user

कविते, हे तर तुझेच देणे..!

रात्र काळी, चंद्र भाळी
तरूण चांदणी नवी नव्हाळी
नशा आगळी, सूर पाघळी
सळसळणार्‍या रानोमाळी

पिसे जीवाला, वेड मनाला
झुळझुळ वारा, गंध ओला
कोण काजवा, उगा हासला
तीट लावतो अंधाराला

नक्षत्रांच्या सहस्र माळा
धरेच्या गळा, साज आगळा
पहाट वेळा, धुक्याची कळा
रंग केशरी, या आभाळा

गारठलेली, धरा ल्यायली
शुभ्र धुक्याच्या, गर्द शाली
सूर्यकणांची मैफ़ल सजली
क्षितिजावरच्या, भव्य महाली

पहाट लेणे, रूप देखणे,
किलबिल गाणे, नवे उखाणे
शब्द रंगणे, मनी गुंफ़णे
कविते, हे तर तुझेच देणे..!

- प्राजु

सुंदर

सुंदर कवीता प्राजुजी....
मी आपल्या कवितांची कायम वाट पाहत असतो....

+ १ सहमत आहे!

मी सुद्धा वाट पाहत असतो! Wink

चतुरंग

चतुरंग

सुंदर

सुंदर कविता..क्या बात है..झकास

कविता तशी

कविता तशी चांगली आहे.

पहाट लेणे, रूप देखणे,
किलबिल गाणे, नवे उखाणे

आमची सकाळ पोटापाण्याच्या चिंतेने अत्यंत काळजीने उगवते. साला वास्तव फार भयानक असतं हेच खरं!

असो..

तात्या.

--Life is a questions nobody can answer It… and the Death is an answer, nobody can question it..!

वा वा

वा वा नादमय कविता... आवडेश!

-अनामिक

+१

+१
रंगी रंगणे, स्वप्न गुंफ़णे
ईश्वरा, हे तर तुझेच देणे..!
असं वाचावस वाटलं.

मीनल.

+१

+१ . पण शेवटी..
रंगी रंगणे, स्वप्न गुंफ़णे
ईश्वरा, हे तर तुझेच देणे..!
असं वाचावस वाटलं.

मीनल.

कविता

कविता आवडली.

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते

छान ..नादमय

छान ..नादमय कविता.

जय महाराष्ट्र , जय मराठी !

जय महाराष्ट्र , जय मराठी !

प्राजु तै

लय भारी !
म्हणजेच नेहेमीप्रमाणेच !

तुम्हा लोकांना कविता सुचतात कशा?

प्राजू,
आधी विडंबन वाचल्यावर ’वरिजिनल’ कविता वाचली.
रंगासेठ यांची माफी मागून लिहितो कीं वरिजिनल "तुफ्फान" आहे.
तुम्हा लोकांना कविता सुचतातच कशा?
(तसेच संगीत दिग्दर्शकांना चाली कशा सुचतात?)
दोन्ही फार कठीण आहे!!
------------------------
सुधीर काळे
बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया!

------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll

सर्वांचे

सर्वांचे मनापासून आभार. Smile
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

आवडली.

प्राजु,
कविता आवडली. विडंबन पहिले वाचले आणि तिथुन इथे आले. पण कविता खरंच आवडली.

Scroll to Top