user

शाहरुख खान आणि पाकिस्तान

आपले सर्वाचे (पक्षि: मिडिआ, करण जोहर, आणि भोळेभाबडे चाहते (पक्षि: मला काय त्याचे टाईप जनता)) लाडके, आदरणिय, प्रातः स्मरणिय, अभिनय सम्राट श्री. शाहरुख खान यांच्या मते पाकिस्तान हा उत्तम शेजारि आहे, आणि पाकिस्तानी खेळाडुंचे भारतात स्वागत आहे.
शाहरुख वरिल वक्तव्याचे अभिव्यक्ति स्वातन्त्र्य म्हणून समर्थन करीत आहे.
वरवर किंवा खोलखोल कसेहि पाहा माझ्या मते वरिल वाक्य हा समस्त देशाचा आणि मुख्यतः अतिरेकि हल्ल्यात बळि पडलेल्यांच्या कुटुंबियांचा अपमान आहे. शाहरुख हा छुपा/खुला पाक समर्‍थक आहे असे वाटल्यास चुक काय? शाहरुख मुसलमानी रिवाजाना ग्लोरिफाय करतो ( जसे कि hi hello सरखे casual greeting सोडुन अस्थानी आदाब, प्रत्येक वाक्या नन्तर इन्शाल्ला ( पाकि क्रिकेटपटुन प्रमाणे )etc आणि तसे करायचा त्याचा हक्क सगळ्याना मान्य आहे) but this time Shahrukh has gone too far with this statement, he should not get away with it. त्याच्या ट्विटर अकाउंट प्रमाणे त्याचा विरोध म्हणजे त्याच्या जमातीचा विरोध..ह्या सारखि विधाने तो बाळ्बोध पणे करत असेल असे वाटत नाहि...

शाहरुखसाहेबांनी नेमके काय म्हटले?

शाहरुखसाहेबांनी नेमके काय म्हटले? त्याची लिंक द्याल काय?
------------------------
सुधीर काळे
बाद मुद्दत उन्हें देखकर यूँ लगा, जैसे बेकार दिलको करार आ गया!

------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: प्रकरण तेरावे! (आधीच्या सर्व प्रकरणांचे दुवेही तिथे उपलब्ध आहेत)
http://tinyurl.com/2adeyll

शाहरुख हा

शाहरुख हा छुपा/खुला पाक समर्थक आहे

सहमत आहे!

http://www.youtube.com/watch?

अहो हल्ली

अहो हल्ली गाण्यात सुध्धा हाय राम ,भगवान नाहि..अल्ला मौला,रब्बा..बंदा..हिंदु नायीका पण तोटक्या कपड्यात हाय अल्ला करत नाचत [?] असतात..

भारत = पंजाब?

एवढेच नाही तर बहुतेक गाणी आणि चित्रपट पंजाबच्या पार्श्वभूमीचे असतात. जणू पंजाब म्हणजेच भारत आहे की काय असे वाटावे. किंवा भारतात सर्वत्र पंजाबी संस्कृती आहे.

नितिन थत्ते

नितिन थत्ते
(माझा हा प्रतिसाद संकेतस्थळचालकांना अडचणीत तर आणणार नाही ना?)

आक्षेपार्ह

शहारुख जे बोलला त्यात आक्षेपार्ह काहीच वाटले नाही.

यांच्या मते पाकिस्तान हा उत्तम शेजारि आहे, आणि पाकिस्तानी खेळाडुंचे भारतात स्वागत आहे

"There are issues between India and Pakistan" हे ही तो म्हणाला. शिवाय पाकिस्तानला २०-२० मध्ये सहभागी करायचे की नाही ह्याचा निर्णय भारतातर्फे कोणत्या ढुढढाचार्यानी घेतला हे बघितले पाहिजे. एकदा सहभागी करुन घेतले की मग दोष देण्यात काय अर्थ आहे?

भेंडी
P = NP

बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,सॅन्टा क्लारा,सनिव्हेल ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालापाहिजे.

शहारुख

शहारुख पाकी प्रेमी आहे की नाही माहित नाही पण धुर्त बिझनेसमॅन आहे हे नक्की.
भारतात नसताना त्याने पाकी खेळांडुंवर भाष्यकरुन वादाला तोंड फोडल.
(तो म्हणाला की जर आय पी एल ने संघातल्या परदेशी खेळाडुंच्या संख्येवरचे निर्बंध उठवले तर त्याके पाकी खेळाडुंना त्याच्या संघात स्थान दिल असत. )
जर त्याला खरच त्या पाकी खेळाडुंचा इतका पुळका होता तर त्याने लिलाव चालला असतानाच का बर पाकी खेळाडुंची निवड केली नाही?
तेव्हा त्याने सोईस्कर रितीने इतर विदेशी खेळाडुंची खरेदी केली.

तर या सगळ्यातुन त्याला त्याच्या येउ घातलेल्या चित्रपटाची सवंग प्रसिद्धी करयाची होती हे बालवाडीतल पोर पण सांगेल.
युएस युके मधुन त्याने सेने विरुद्ध विधान करुन वातावरण तापत ठेवल, पण काल-परवा मुंबईत उतरताच सपशेल कोलांटी उडी मारुन आपण माकडांचे वंशज असल्याची खात्री दिली.
(आता कुणी कुणाला माकड बनवले तुम्हीच ओळखा Wink)

-माझी खादाडी.

उलट बाजू सावरून धरली

माझ्या मते आय पी एल मध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंची निवड नहोण्यात भारत सरकारचा हात होता असा कांगावा पाकिस्तान करीत होते.

शाहरूखने उलट पाकिस्तानच्या खेळाडूंना गुणवत्तेमुळेच निवडता आले नाही असे स्पष्ट केले. (आणखी जागा असत्या तर घेतले असते म्हणजेच जेवढ्या जागा होत्या त्यात निवड होण्याची त्यांची लायकी नव्हती असाच त्याच्या वक्तव्याचा अर्थ होतो).
उलट त्याने भारत सरकारची बाजू उचलूनच धरली आहे. त्याने माफी मागण्यासारखे काहीही नाही.

नितिन थत्ते

नितिन थत्ते
(माझा हा प्रतिसाद संकेतस्थळचालकांना अडचणीत तर आणणार नाही ना?)

आणखी जागा

आणखी जागा असत्या तर घेतले असते म्हणजेच जेवढ्या जागा होत्या त्यात निवड होण्याची त्यांची लायकी नव्हती असाच त्याच्या वक्तव्याचा अर्थ होतो

पटत नाही. असं त्यानं स्पष्ट सांगितलेलं नाही. उलट निराशावादी सूरात म्हणाला तो असं. थोडक्यात काय .. "आपणांस पाकिस्तानी खेळाडूंना घ्यायची इच्छा होती परंतु आपण ते करू शकत नाही" (हे त्याचं विधान नाही) असं त्यानं अत्यंत धूर्तपणे स्पष्ट केलंय. म्हणजे आपण यात नाहीच! झाले की शाहरूखभाई मोठे! आणि येऊ घातलेल्या शीणेमाची फुकट प्रसिद्धी!! गणपाने नमूद केल्याप्रमाणे तो नक्कीच एक धूर्त बिझनेसमन आहे. आपल्या फायद्यासाठी कधी काय बोलावं याची त्याला व्यवस्थित जाण आहे. त्यामुळे त्याने भारत सरकारची बाजू उचलूनच धरली आहे हे आपलं विधानही पटत नाही. त्याने आपली बाजू सावरली इतकंच.

आता त्यानं माफी मागावी की मागू नये या राजकारणात आपल्याला रस नाही ब्वॉ!

(अवांतरः लायकीचं म्हणाल तर सध्या T20 साठी सर्वोत्तम अष्टपैलू निर्विवादपणे शाहीद आफ्रिदीच आहे! आणि बर्‍याच आयपीएल संघांची पहिली च्वाईससुद्धा. अर्थात खेळाडूंच्या निवडीवर पडलेल्या निर्बंधांपूर्वी! आता हे निर्बंध कुणी लादले, का लादले यावर आम्ही वक्तव्य न केलेले बरे, नाही का?)

-- माय नेम इज ओगले!

(प्रदर्शित होईल तेव्हा होईल, प्रसिद्धीकरता कुणास टार्गेट करू याचा विचार करतोय!)

अवांतरः

अवांतरः लायकीचं म्हणाल तर सध्या T20 साठी सर्वोत्तम अष्टपैलू निर्विवादपणे शाहीद आफ्रिदीच आहे!

हॅ हॅ हॅ ... बॉल खाऊन भलताच तगडा झाला असेल नै तो? Wink

शाहरूख मुळात काय म्हणाला हे पाहिलं/ऐकलं नसल्यामुळे त्यावर बोलू इच्छित नाही.

अदिती

अदिती

हो आणि

हो आणि त्या सामन्यात कप्तानपद मिळाल्याने माजलाही होता!! वर काय तर म्हणे माझा संघ जिंकावा म्हणून मी असं केलं!!!

असो तो वेगळा मुद्दाय!

--
माफ करा.. अर्थातच, ही प्रतिक्रिया अदितीतैंच्या प्रतिक्रियेस उत्तर आहे.

आ.पी.एल

आ.पी.एल फालतु आहे आणी त्याचा १००० पट फालतु तो शाहरूख आहे. छुपा कसला साला खुला पाक समर्थक आहे.

मला २ महिन्यानंतरही खव आणी खफ मध्ये लिहायची सोय उपलब्ध नाही. मी काय करावे?

प्रश्न

मला पडलेले प्रश्न व संभाव्य उत्तरे:
१.शहारुखला पाकिस्तानी खेळाडुंचा पुळका का ?
त्याला आपले सिनेमे पाकिस्तानमधेही चालावे असे वाटत असावे.
२.एकाच दिवशी शहारुख व शिवसेना का थंडावले ?
आर्थिक व्यवहार पूर्ण झाले असावेत.
३.शरदराव भेटताच ऑस्ट्रेलियन खेळाडुंबद्दल पुनर्विचार करण्याची भाषा का सुरु झाली ?
उ त्तर दोन नंबरच्या प्रश्नाप्रमाणेच!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

Scroll to Top