 22:30 नवीन
अनुभवकथन आवडले. माझ्याही बाबतीत दोनेक वेळा असाच काहिसा अनुभव आला. एकदा कोल्हापुरला जात होतो. स्वारगेटला एका बस मध्ये चढलो,बस ब-यापैकी रिकामी होती परंतु का कोणास ठावूक त्या बस मधुन खाली उतरून दुसरी उशीराची बस पकडली. नंतर वाटेत ह्या आधीच्या बसचा अपघात झालेला दिसला. अभिज्ञ.
  • Log in or register to post comments

बापरे!

अरुंधती
Sun, 03/21/2010 - 12:44 नवीन
#:S थोडक्यात वाचलात की हो! अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिज्ञ

लेखनशैली

आळश्यांचा राजा
Sat, 03/20/2010 - 23:41 नवीन
लेखनशैली अतिशय सुरेख आहे! खिळवून ठेवणारी. आळश्यांचा राजा
  • Log in or register to post comments

लेखन आवडलं!

राघव
Sun, 03/21/2010 - 00:17 नवीन
छान लिहिता. अवांतरः बाकी तुमच्या ओघवत्या लेखनशैलीमुळे वेदश्री जोशीची आठवण झाली. काय म्हणता श्रावणदा? राघव
  • Log in or register to post comments

अरुंधती ताई

इंटरनेटस्नेही
Sun, 03/21/2010 - 08:21 नवीन
छान लिहलयं.. डोळ्यांसमोर चित्र उभे राहीले. (आमच्या काही आय. व्हीज. ची आठवण झाली.)
  • Log in or register to post comments

अस्साच बोल्तो !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/21/2010 - 09:43 नवीन
छान लिहलयं.. डोळ्यांसमोर चित्र उभे राहीले. सुरेख लेखनशैली...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

अनुभव!

स्वाती दिनेश
Sun, 03/21/2010 - 12:33 नवीन
काळ आला होता पण वेळ आली नव्हती... थरारक अनुभव, छान लिहिले आहे. स्वाती
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

अरुंधती
Sun, 03/21/2010 - 12:47 नवीन
:) सर्वांचे धन्यवाद! लिहिताना पुन्हा त्या ठिकाणी, त्या काळात जाऊन आले. अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा