संदीप खरे यांच्या 'मी मोर्चा नेला नाही' ह्या कवितेतुन प्रेरणा घेत आमचाही १ 'सुमार' प्रयत्न......
(संदीप खरे यांची माफी मागुन)
मी दारु प्याली नाही...मी सिगारेट ओढली नाही
मी सुपारीसुद्धा साधी कधी खाल्लेली नाही
भवताली पार्ट्या चाले, त्या विस्फारुन बघताना
कुणी ग्लासातुन पिताना, कुणी बाटलीतुन पिताना
मी वेटर बनुनी शिरलो, डिस्कोच्या बाजुस जेव्हा
मला ऑर्डर द्यायलादेखील, कुणी बोलावले नाही
चेन स्मोकर मी झालो, चावल्या नुसत्याच काड्या
पावसात बेवडा झालो, थंडीत फुकल्या विड्या
पण खिशातुन कुठलीही पैशाची आवक नाही
कुणी मार आवरला नाही, कधी लॉटरी लागली नाही
मळलेला पारोसा सदरा, फाटलेली एकच चड्डी
गळ्यात अडकवुन टाकली तुटलेली लांबशी हड्डी
मी बाउंसरला भ्यालो, मी आंटीलाही भ्यालो
मी स्वप्नातसुद्धा माझ्या कधी पायरी चढलो नाही
मज जन्म व्होडकाचा मिळता मी स्मिरनॉफ झालो असतो
मी असतो जर का बीयर तर कोब्रा झालो असतो
मज पिता पिता कोणी रडले वा ओकले नाही
मी व्हिस्की झालो नाही! रमही झालो नाही!
- छोटी टिंगी ;)
प्रतिक्रिया
15 Mar 2008 - 3:37 pm | धमाल मुलगा
वा शेठ! वा.
................
...मज पिता पिता कोणी रडले वा ओकले नाही
मी व्हिस्की झालो नाही! रमही झालो नाही!
पण खिशातुन कुठलीही पैशाची आवक नाही
कुणी मार आवरला नाही, कधी लॉटरी लागली नाही
अरेरे ... वाईट वाटल॑.
===
पण हे वाचता वाचता मला झि॑ग आली..
एकुण काय, तर हल्ली मिपावर आमच्या दारवा॑च्या विषया॑चा चा॑गलाच अ॑मल चढलेला आहे.
डा॑बिसकाका, डॉनराव, तात्या,इनोबा...अणि समस्त ''आर्य मदिरा समाज' सदस्यहो, प्रयत्ना॑स यश येते आहे!!!!!
15 Mar 2008 - 3:43 pm | इनोबा म्हणे
हाण तिच्यायला....अजून एक विडंबनकार वाढला...आता कांपीटीशन जोशात होणार दिसतंय
मज जन्म व्होडकाचा मिळता मी स्मिरनॉफ झालो असतो
मी असतो जर का बीयर तर कोब्रा झालो असतो
आयला बरं झालं किंगफिशर नाय झालास ते... नायतर लगेच पिऊन टाकली असती...
मी दारु प्याली नाही...मी सिगारेट ओढली नाही
मी सुपारीसुद्धा साधी कधी खाल्लेली नाही
धत्तीच्या! मानसाचा जन्म घेतला तरी कशाला
टिंग्या लेका हाण आजून एका पेक्षा एक फर्मास विडंबन...!
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
15 Mar 2008 - 8:08 pm | प्राजु
छान जमले आहे विडंबन..
त्या संदीप ला जर कळले की त्याच्या गाण्यांचे इथे तुकडे पडताहेत तर ....खरंच तो मोर्चा काढेल मिपावर... :))
- (सर्वव्यापी)प्राजु
16 Mar 2008 - 1:02 pm | अविनाश ओगले
जमलंय विडंबन.... मस्त मजा आली...
17 Mar 2008 - 5:28 am | अवधुत पुरोहित
(फिल्मी बेवडा) अवधुत