'मराठी भाषा दिनाच्या' शुभेच्छा!

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जनातलं, मनातलं
27 Feb 2010 - 3:51 am

आज २७ फेब्रुवारी. वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन म्हणजेच आपला मराठी भाषा दिन.

तमाम मराठी बांधवांना 'मिसळपाव' परिवाराकडून 'मराठी भाषा दिनाच्या' शुभेच्छा!

संस्कृतीसमाजशुभेच्छामाहिती

प्रतिक्रिया

प्रशु's picture

27 Feb 2010 - 5:35 am | प्रशु

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी....

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा....

विसोबा खेचर's picture

27 Feb 2010 - 8:12 am | विसोबा खेचर

शुभेच्छा!

प्रमोद देव's picture

27 Feb 2010 - 8:27 am | प्रमोद देव

महाराष्ट्र,ज्याची बोली भाषा आणि राजभाषा(कागदोपत्री) मराठीच आहे...
तरीही आम्हाला 'मराठी भाषा दिन' साजरा करावा लागतोय..तोही महाराष्ट्रात....हे आमचेच दूर्दैव...आणि अशा दिनाच्या शुभेच्छा देणं तर अजूनच मोठे दूर्दैव....
तरीही मी आजच्या दिवशी अशी सदिच्छा व्यक्त करतो की...निदान ह्या निमित्ताने तरी समस्त मराठी जनांस आपल्या मायबोलीत बोलतांना,लिहितांना ह्यापुढे लाज न वाटो आणि त्यांच्यात असलेला न्यूनगंड दूर होवो.

जय मराठी,जय महाराष्ट्र

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

II विकास II's picture

27 Feb 2010 - 8:35 am | II विकास II

काकांशी सहमत
सकल मराठी जनांनी कमीत कमी एकमेकांशी मराठीत बोलावे.

आनंद घारे's picture

27 Feb 2010 - 10:10 pm | आनंद घारे

तरीही आम्हाला 'मराठी भाषा दिन' साजरा करावा लागतोय..तोही महाराष्ट्रात....हे आमचेच दूर्दैव...

हे फक्त मराठी लोकच करतात का? त्यातलेही बहुसंख्य लोक हा दिवस खरेच साजरा करतात असे दिसत नाही. इतर भाषिक लोक त्यांच्या भाषेचा दिवस साजरा करतात का आणि तो कसा साजरा करतात?

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

बेसनलाडू's picture

28 Feb 2010 - 10:21 am | बेसनलाडू

मराठी भाषेस अपेक्षित महत्त्व,स्थान न मिळणे आणि 'मराठी भाषा दिन' साजरा करणे, शुभेच्छा देणे या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यात दुर्दैवी काय ते कळले नाही. म्हणजे अपेक्षित महत्त्व व स्थान न मिळणे हे नक्कीच दुर्दैवी आहे, पण हा दिवस साजरा करणे व शुभेच्छांचे आदानप्रदान दुर्दैवी कसे? या न्यायाने महाराष्ट्र दिन साजरा करणेही दुर्दैवी ठरायचे नाही काय? एखादी भाषा, लोकसमूह, संस्कृती यांना अपेक्षित महत्त्व मिळण्यासाठी किंवा सध्याची दुरवस्था सुधारण्यासाठीचे पाऊल म्हणून असे दिन साजरे करणे/करावे लागणे हे दुर्दैव, असे म्हणायचे आहे काय? तसे असल्यास समजू शकतो. पणा तो मला काहीसा संकुचित विचार वाटतो. आपल्याच भाषेविषयीचा आदर, प्रेम आणि अभिमान यांचा सोहळा या दृष्टिकोनातून हा दिन साजरा करण्याकडे पहावे. असो. सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
महाराष्ट्रातच मराठीची अवस्था काय आहे, या बद्दलचे गळेकाढू साहित्य विविध माध्यमांतून समोर येतच असते. देशाच्या राजधानीत मराठीची काय अवस्था आहे, हे सांगणारे अनुभवकथन येथे वाचता येईल.
(मराठी)बेसनलाडू

टारझन's picture

28 Feb 2010 - 5:15 pm | टारझन

देवकाका आणि बेसनलाडु शी सहमत !

-(सहमत) वेसनघालु

अनामिका's picture

27 Feb 2010 - 2:05 pm | अनामिका

मराठी भाषा दिनाच्या मनःपुर्वक शुभेच्छा!

माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छद
मना नित्य मोहवित

ज्ञानोबांची तुकयाची
मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी गोडी
रामदास शिवाजीची

'या रे, या रे अवघे जण,
हाक मायमराठीची
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची

डफ तुणतुणे घेऊन
उभी शाहीर मंडळी
मुजर्याची मानकरी
वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ
अभगाच्या तालावर
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर

हिचे स्वरुप देखणे
हिची चाल तडफेची
हिच्या नेत्री प्रभा दाटे
सात्विकाची, कांचनाची

कृष्णा गोदा सिंधुजळ
हिची वाढवती कांती
आचार्यांचे आर्शिवाद
हिच्या मुखी वेद होती

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवे रुप दावी
अवनत होई माथा
मुखी उमटते ओवी

वि. म. कुलकर्णी

"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

२७ फेब्रुवारी- मराठी भाषा दिन

कवी कुसुमाग्रज उर्फ वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा दिवस.
कुसुमाग्रजांचे साहित्यातील योगदान व त्यांचे भाषा-प्रेम यांचा विचार करता जागतिक मराठी परिषदेच्या वतीने त्यांचा जन्मदिवस (२७ फेब्रुवरी) मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. मराठीविषयीचा अभिमान, भाषा-अभ्यास-संशोधन-संरक्षण व भाषाविकास या घटकांबद्दलची जाणीवजागृती हा यामागचा उद्देश.

कुसुमाग्रजांना मराठी साहित्यातील योगदानाबद्दल १९८८-८९ मध्ये भारतातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला. असा बहुमान मिळवणारे-वि.स.खांडेकर यांच्यानंतरचे -ते दुसरे मराठी साहित्यिक होत. कुसुमाग्रज मुंबई येथे आयोजित पहिल्या जागतिक मराठी परिषदेचे (१९८९) अध्यक्ष होते.

======================
कोकणी फणस

विकास's picture

27 Feb 2010 - 7:23 pm | विकास

आत्ताच वाचलेल्या म.टा.वृत्ताप्रमाणे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनी २४ तारखेस वारणा उद्योगसमुहासमोर १० मिनिटे मराठीत भाषण केले.

कुणाला प्रयत्न करायचे असतील आणि आदर दाखवायचाच असेल, तर कुठल्याही राज्यात असे स्थानिक भाषे संदर्भा आदर दाखवण्याची कृती गाजावाजा न करता होऊ शकते असे वाटते.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

अनामिका's picture

28 Feb 2010 - 11:45 pm | अनामिका

कुणाला प्रयत्न करायचे असतील आणि आदर दाखवायचाच असेल, तर कुठल्याही राज्यात असे स्थानिक भाषे संदर्भा आदर दाखवण्याची कृती गाजावाजा न करता होऊ शकते असे वाटते.

पुर्णपणे सहमत.......
आज प्रियांका चोप्राला एका हिंदी चित्रपटात अत्यंत शुद्ध मराठी संवाद बोलताना ऐकले.....प्रयत्न केला कि सगळ जमत पण उगीच का कू का करतात तेच कळत नाही..
विधायक व वैध मार्गाने कुणालाही न दुखावता आपल्या भाषेबद्दलचा सार्थ अभिमान जागृत करणे व तिचे महत्व इतरांना पटवून देणे सहज शक्य आहे हे मराठी अभिमानगीताच्या निमित्ताने कौशल इनामदार यांनी दाखवून दिले आहेच....

"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

विनोदबाण़खेले's picture

28 Feb 2010 - 8:49 pm | विनोदबाण़खेले

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी....

विनोद बाण़खेले,
९८५०२२९८२२