कर्मण्येवाधिकारस्ते . . .

दत्ता काळे's picture
दत्ता काळे in जे न देखे रवी...
5 Mar 2010 - 11:52 am

छोटेखानी जुना बंगला अन्
त्यातला म्हातारा मालक . .
आपल्या परदेशस्थित मुलाच्या
चार दिवसाच्या वास्तव्याच्या तयारीत . .

अंगणभर विखुरलेल्या पानांचा पसारा
झाडताना बघतो फाटकाला बिलगलेल्या
मधुमालतीच्या वठलेल्या वेलीच्या खोडाकडे . .
आणि विषादाने हसत परत झाडू लागतो
फाटकापासून बंगल्यापर्यंत नेणारी, खचलेल्या सुट्ट्या फरश्यांची
कर्मयोगी पायवाट . . .
पानांचे मळभ हटल्यावर मोकळी .

शुष्क पानगळ सुरुच राहते.
गोळा केलेली ढिगाराभर पाने,
पेटवून देऊन थांबतो म्हातारा धगीपाशी
लवलवणार्‍या ज्वाळा बघून
विषादाने हसतो आणि स्वतःलाच म्हणतो
गतिमान काळाच्या चक्रात
अगतिकपणे बांधून घेतलेला तुझा मुलगा,
कधीतरी . . .नंतर . . .
शेवटपर्यंततरी थांबेल कां,
फुटेपर्यंत ?

मुक्तकसमाज

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

5 Mar 2010 - 12:38 pm | मदनबाण

मुक्तक आवडले...

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

राजेश घासकडवी's picture

5 Mar 2010 - 12:40 pm | राजेश घासकडवी

फाटकापासून बंगल्यापर्यंत नेणारी, खचलेल्या सुट्ट्या फरश्यांची
कर्मयोगी पायवाट . . .
पानांचे मळभ हटल्यावर मोकळी .

हे छान झालंय.

गतिमान काळाच्या चक्रात

थोडं कृत्रिम वाटतं.

फुटेपर्यंत?

खूप प्रभावी आहे.

राजेश

विसोबा खेचर's picture

5 Mar 2010 - 2:20 pm | विसोबा खेचर

दत्ताबुवा,

कविता खूप प्रभावी वाटली.. सुरेखच!

तात्या.