साहेब !

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
24 Feb 2010 - 6:19 pm

२०० _/\_

क्रीडाप्रकटन

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

24 Feb 2010 - 6:24 pm | Dhananjay Borgaonkar

सचिन सचिन =D> =D> =D>
सचिन सचिन =D> =D> =D>
सचिन सचिन =D> =D> =D>
सचिन सचिन =D> =D> =D>
सचिन सचिन =D> =D> =D>

हापिसातुन घरी गेलो की तेंडल्याच्या नावाने एक बिअर मारणार...

चिअर्स सचिन.....

विकास's picture

24 Feb 2010 - 6:26 pm | विकास

एकदिवसीय सामन्यात २०० धावा करणार्‍या सचिनचे अभिनंदन!

------------------------
वरील "जनातले-मनातले" लेखाचा उद्देश जरी समजला असला तरी इतके त्रोटक असू नये असे वाटते.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मेघवेडा's picture

26 Feb 2010 - 2:56 pm | मेघवेडा

>> वरील "जनातले-मनातले" लेखाचा उद्देश जरी समजला असला तरी इतके त्रोटक असू नये असे वाटते. >>

असेच म्हणतो.. जेपी, येऊ दे एक फर्मास लेख साहेबांवर! मी लिहायला घेतला होता पण तू माझ्यापेक्षा नक्कीच जास्त चांगला लिहितोस हे ठाऊक आहे मला! तुझ्या लेखाची वाट पाहतोय! आणि साहेबांवर लिहू तितकं कमीच रे! येऊ दे!

-- मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

अनामिका's picture

24 Feb 2010 - 6:35 pm | अनामिका

आज खर्‍या अर्थाने सच्च्याला क्रिकेटचा छत्रपती हि उपाधी द्यावीशी वाटतेय...
सच्च्याच्या आजच्या द्विशतकी खेळीने दिलेला आनंद अवर्णनिय आहेच.
"पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा"तेंडुलकरांच्या या सुपुत्राने आज हि उक्ती सार्थ केली. =D>
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

जे.पी.मॉर्गन's picture

24 Feb 2010 - 7:01 pm | जे.पी.मॉर्गन

कुठे काय म्हणायचं हो???? काय म्हणायचं राहिलं होतं ह्या माणसाबद्दल? देव देव म्हणतात तो हाच की ! !

सुमीत भातखंडे's picture

24 Feb 2010 - 7:54 pm | सुमीत भातखंडे

शब्दच नाही उरले

मेघवेडा's picture

25 Feb 2010 - 2:39 pm | मेघवेडा

सहमत... काल कोण का जाणे सुटी घ्यायची इच्छा झाली. दिवसरात्र सामना असल्याने इथं सकाळी ९ वा. सुरू झाला. अख्खी इनिंन्ग्स बघायला मिळाली. सुटी सत्कारणी लागली. दिवसाचं सोनं झालं. पण काय भयंकर प्रकार होता तो. टेस्ट मधील फास्टेस्ट २०० आहेत १५३ चेंडूत (नेथन अ‍ॅस्टल). साहेबांनी तोही विक्रम मोडला काल!! काल मला 'थरारक' या शब्दाचा अर्थ उमगला. अक्षरशः चिमटे काढून बघत होतो स्वतःला. रात्री झोपेपर्यंत विश्वासच बसत नव्हता. सगळं कसं अनाकलनीय! शब्दशः 'स्पीचलेस' झालो होतो काल. आणि काय बोलायचं राहिलंय?

कारकिर्दिच्या २१व्या वर्षी आणि वयाच्या ३७व्या वर्षी हा असला प्रकार?? काही वर्षांपूर्वी कोणी विचारही केला नसेल वैयक्तिक २०० धावांचा!! हे सगळं अमानवी आहे! काल फेसबुक वर एकाचा स्टेटस वाचला: "देवाला क्रिकेट खेळण्याची इच्छा झाली म्हणून त्यानं सचिनला बनवलं!" किती सूचक!!

साष्टांग दंडवत रे बाबा!

-- मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

निशा कुलकर्णी's picture

24 Feb 2010 - 9:48 pm | निशा कुलकर्णी

अप्पा जोगळेकर's picture

24 Feb 2010 - 9:52 pm | अप्पा जोगळेकर

:H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H :H

भिडू's picture

24 Feb 2010 - 9:57 pm | भिडू

एवढे मोठी माणसे साहेबां बद्दल बोलत आहेत ... आम्ही पामर काय बोलणार
http://static.cricinfo.com/db/NATIONAL/IND/MICRO-SITES/SACHINZONE/best-q...

समंजस's picture

25 Feb 2010 - 12:26 pm | समंजस

अभिनंदन सचिनचे !!!
=D>

विशाल कुलकर्णी's picture

25 Feb 2010 - 12:47 pm | विशाल कुलकर्णी

विक्रमादित्याला साष्टांग नमस्कार..
आमच्या भावना इथे व्यक्त केलेल्या आहेत.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

ब्रिटिश टिंग्या's picture

25 Feb 2010 - 1:41 pm | ब्रिटिश टिंग्या

साहेबांना मानाचा मुजरा!

दिपक's picture

25 Feb 2010 - 1:43 pm | दिपक

बाप ऑफ क्रिकेट...!
__/\__

जे.पी.मॉर्गन's picture

25 Feb 2010 - 3:15 pm | जे.पी.मॉर्गन

अन येवढं करून सायबाची प्रतिक्रिया बघितलीत??? नेहेमीचं निवांत बॅट आणि हेल्मेट वर करून हसणे आणि आकाशात बघून वडीलांना (वडीलांनाच - देव तर खाली क्रिकेट खेळत होता) डोळ्यांनीच नमस्कार करणं....परत आपलं "बॉल वॉज" कमिंग ऑन टू द बॅट" आहेच. परत आपलं कार्तिक, युसुफ आणि धोनी कसे भारी खेळले आहेच....ह्या माणसाला कधीतरी "मी बाप आहे" म्हणताना ऐकलंय? इतकी वर्षं झाली पण ह्याची उत्तरं बदलली नाहीत.

पब्लिकनी रस्त्याला नावं देऊन झाली... स्टँड्स पॅव्हिलियन्स झाली... तरी हा माणूस अजून "तेंडल्या" आहे ! पाय जमीनीवर घट्ट रोवलेले आहेत.... आणि नेहेमीप्रमाणेच एक फीलिंग आहे की "अजून एक वादळ येऊ घातलंय" ! आम्ही बघतोय साहेब.... तुमचं चालू द्या ! ! !

चतुरंग's picture

25 Feb 2010 - 3:30 pm | चतुरंग

तो म्हणतोच ना "आचरेकर सर एकदाही मॅचनंतर छान खेळलास असं म्हणत नाहीत! मी आउट झालेलो असलो तर फक्त विचारतात आउट कसा झालास?" काय गुरु आहे आणि काय शिष्य!!
एवढी एकनिष्ठता, एवढं खेळावरचं प्रेम, एवढं एकाग्र असणं त्यामुळेच तो महान आहे. आणि तो महान आहे म्हणूनच त्याच्या प्रतिक्रिया आपसूक साध्या असतात कारण तो महान आहे हे त्याला सिद्ध करायचं नसतं, ते बाकीच्यांसाठी असतं!

चतुरंग

मेघवेडा's picture

25 Feb 2010 - 4:02 pm | मेघवेडा

बॅकफूट क्रिझ मधे फर्म असला पाहिजे ही आचरेकर सरांची पहिली शिकवण आणि दोन्ही फीट जमिनीवर फर्म असले पाहिजेत ही रमेश तेंडुलकरांची पहिली शिकवण! दोन्ही गोष्टी रक्तात भिनल्यायत त्याच्या! फुकट बडबड नाही की वादावादी नाही. कुणा बॉलरशी शाब्दिक चकमकी नाहीत की खुन्नस नाही. कोणीही कितीही बोलोत, याची फक्त बॅटच बोलते! आणि अशी बोलते की समोरचा गप्गार! या विनम्र स्वभावामुळेच तर तो अनिल-मुकेशलाही आपलासा वाटतो आणि धारावीतल्या कुणा अस्लम-गफ्फूरलाही! प्रत्येकजण त्याच्यात स्वतःचं यशस्वी रूप पाहत असतो. आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आपण करू शकत नाही आहोत त्या गोष्टी 'आपल्या' सचिननं कराव्यात ही एका सामान्य माणसाची अपेक्षा असते आणि त्या गोष्टी तो करील हा विश्वासही!! म्हणून एका सामान्य माणसाला तो 'आपला सचिन' वाटतो!

सचिनच्या युगात आपल्याला जन्म लाभला आणि तो त्याच्या कारकिर्दिच्या सर्वोच्च टप्प्यांवर असताना आपल्याला क्रिकेट कळत होतं/ आहे हे आपलं भाग्यच म्हणायचं!!

(काय बोलणार, बोलायला काय उरलंय, शब्दच संपले असं कितीही म्हटलं तरीही हे चालूच राहणार!)

-- मेघवेडा.

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

अनामिका's picture

25 Feb 2010 - 4:27 pm | अनामिका

सचिनच्या युगात आपल्याला जन्म लाभला आणि तो त्याच्या कारकिर्दिच्या सर्वोच्च टप्प्यांवर असताना आपल्याला क्रिकेट कळत होतं/ आहे हे आपलं भाग्यच म्हणायचं!!
अगदी अगदी .!!सच्च्याच कौतुक करताना शब्द अपुरे पडतायत.....
काल पासुन त्याच्या त्या ऐतिहासिक खेळीची वृत्तवाहिन्यांच्या कृपेने पारायण करुन झाली तरी.....आज सकाळी देखिल तेच परत परत बघण्याचा मोह आवरत नव्हता......
खर तर स्वतःच कर्तृत्व काहीच नाही पण तरिही अचाट सच्च्याच्या पिढीची असल्याचा अभिमान का कुणास ठाउक पण आनंद देऊन गेलाय ज्याला शब्दात व्यक्त करण अवघड आहे......
त्याने शेवटची २०० वी धाव घेतली आणि डोळ्यातल्या पाण्याला आवर घालणे कठीण झाले.
डोळ्याच पारण फिटणे म्हणजे काय ?ते व्यक्तीशः काल सच्च्याची अद्वितीय खेळी बघुन उमजले........
सच्च्या असाच खेळता रहावा......इतकच मनात आहे...
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

जे.पी.मॉर्गन's picture

26 Feb 2010 - 3:20 pm | जे.पी.मॉर्गन

अनामिका अन मेघवेडा - दोघांशीही १७३% सहमत ! ह्या माणसानी जितकं काही दिलंय... जाऊदे... कुठे शब्द शोधत बसू?

अनामिका's picture

25 Feb 2010 - 4:31 pm | अनामिका

प्र क टा आ
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

अस्मी's picture

26 Feb 2010 - 12:03 pm | अस्मी

God wants to create a perfect person in the form of Sachin, but he created another god...

- मधुमती

आशिष सुर्वे's picture

26 Feb 2010 - 1:33 pm | आशिष सुर्वे

एवढेच म्हणेन..

Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..