मुंबई अन महाराष्ट्र द्वेशी चा फोटो अन धागा उडवला जावा. (सुनील भौ समजून घेतील ही अपेक्षा.) कमीतकमी राजकारण बाजुला ठेवून धाग्यात त्याचा निषेध करावा ही विनंती.
माझ्यातर्फे राहुल्याचा त्रीव्र निषेध.
मी मुंबईचा- मुंबई माझी
मी मराठी !
जय मराठी !!
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)
प्रसिद्धी माध्यमांनी उचलुन धरल्यामुळे याला एवढे महत्व.
अनुनय,अनुयय,निष्ठा,लाचारी,लाळघोटेपणा,चाटुगिरी,झेलेगिरी,अंधानुकरण हे सगळे शब्दोच्छल आहेत. बॉस ने केलेल्या पीजे ला हॅहॅहॅ करुन हसणे याला काय म्हणणार? परिस्थितीच्या रेट्यामुळे अस्तित्वाच्या लढाईसाठी केलेल्या असहाय्य कृतीला काय म्हणणार?
भारतीय परंपरेत रामाचे जोडे सांभाळणार्या भरताला काय म्हणणार?
जोडे हा वस्तुला असलेली अप्रतिष्ठा, जणुकाही नाईलाजास्तव घालावा लागणारा एक हीन लटांबर. जोड्याने मारायची पण लायकी नाही; जोडे पुसायला ठेवा; यातुन जोड्याला हीन लेखण्याची मानसिकता दिसते. काठीने झोडपणे हे तुलनात्मक दृष्ट्या प्रतिष्ठेचे दिसते. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना त्यावेळी कारसेवे सारखी सुवर्ण मंदिरात जोडे सांभाळण्याची शिक्षा वजा धर्मादेश शीख धर्मपंडीतांनी दिला होता असे काहीसे आठवते, तपशीलात थोडाफार बदल असु शकतो.
इथे राजीव गांधींना आपले जोडे कुणी सांभाळणे अपेक्षित नाही आणी बागवेंनाही आपण हे केले नाही तर आपले गृहराज्यमंत्रीपद जाईल असेही अपेक्षित नाही.
मर्जी सांभाळण्यासाठी कराव्या लागणार्या अनेक कृतींपैकी ती एक कृती असेल. विद्वान लोक कदाचित सिद्धांत/बोधकथा/दृष्टांत वगैरेंचा देउन आणीबाणीच समर्थन अनुशासन पर्व म्हणुन करत असतात. पुर्वी राजाच्या काळात भाट लोक काय करीत असत? मांडलीक राजे आपल्या मांडलिकत्व टिकण्यासाठी काय करीत असत? समुहात जगण्यासाठी आपण आपल्याला अनेक न आवडणार्या गोष्टी सुद्ध करत असतो. जोपर्यंत त्याचा आपल्याला त्रास होत नाही तोपर्यंत करत राहतो. जेव्हा त्रास व्हायला लागतो त्यावेळी आपण उपयुक्त व उपद्रवमुल्यांचा तौलानिक अभ्यास करुन निर्णय घेतो. आपले उपयुक्तता मुल्य हे कायम नजरेस राहव म्हणुन अनेक क्लुप्त्या लोक लढवत असतातच की.
प्रवासाहुन आलेल्या पाहुण्याची सुटकेस बॅग सहजपणे/प्रेमाने आपण हातात घेतो ती काय त्याला उरलेली चार पावल जड झाली असतात म्हणुन काय?
संडास साफ करणे याला समाजात असलेली अप्रतिष्ठा / गौणत्व हे म. गांधी गाडगेबाबा सारख्या लोकांनी कमी करण्याचा प्रयत्न करुन प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न केला म्हणुन स्वच्छता अभियान राबु शकते.
बागवेंना या मुद्द्यावरुन झोडपण्यापेक्षा गृहराज्यमंत्रीपद सांभाळण्यात आपण कसे नालायक आहात हे सप्रमाण दाखवुन झोडपले तर ते अधिक योग्य ठरेल असे वाटते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
मर्जी सांभाळण्यासाठी कराव्या लागणार्या अनेक कृतींपैकी ती एक कृती असेल
अहो मर्जी संभाळण्यासाठी चपला सांभाळायची काय गरज आहे? तुमचे मुद्दे पटले नाहीत. राम(खरा वा कथेतुन तयार केलेला) आणि राहुल गांधी यांची तुलना बरोबर वाटत नाही. त्याच प्रमाणे गाडगेबाबा इ. चे कार्य आणि हे चपला सांभाळण्याचे प्रकरण यांची तुलना चुक आहे.
Nile शी पूर्ण सहमत. घाटपांडे साहेब, तुमचे मुद्दे पटले नाहीत.
आणि बागवेंनी आपल्या कृतीच्या समर्थनाकरीता जे म्हटले ते तर आणखीनच पटण्यासारखे नाही. (स्त्रोतः वरील एका प्रतिसादातील लोकसत्तेचा दुवा)
ते म्हणतात,
"स्व. राजीव गांधी यांची हत्या कशा प्रकारे झाली हे सर्वज्ञात आहे. राहुल यांच्या जोडय़ामध्ये बॉम्ब ठेवण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून आपण त्यांचे जोडे उचलून नैतिक कर्तव्यच पार पाडले."
म्हणजे त्यांच्या आसपास येणार्या लोकांची जी काही तपासणी करतात ती पूरेपूर नसते का? एवढे जे सुरक्षा रक्षक, अंगरक्षक कामाला ठेवलेत ते काम न करता काय गर्दी जमवायला आणले होते?
एक प्रश्नः गृहराज्यमंत्री हे पद नेमके काय असते? त्यात आणि गृहमंत्री ह्यात काय फरक आहे?
महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर मंत्रीमहोदयांच्या यादीत बागवे ह्यांचे नाव आणि ते पद दोन्ही दिसले नाही.
तुमचा प्रतिसाद पटलाच नाही. बदनाम आंतरजालिय शब्द वापरायचा तर बादरायण संबंध म्हणता येईल. ;)
तुम्ही दिलेल्या बर्याच उदाहरणांचा आणि बागवे नामक इसमाने केलेल्या कृतीचा संबंध लावणे जरा हे च वाटते.
प्रसिद्धी माध्यमांनी उचलुन धरल्यामुळे याला एवढे महत्व.
प्रसिद्धीमाध्यमांनी उचलून धरले नसते आणि माझ्या माहितीत आले असते तरीही मला तितकीच घृणा वाटली असती जेवढी आत्ता वाटते आहे.
अनुनय,अनुयय,निष्ठा,लाचारी,लाळघोटेपणा,चाटुगिरी,झेलेगिरी,अंधानुकरण हे सगळे शब्दोच्छल आहेत. बॉस ने केलेल्या पीजे ला हॅहॅहॅ करुन हसणे याला काय म्हणणार? परिस्थितीच्या रेट्यामुळे अस्तित्वाच्या लढाईसाठी केलेल्या असहाय्य कृतीला काय म्हणणार?
हेतू काही का असेना, दोष तितकाच. दोष कमी होत नाही. अर्थात, थोड्या फार फरकाने वर दिलेली उदाहरणे आपण सगळेच करत असतो. मान्य. पण हा बागवे इसम जेव्हा महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात बसतो तेव्हा कुठेतरी तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. तो एक गैरशासकिय पदाधिकारी असता तर मला घृणा नसती. वाईट वाटले असते कदाचित.
भारतीय परंपरेत रामाचे जोडे सांभाळणार्या भरताला काय म्हणणार?
तुमच्यासारख्याने असं म्हणावं? कठिण आहे. भरताने पादुका सांभाळल्या / उचलल्या / मस्तकी धारण केल्या पण का? त्याला राज्य हवे होते? त्याला इतर काही भौतिक लाभ हवा होता? तसे तर काहीच नव्हते. त्याच्या उलटच होते खरे तर. त्याने श्रीरामचंद्रांची खूण म्हणून त्या पादुका सिंहासनावर स्थापन केल्या आणि त्यांच्या नावाने राज्य केले. मग हे उदाहरण कसे लागू होते बागवे नामक इसमाने केलेल्या कृतीला?
जोडे हा वस्तुला असलेली अप्रतिष्ठा, जणुकाही नाईलाजास्तव घालावा लागणारा एक हीन लटांबर. जोड्याने मारायची पण लायकी नाही; जोडे पुसायला ठेवा; यातुन जोड्याला हीन लेखण्याची मानसिकता दिसते. काठीने झोडपणे हे तुलनात्मक दृष्ट्या प्रतिष्ठेचे दिसते.
ठीक.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना त्यावेळी कारसेवे सारखी सुवर्ण मंदिरात जोडे सांभाळण्याची शिक्षा वजा धर्मादेश शीख धर्मपंडीतांनी दिला होता असे काहीसे आठवते, तपशीलात थोडाफार बदल असु शकतो.
बरोबर, पण त्यात जोड्यांच्या हीनतेबद्दल काही संबंध आहे असे वाटत नाही. शीख लोकांच्या गुरूद्वारामधे वेगवेगळी कामे असतात आणि सगळेच शीख जमेल तसे त्यात सहभागी होतात. इतर अनेक शिक्षांपैकी ही एक शिक्षा. पण तुमच्या म्हणण्यात तथ्य असू शकते.
इथे राजीव गांधींना आपले जोडे कुणी सांभाळणे अपेक्षित नाही
बहुधा असेच असावे, असेलच. पण खात्री देता येत नाही. इथे राहुल गांधींचे नाव आहे म्हणून असे म्हणतो आहे असे नाही. इथे अगदी राज ठाकरे नाव असते तरी खात्री नाही देता येणार. ते म्हणतात ना... यु नेव्हर नो.
आणी बागवेंनाही आपण हे केले नाही तर आपले गृहराज्यमंत्रीपद जाईल असेही अपेक्षित नाही.
बहुधा असेच असावे, असेलच.
मर्जी सांभाळण्यासाठी कराव्या लागणार्या अनेक कृतींपैकी ती एक कृती असेल.
नक्कीच. पण त्यामुळे त्याची निषेधार्हता कमी होते का?
विद्वान लोक कदाचित सिद्धांत/बोधकथा/दृष्टांत वगैरेंचा देउन आणीबाणीच समर्थन अनुशासन पर्व म्हणुन करत असतात. पुर्वी राजाच्या काळात भाट लोक काय करीत असत? मांडलीक राजे आपल्या मांडलिकत्व टिकण्यासाठी काय करीत असत? समुहात जगण्यासाठी आपण आपल्याला अनेक न आवडणार्या गोष्टी सुद्ध करत असतो. जोपर्यंत त्याचा आपल्याला त्रास होत नाही तोपर्यंत करत राहतो. जेव्हा त्रास व्हायला लागतो त्यावेळी आपण उपयुक्त व उपद्रवमुल्यांचा तौलानिक अभ्यास करुन निर्णय घेतो. आपले उपयुक्तता मुल्य हे कायम नजरेस राहव म्हणुन अनेक क्लुप्त्या लोक लढवत असतातच की.
पटण्यासारखे.
प्रवासाहुन आलेल्या पाहुण्याची सुटकेस बॅग सहजपणे/प्रेमाने आपण हातात घेतो ती काय त्याला उरलेली चार पावल जड झाली असतात म्हणुन काय?
कधी कधी असे असते पण बरेच वेळा आपुलकीने आपण ते करतो. इन एनी केस, लांगुलचालनासाठी हे नक्कीच केले जात नाही बहुतांशवेळा.
संडास साफ करणे याला समाजात असलेली अप्रतिष्ठा / गौणत्व हे म. गांधी गाडगेबाबा सारख्या लोकांनी कमी करण्याचा प्रयत्न करुन प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न केला म्हणुन स्वच्छता अभियान राबु शकते.
खरे आहे. पण त्या दोन नावांबरोबर अजून एक नाव घ्यायचे राहिले. ;)
बागवेंना या मुद्द्यावरुन झोडपण्यापेक्षा गृहराज्यमंत्रीपद सांभाळण्यात आपण कसे नालायक आहात हे सप्रमाण दाखवुन झोडपले तर ते अधिक योग्य ठरेल असे वाटते.
बागवे नामक इसमाला या दोन्ही मुद्द्यांवरून झोडपावे असे आमचे मत आहे. कारण परत तेच... कुठे तरी तो भूषवित असलेले पद हे महाराष्ट्राचे प्रतिकात्मक आहे. तेव्हा जे झाले ते अतिशय निंदनिय आणि लांच्छनास्पद झाले असे मला वाटते. या उलट खरोखरच काही कारण असते... उदाहरणार्थ राहुल गांधीच्या चपलांवर समजा एखाद्या कुत्र्याने पाय वर केला असता वगैरे... तर त्या चपला उचलून बाजूला ठेवल्या असत्या तरी समजू शकतो. पण काही कारण नसताना, चपला उचलून, त्या शेवट पर्यंत हातात धरून उभे राहणे आणि नंतर निर्लज्जपणे त्याचे अतिशय हास्यास्पद समर्थन करणे या मुळे मला तरी नक्कीच घृणा आलेली आहे. पुणेकर रमेश बागवे पेक्षा पुणेकर रमेश वांजळे परवडतो असेच वाटते उद्वेगाने. (अर्थात रमेश वांजळे उद्या असे वागणारच नाहीत याची ग्यारंटी नाहीच. ;) )
या बाबतीत श्रीमती इंदिरा गांधींचा एक ऐकिव किस्सा आठवतो. खरा आहे की खोटा माहित नाही... खरा असावा अशी अपेक्षा करतो. त्या पंतप्रधान असताना सौदी अरेबियाला गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी तिथल्या रिवाजाप्रमाणे काळा गाऊन अंगात घालावा असे अपेक्षित आहे असे त्यांना कळवले गेले. तेव्हा मी भारताची पंतप्रधान आहे... असले काही करणार नाही असे सांगून त्या साधा डोक्यावरही पदर न घेता वावरल्या. मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी... आपण टाळ्या वाजवायच्या फक्त.
<<इथे राजीव गांधींना आपले जोडे कुणी सांभाळणे अपेक्षित नाही >>
इथे टंकनभरात राजीव गांधी झालेले आहे ते राहुल गांधी असे वाचावे.नकळत झालेल्या त्रुटी बाबत हा खुलासा.
निस्वार्थी पणे असेल तर ती निष्ठा आणि स्वार्थापोटी असेल तर ते लांगुल चालन अशी सर्वसाधारण विभागणी असते. निष्ठा पुढे परंपरा- धर्मश्रद्धा-श्रद्धा- अंधश्रद्धा या विश्लेषणकल्लोळात नेता येते.भरताचे उदाहरण हे केवळ जोडे सांभाळणे या साम्यामुळे आहे.
बागवेंनी सुरक्षिततेचे दिलेले कारण हे शंकास्पद वाटते. बाकी सन्मान आदरातिथ्य वगैरे याला त्यांची भुमिका म्हणता येईल. ती पटणे न पटणे हा भाग वेगळा. नेत्यांचा अनुनय ही गोष्ट भारतीय राजकारणात नवी नाही. विकास यांनी इतिहासातील काही उदाहरणे दिली आहेच.
बागव्यांनी जोडे उचलणे अपेक्षित नाही. बागव्यांनी जोडे उचलण्याची गरज नाही. ते राजकीय शिष्टाचारात बसत नाही. वगैरे विधाने करता येतील.
बाबा बुवांच्या भक्तांचे श्रद्धेचे लांगुल चालन पाहिले तर तेही काहि वेगळे नाही. बाबांनी पाया पडताना फटका मारला कि तो भाग्यवान. अस्लमबाबा तर खुर्ची फेकुन मारायचा. श्रद्धेतुनच गजाननमहाराजांचे प्रकट दिन साजरे होतात. आत्मिक समाधानाच्या स्वार्थात देखील अनेक हिशोब गुंतलेले असतात. बागवेंचे लांगुल चालन हा त्यांच्या लेखी राहुल गांधींवरील व्यक्तिनिष्ठेचा वा काँग्रसवरील निष्ठेचा भाग आहे. घराणेशाही ही अशा अनुनयातुनच टिकते. हेच राहुल गांधी जर गांधी घराण्यातील युवराज नसते तर तर त्यांचे जोडे बागवेंनी उचलले असते काय?
समुह मानसिकतेत वेगळा विचार मांडलेला पचनी पडत नाही. अंशत: असहमती म्हणजे विरोध ही मांडणी / मानसिकता देखील जुनी आहे. शिवसेनेला विरोध म्हणजे मराठी ला विरोध मराठीचा द्रोही. काँग्रेसला विरोध म्हणजे धर्मनिरपेक्षतेला विरोध अशी समीकरण रुजु होतात. एकदा थोर पुरुषांना देव्हार्यात ठेवले की त्यांचे मानवी विश्लेषण करायचे नाही. करणारा राष्ट्र द्रोही ,धर्म द्रोही, समाज द्रोही.तीच गोष्ट विचारांची. वेदोक्त, पुराणोक्त, अपौरुषेय वगैरे परंपरात 'बाबा वाक्यं प्रमाणं' अशी मानसिकता तयार होते. श्रद्धेच वैचारिक लांगुलचालन करुन कालबाह्य परंपरा जपणारा प्रवाह देखील समाजात आहेच.
इंदिरा गांधींनी समजा काळा गाउन घालुन तेथे गेल्या असत्या आणि वर्तमान पत्रांनी त्याची देश तसा वेश अशी भलावण केली असती तर तीही मान्यच झाली असती. आपण देशाचे पंतप्रधान आहोत हे विसरुन इंदिरा गांधी एका सर्वसामान्य नागरीकाच्या भुमिकेत जाउन सौदी अरेबियातील समाजाशी आपल्या अल्पशा भेटीत एकरुप झाल्या आणि भारताची वैश्विक प्रतिमा उंचावली. अशी बातमी आली असती. इंदिरा गांधी ईशान्येकडील राज्यात तेथील पारंपारिक वेश धारण करीत असत.त्याचे देश तसा वेश असे कौतुकही होत असे.
विनोबा भाव्यांनी जेव्हा आणीबाणीचे अनुशासन पर्व असे नामकरण केले तेव्हा ते इंदिरा गांधींचे वैचारिक लांगुल चालन असा जनक्षोभ झालाच होता. स्वाभिमान डिवचण्यासाठी लांगुलचालन शब्द वापरला जातो आणि त्याचा प्रतिवाद म्हणुन बागव्यांसारखे लोक सुरक्षितता वगैरे हास्यास्पद / शंकास्पद कारणे देतात.
झेल्या शब्द उच्चारताना उजव्या हाताची ओंजळ अधोउर्ध्व दिशेने खाली वर करताना नेमक काय झेलतात हे सांगण्याचे हे ठिकाण नव्हे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
"आणीबाणीच्या काळात काँग्रेसचे तत्कालीन युवराज, संजय गांधी यांची चप्पल विमानाच्या जीन्यावरून जाताना पडली. तेंव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि (तेंव्हा नक्की कोण होते माहीत नाही पण) ग्यानी झैलसिंग हे पळत गेले आणि चपला घेऊन दिल्या" हे यावरून आठवले. अर्थात त्यातील एकजण नंतर परत मुख्यमंत्री नंतर गृहमंत्री झाले (आता मुलाला पण त्या पुण्याईचे फळ चाखता येत आहे!) तर दुसरे राष्ट्रपती.
बाकी बागव्यांनी चपलेत बाँब वगैरे असू नये म्हणून केलेली गोष्ट फारच स्पृहणीय आहे ;) (जरी राजीवगांधींच्या संदर्भात ते हारामधील बाँबने गेले, चपलेतील अथवा चपलाहारातील नाही!).
एकदम आठवले: एरव्ही मागेपुढे सतत लांगुलचालन करणार्या एकाही काँग्रेसचा श्रेष्ठी/ तामिळनाडूतील नेते त्यावेळेस (२१ मे १९९१) राजीव गांधींच्या मागे पुढे नव्हते, इतकेच काय एरव्ही "जेथे राघव तेथे सीता" प्रमाणे खरेच सावलीसारखी प्रत्येक सभेत बरोबर असलेल्या सोनीयाजी पण त्यादिवशी सावलीच काय पण त्यांच्याबरोबर श्रीपेरंबदूरला नव्हत्या तर दिल्लीतच होत्या, हा पण एक योगायोगच होता.... म्हणून तळहातावर चपलेच्या रूपाने स्वतःचे प्राण घेणार्या बागवेजींकी जय हो! ;)
प्रकाशरावांना बाकी उत्तरे वर दिली असल्याने आणि त्या उत्तरांशी (नील/देवदत्त/बिपीन) सहमत त्यामुळे त्यावर काही वेगळे लिहीण्याचा प्रश्न नाही. :-) फक्त अजून एकच गोष्ट आठवली:
काही वर्षांपुर्वी दिल्लीच्या ला मेरिडीयन हॉटेलात वास्तव्य होते. तिथल्याच एका गाडीच्या ड्रायव्हरबरोबर बाहेर असताना, बंग्लासाहीब गुरूद्वारात गेलो होतो. (तेथे अजूनही भिन्द्रनवाले, सतवतसिंग, बिएंतसिंग यांचे फोटो आहेत...). चपला ठेवायला गेलो तेंव्हा हा ड्रायव्हर एकदम अदबीने चपला घेणार्या बाईशी बोलला. नंतर विचारले कोण आहे ही? तर "आमच्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या मालकाची (एमडी वगैरे) बायको आहे", असे सांगितले.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
एरव्ही "जेथे राघव तेथे सीता" प्रमाणे खरेच सावलीसारखी प्रत्येक सभेत बरोबर असलेल्या सोनीयाजी पण त्यादिवशी सावलीच काय पण त्यांच्याबरोबर श्रीपेरंबदूरला नव्हत्या तर दिल्लीतच होत्या, हा पण एक योगायोगच होता
'योगायोग' शब्द कोणत्या अर्थाने वापरलाय माहित नाही पण एका मुलाखतीत सोनिया गांधींनी विमानात जागा नसल्याने श्रीपेरंबदूरला गेले नव्हते असे सांगितले आहे.
प्रतिक्रिया
6 Feb 2010 - 9:16 am | पाषाणभेद
मुंबई अन महाराष्ट्र द्वेशी चा फोटो अन धागा उडवला जावा. (सुनील भौ समजून घेतील ही अपेक्षा.) कमीतकमी राजकारण बाजुला ठेवून धाग्यात त्याचा निषेध करावा ही विनंती.
माझ्यातर्फे राहुल्याचा त्रीव्र निषेध.
मी मुंबईचा- मुंबई माझी
मी मराठी !

जय मराठी !!
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)
6 Feb 2010 - 9:15 am | बंडू बावळट
महाराष्ट्राच्या लाचार गृहराज्यमंत्र्यांना छान जोडा हाणला आहे! :)
-- बंड्या.
6 Feb 2010 - 10:07 am | प्रचेतस
महाराष्ट्राचे एक माजी मुख्यमंत्री आणी सध्याचे केंद्रीय सदा हसतमुख उर्जामंत्री तर गांधी कुटुंबियांच्या घरी झाडू मारण्यास पण तयार झाले होते.
6 Feb 2010 - 2:32 pm | नावातकायआहे
नालायक लाचारीचे जाहिर प्रदर्शन्...नशीब (कुणाचे?) जिभेनी चाटुन शर्टानी पुसून नाही ठेवले........X(
7 Feb 2010 - 12:19 am | देवदत्त
निषेध!!! निषेध!!! निषेध!!!
7 Feb 2010 - 9:20 am | II विकास II
जोडे उचलून भारतीय परंपराच जपली- रमेश बागवे
http://www.loksatta.in/index.php?option=com_content&view=article&id=4598...
== श्री सुनील, जर तुम्ही राहुल गांधी अथवा तत्सम असलात कि उचलतील लोक जोडे.
7 Feb 2010 - 10:34 am | वेताळ
ते आगामी काळात केंद्रिय मंत्री बनु शकतात. त्याचा मुलगा पुढे भविष्यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनु शकतो.
वेताळ
7 Feb 2010 - 11:40 pm | शरद जयकर
:)) खरच बागवे हुशार आहे. भवितव्य उज्वल आहे.
जय हो !
7 Feb 2010 - 10:41 am | प्रकाश घाटपांडे
प्रसिद्धी माध्यमांनी उचलुन धरल्यामुळे याला एवढे महत्व.
अनुनय,अनुयय,निष्ठा,लाचारी,लाळघोटेपणा,चाटुगिरी,झेलेगिरी,अंधानुकरण हे सगळे शब्दोच्छल आहेत. बॉस ने केलेल्या पीजे ला हॅहॅहॅ करुन हसणे याला काय म्हणणार? परिस्थितीच्या रेट्यामुळे अस्तित्वाच्या लढाईसाठी केलेल्या असहाय्य कृतीला काय म्हणणार?
भारतीय परंपरेत रामाचे जोडे सांभाळणार्या भरताला काय म्हणणार?
जोडे हा वस्तुला असलेली अप्रतिष्ठा, जणुकाही नाईलाजास्तव घालावा लागणारा एक हीन लटांबर. जोड्याने मारायची पण लायकी नाही; जोडे पुसायला ठेवा; यातुन जोड्याला हीन लेखण्याची मानसिकता दिसते. काठीने झोडपणे हे तुलनात्मक दृष्ट्या प्रतिष्ठेचे दिसते. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना त्यावेळी कारसेवे सारखी सुवर्ण मंदिरात जोडे सांभाळण्याची शिक्षा वजा धर्मादेश शीख धर्मपंडीतांनी दिला होता असे काहीसे आठवते, तपशीलात थोडाफार बदल असु शकतो.
इथे राजीव गांधींना आपले जोडे कुणी सांभाळणे अपेक्षित नाही आणी बागवेंनाही आपण हे केले नाही तर आपले गृहराज्यमंत्रीपद जाईल असेही अपेक्षित नाही.
मर्जी सांभाळण्यासाठी कराव्या लागणार्या अनेक कृतींपैकी ती एक कृती असेल. विद्वान लोक कदाचित सिद्धांत/बोधकथा/दृष्टांत वगैरेंचा देउन आणीबाणीच समर्थन अनुशासन पर्व म्हणुन करत असतात. पुर्वी राजाच्या काळात भाट लोक काय करीत असत? मांडलीक राजे आपल्या मांडलिकत्व टिकण्यासाठी काय करीत असत? समुहात जगण्यासाठी आपण आपल्याला अनेक न आवडणार्या गोष्टी सुद्ध करत असतो. जोपर्यंत त्याचा आपल्याला त्रास होत नाही तोपर्यंत करत राहतो. जेव्हा त्रास व्हायला लागतो त्यावेळी आपण उपयुक्त व उपद्रवमुल्यांचा तौलानिक अभ्यास करुन निर्णय घेतो. आपले उपयुक्तता मुल्य हे कायम नजरेस राहव म्हणुन अनेक क्लुप्त्या लोक लढवत असतातच की.
प्रवासाहुन आलेल्या पाहुण्याची सुटकेस बॅग सहजपणे/प्रेमाने आपण हातात घेतो ती काय त्याला उरलेली चार पावल जड झाली असतात म्हणुन काय?
संडास साफ करणे याला समाजात असलेली अप्रतिष्ठा / गौणत्व हे म. गांधी गाडगेबाबा सारख्या लोकांनी कमी करण्याचा प्रयत्न करुन प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न केला म्हणुन स्वच्छता अभियान राबु शकते.
बागवेंना या मुद्द्यावरुन झोडपण्यापेक्षा गृहराज्यमंत्रीपद सांभाळण्यात आपण कसे नालायक आहात हे सप्रमाण दाखवुन झोडपले तर ते अधिक योग्य ठरेल असे वाटते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
7 Feb 2010 - 1:17 pm | Nile
अहो मर्जी संभाळण्यासाठी चपला सांभाळायची काय गरज आहे? तुमचे मुद्दे पटले नाहीत. राम(खरा वा कथेतुन तयार केलेला) आणि राहुल गांधी यांची तुलना बरोबर वाटत नाही. त्याच प्रमाणे गाडगेबाबा इ. चे कार्य आणि हे चपला सांभाळण्याचे प्रकरण यांची तुलना चुक आहे.
7 Feb 2010 - 8:32 pm | देवदत्त
Nile शी पूर्ण सहमत. घाटपांडे साहेब, तुमचे मुद्दे पटले नाहीत.
आणि बागवेंनी आपल्या कृतीच्या समर्थनाकरीता जे म्हटले ते तर आणखीनच पटण्यासारखे नाही. (स्त्रोतः वरील एका प्रतिसादातील लोकसत्तेचा दुवा)
ते म्हणतात,
"स्व. राजीव गांधी यांची हत्या कशा प्रकारे झाली हे सर्वज्ञात आहे. राहुल यांच्या जोडय़ामध्ये बॉम्ब ठेवण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून आपण त्यांचे जोडे उचलून नैतिक कर्तव्यच पार पाडले."
म्हणजे त्यांच्या आसपास येणार्या लोकांची जी काही तपासणी करतात ती पूरेपूर नसते का? एवढे जे सुरक्षा रक्षक, अंगरक्षक कामाला ठेवलेत ते काम न करता काय गर्दी जमवायला आणले होते?
एक प्रश्नः गृहराज्यमंत्री हे पद नेमके काय असते? त्यात आणि गृहमंत्री ह्यात काय फरक आहे?
महाराष्ट्र सरकारच्या संकेतस्थळावर मंत्रीमहोदयांच्या यादीत बागवे ह्यांचे नाव आणि ते पद दोन्ही दिसले नाही.
7 Feb 2010 - 7:53 pm | बिपिन कार्यकर्ते
मिष्टर घाटपांडे...
तुमचा प्रतिसाद पटलाच नाही. बदनाम आंतरजालिय शब्द वापरायचा तर बादरायण संबंध म्हणता येईल. ;)
तुम्ही दिलेल्या बर्याच उदाहरणांचा आणि बागवे नामक इसमाने केलेल्या कृतीचा संबंध लावणे जरा हे च वाटते.
प्रसिद्धी माध्यमांनी उचलुन धरल्यामुळे याला एवढे महत्व.
प्रसिद्धीमाध्यमांनी उचलून धरले नसते आणि माझ्या माहितीत आले असते तरीही मला तितकीच घृणा वाटली असती जेवढी आत्ता वाटते आहे.
अनुनय,अनुयय,निष्ठा,लाचारी,लाळघोटेपणा,चाटुगिरी,झेलेगिरी,अंधानुकरण हे सगळे शब्दोच्छल आहेत. बॉस ने केलेल्या पीजे ला हॅहॅहॅ करुन हसणे याला काय म्हणणार? परिस्थितीच्या रेट्यामुळे अस्तित्वाच्या लढाईसाठी केलेल्या असहाय्य कृतीला काय म्हणणार?
हेतू काही का असेना, दोष तितकाच. दोष कमी होत नाही. अर्थात, थोड्या फार फरकाने वर दिलेली उदाहरणे आपण सगळेच करत असतो. मान्य. पण हा बागवे इसम जेव्हा महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात बसतो तेव्हा कुठेतरी तो महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतो. तो एक गैरशासकिय पदाधिकारी असता तर मला घृणा नसती. वाईट वाटले असते कदाचित.
भारतीय परंपरेत रामाचे जोडे सांभाळणार्या भरताला काय म्हणणार?
तुमच्यासारख्याने असं म्हणावं? कठिण आहे. भरताने पादुका सांभाळल्या / उचलल्या / मस्तकी धारण केल्या पण का? त्याला राज्य हवे होते? त्याला इतर काही भौतिक लाभ हवा होता? तसे तर काहीच नव्हते. त्याच्या उलटच होते खरे तर. त्याने श्रीरामचंद्रांची खूण म्हणून त्या पादुका सिंहासनावर स्थापन केल्या आणि त्यांच्या नावाने राज्य केले. मग हे उदाहरण कसे लागू होते बागवे नामक इसमाने केलेल्या कृतीला?
जोडे हा वस्तुला असलेली अप्रतिष्ठा, जणुकाही नाईलाजास्तव घालावा लागणारा एक हीन लटांबर. जोड्याने मारायची पण लायकी नाही; जोडे पुसायला ठेवा; यातुन जोड्याला हीन लेखण्याची मानसिकता दिसते. काठीने झोडपणे हे तुलनात्मक दृष्ट्या प्रतिष्ठेचे दिसते.
ठीक.
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना त्यावेळी कारसेवे सारखी सुवर्ण मंदिरात जोडे सांभाळण्याची शिक्षा वजा धर्मादेश शीख धर्मपंडीतांनी दिला होता असे काहीसे आठवते, तपशीलात थोडाफार बदल असु शकतो.
बरोबर, पण त्यात जोड्यांच्या हीनतेबद्दल काही संबंध आहे असे वाटत नाही. शीख लोकांच्या गुरूद्वारामधे वेगवेगळी कामे असतात आणि सगळेच शीख जमेल तसे त्यात सहभागी होतात. इतर अनेक शिक्षांपैकी ही एक शिक्षा. पण तुमच्या म्हणण्यात तथ्य असू शकते.
इथे राजीव गांधींना आपले जोडे कुणी सांभाळणे अपेक्षित नाही
बहुधा असेच असावे, असेलच. पण खात्री देता येत नाही. इथे राहुल गांधींचे नाव आहे म्हणून असे म्हणतो आहे असे नाही. इथे अगदी राज ठाकरे नाव असते तरी खात्री नाही देता येणार. ते म्हणतात ना... यु नेव्हर नो.
आणी बागवेंनाही आपण हे केले नाही तर आपले गृहराज्यमंत्रीपद जाईल असेही अपेक्षित नाही.
बहुधा असेच असावे, असेलच.
मर्जी सांभाळण्यासाठी कराव्या लागणार्या अनेक कृतींपैकी ती एक कृती असेल.
नक्कीच. पण त्यामुळे त्याची निषेधार्हता कमी होते का?
विद्वान लोक कदाचित सिद्धांत/बोधकथा/दृष्टांत वगैरेंचा देउन आणीबाणीच समर्थन अनुशासन पर्व म्हणुन करत असतात. पुर्वी राजाच्या काळात भाट लोक काय करीत असत? मांडलीक राजे आपल्या मांडलिकत्व टिकण्यासाठी काय करीत असत? समुहात जगण्यासाठी आपण आपल्याला अनेक न आवडणार्या गोष्टी सुद्ध करत असतो. जोपर्यंत त्याचा आपल्याला त्रास होत नाही तोपर्यंत करत राहतो. जेव्हा त्रास व्हायला लागतो त्यावेळी आपण उपयुक्त व उपद्रवमुल्यांचा तौलानिक अभ्यास करुन निर्णय घेतो. आपले उपयुक्तता मुल्य हे कायम नजरेस राहव म्हणुन अनेक क्लुप्त्या लोक लढवत असतातच की.
पटण्यासारखे.
प्रवासाहुन आलेल्या पाहुण्याची सुटकेस बॅग सहजपणे/प्रेमाने आपण हातात घेतो ती काय त्याला उरलेली चार पावल जड झाली असतात म्हणुन काय?
कधी कधी असे असते पण बरेच वेळा आपुलकीने आपण ते करतो. इन एनी केस, लांगुलचालनासाठी हे नक्कीच केले जात नाही बहुतांशवेळा.
संडास साफ करणे याला समाजात असलेली अप्रतिष्ठा / गौणत्व हे म. गांधी गाडगेबाबा सारख्या लोकांनी कमी करण्याचा प्रयत्न करुन प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न केला म्हणुन स्वच्छता अभियान राबु शकते.
खरे आहे. पण त्या दोन नावांबरोबर अजून एक नाव घ्यायचे राहिले. ;)
बागवेंना या मुद्द्यावरुन झोडपण्यापेक्षा गृहराज्यमंत्रीपद सांभाळण्यात आपण कसे नालायक आहात हे सप्रमाण दाखवुन झोडपले तर ते अधिक योग्य ठरेल असे वाटते.
बागवे नामक इसमाला या दोन्ही मुद्द्यांवरून झोडपावे असे आमचे मत आहे. कारण परत तेच... कुठे तरी तो भूषवित असलेले पद हे महाराष्ट्राचे प्रतिकात्मक आहे. तेव्हा जे झाले ते अतिशय निंदनिय आणि लांच्छनास्पद झाले असे मला वाटते. या उलट खरोखरच काही कारण असते... उदाहरणार्थ राहुल गांधीच्या चपलांवर समजा एखाद्या कुत्र्याने पाय वर केला असता वगैरे... तर त्या चपला उचलून बाजूला ठेवल्या असत्या तरी समजू शकतो. पण काही कारण नसताना, चपला उचलून, त्या शेवट पर्यंत हातात धरून उभे राहणे आणि नंतर निर्लज्जपणे त्याचे अतिशय हास्यास्पद समर्थन करणे या मुळे मला तरी नक्कीच घृणा आलेली आहे. पुणेकर रमेश बागवे पेक्षा पुणेकर रमेश वांजळे परवडतो असेच वाटते उद्वेगाने. (अर्थात रमेश वांजळे उद्या असे वागणारच नाहीत याची ग्यारंटी नाहीच. ;) )
या बाबतीत श्रीमती इंदिरा गांधींचा एक ऐकिव किस्सा आठवतो. खरा आहे की खोटा माहित नाही... खरा असावा अशी अपेक्षा करतो. त्या पंतप्रधान असताना सौदी अरेबियाला गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी तिथल्या रिवाजाप्रमाणे काळा गाऊन अंगात घालावा असे अपेक्षित आहे असे त्यांना कळवले गेले. तेव्हा मी भारताची पंतप्रधान आहे... असले काही करणार नाही असे सांगून त्या साधा डोक्यावरही पदर न घेता वावरल्या. मोठ्यांच्या मोठ्या गोष्टी... आपण टाळ्या वाजवायच्या फक्त.
बिपिन कार्यकर्ते
8 Feb 2010 - 10:30 am | प्रकाश घाटपांडे
<<इथे राजीव गांधींना आपले जोडे कुणी सांभाळणे अपेक्षित नाही >>
इथे टंकनभरात राजीव गांधी झालेले आहे ते राहुल गांधी असे वाचावे.नकळत झालेल्या त्रुटी बाबत हा खुलासा.
निस्वार्थी पणे असेल तर ती निष्ठा आणि स्वार्थापोटी असेल तर ते लांगुल चालन अशी सर्वसाधारण विभागणी असते. निष्ठा पुढे परंपरा- धर्मश्रद्धा-श्रद्धा- अंधश्रद्धा या विश्लेषणकल्लोळात नेता येते.भरताचे उदाहरण हे केवळ जोडे सांभाळणे या साम्यामुळे आहे.
बागवेंनी सुरक्षिततेचे दिलेले कारण हे शंकास्पद वाटते. बाकी सन्मान आदरातिथ्य वगैरे याला त्यांची भुमिका म्हणता येईल. ती पटणे न पटणे हा भाग वेगळा. नेत्यांचा अनुनय ही गोष्ट भारतीय राजकारणात नवी नाही. विकास यांनी इतिहासातील काही उदाहरणे दिली आहेच.
बागव्यांनी जोडे उचलणे अपेक्षित नाही. बागव्यांनी जोडे उचलण्याची गरज नाही. ते राजकीय शिष्टाचारात बसत नाही. वगैरे विधाने करता येतील.
बाबा बुवांच्या भक्तांचे श्रद्धेचे लांगुल चालन पाहिले तर तेही काहि वेगळे नाही. बाबांनी पाया पडताना फटका मारला कि तो भाग्यवान. अस्लमबाबा तर खुर्ची फेकुन मारायचा. श्रद्धेतुनच गजाननमहाराजांचे प्रकट दिन साजरे होतात. आत्मिक समाधानाच्या स्वार्थात देखील अनेक हिशोब गुंतलेले असतात. बागवेंचे लांगुल चालन हा त्यांच्या लेखी राहुल गांधींवरील व्यक्तिनिष्ठेचा वा काँग्रसवरील निष्ठेचा भाग आहे. घराणेशाही ही अशा अनुनयातुनच टिकते. हेच राहुल गांधी जर गांधी घराण्यातील युवराज नसते तर तर त्यांचे जोडे बागवेंनी उचलले असते काय?
समुह मानसिकतेत वेगळा विचार मांडलेला पचनी पडत नाही. अंशत: असहमती म्हणजे विरोध ही मांडणी / मानसिकता देखील जुनी आहे. शिवसेनेला विरोध म्हणजे मराठी ला विरोध मराठीचा द्रोही. काँग्रेसला विरोध म्हणजे धर्मनिरपेक्षतेला विरोध अशी समीकरण रुजु होतात. एकदा थोर पुरुषांना देव्हार्यात ठेवले की त्यांचे मानवी विश्लेषण करायचे नाही. करणारा राष्ट्र द्रोही ,धर्म द्रोही, समाज द्रोही.तीच गोष्ट विचारांची. वेदोक्त, पुराणोक्त, अपौरुषेय वगैरे परंपरात 'बाबा वाक्यं प्रमाणं' अशी मानसिकता तयार होते. श्रद्धेच वैचारिक लांगुलचालन करुन कालबाह्य परंपरा जपणारा प्रवाह देखील समाजात आहेच.
इंदिरा गांधींनी समजा काळा गाउन घालुन तेथे गेल्या असत्या आणि वर्तमान पत्रांनी त्याची देश तसा वेश अशी भलावण केली असती तर तीही मान्यच झाली असती. आपण देशाचे पंतप्रधान आहोत हे विसरुन इंदिरा गांधी एका सर्वसामान्य नागरीकाच्या भुमिकेत जाउन सौदी अरेबियातील समाजाशी आपल्या अल्पशा भेटीत एकरुप झाल्या आणि भारताची वैश्विक प्रतिमा उंचावली. अशी बातमी आली असती. इंदिरा गांधी ईशान्येकडील राज्यात तेथील पारंपारिक वेश धारण करीत असत.त्याचे देश तसा वेश असे कौतुकही होत असे.
विनोबा भाव्यांनी जेव्हा आणीबाणीचे अनुशासन पर्व असे नामकरण केले तेव्हा ते इंदिरा गांधींचे वैचारिक लांगुल चालन असा जनक्षोभ झालाच होता. स्वाभिमान डिवचण्यासाठी लांगुलचालन शब्द वापरला जातो आणि त्याचा प्रतिवाद म्हणुन बागव्यांसारखे लोक सुरक्षितता वगैरे हास्यास्पद / शंकास्पद कारणे देतात.
झेल्या शब्द उच्चारताना उजव्या हाताची ओंजळ अधोउर्ध्व दिशेने खाली वर करताना नेमक काय झेलतात हे सांगण्याचे हे ठिकाण नव्हे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
7 Feb 2010 - 9:04 pm | विकास
"आणीबाणीच्या काळात काँग्रेसचे तत्कालीन युवराज, संजय गांधी यांची चप्पल विमानाच्या जीन्यावरून जाताना पडली. तेंव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि (तेंव्हा नक्की कोण होते माहीत नाही पण) ग्यानी झैलसिंग हे पळत गेले आणि चपला घेऊन दिल्या" हे यावरून आठवले. अर्थात त्यातील एकजण नंतर परत मुख्यमंत्री नंतर गृहमंत्री झाले (आता मुलाला पण त्या पुण्याईचे फळ चाखता येत आहे!) तर दुसरे राष्ट्रपती.
बाकी बागव्यांनी चपलेत बाँब वगैरे असू नये म्हणून केलेली गोष्ट फारच स्पृहणीय आहे ;) (जरी राजीवगांधींच्या संदर्भात ते हारामधील बाँबने गेले, चपलेतील अथवा चपलाहारातील नाही!).
एकदम आठवले: एरव्ही मागेपुढे सतत लांगुलचालन करणार्या एकाही काँग्रेसचा श्रेष्ठी/ तामिळनाडूतील नेते त्यावेळेस (२१ मे १९९१) राजीव गांधींच्या मागे पुढे नव्हते, इतकेच काय एरव्ही "जेथे राघव तेथे सीता" प्रमाणे खरेच सावलीसारखी प्रत्येक सभेत बरोबर असलेल्या सोनीयाजी पण त्यादिवशी सावलीच काय पण त्यांच्याबरोबर श्रीपेरंबदूरला नव्हत्या तर दिल्लीतच होत्या, हा पण एक योगायोगच होता.... म्हणून तळहातावर चपलेच्या रूपाने स्वतःचे प्राण घेणार्या बागवेजींकी जय हो! ;)
प्रकाशरावांना बाकी उत्तरे वर दिली असल्याने आणि त्या उत्तरांशी (नील/देवदत्त/बिपीन) सहमत त्यामुळे त्यावर काही वेगळे लिहीण्याचा प्रश्न नाही. :-) फक्त अजून एकच गोष्ट आठवली:
काही वर्षांपुर्वी दिल्लीच्या ला मेरिडीयन हॉटेलात वास्तव्य होते. तिथल्याच एका गाडीच्या ड्रायव्हरबरोबर बाहेर असताना, बंग्लासाहीब गुरूद्वारात गेलो होतो. (तेथे अजूनही भिन्द्रनवाले, सतवतसिंग, बिएंतसिंग यांचे फोटो आहेत...). चपला ठेवायला गेलो तेंव्हा हा ड्रायव्हर एकदम अदबीने चपला घेणार्या बाईशी बोलला. नंतर विचारले कोण आहे ही? तर "आमच्या फाईव्ह स्टार हॉटेलच्या मालकाची (एमडी वगैरे) बायको आहे", असे सांगितले.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
8 Feb 2010 - 12:00 am | शाहरुख