गुणी अभिनेत्याची चांगली मुलाखत.
अवांतर-प्रश्नोत्तरात इंग्रजी शब्द टाळून पर्यायी मराठी शब्द वापरले असते तर आणखी बरे वाटले असते.
अगदी तितका अंधविश्वास जरी नाही ठेवला तरी एक आपला चित्रपट पुढे आणण्यासाठी मराठी प्रेक्षकांनी कमिटमेंट दाखविली पाहीजे. म्हणजे मी तर म्हणेन आता इतका चांगला मराठी सिनेमा बनत आहे तर प्रेक्षकांनी सुद्धा त्याला साथ दिली पाहीजे. म्हणजे महिन्यातुन एक तरी मी मराठी चित्रपट थिएटरमधे जाउन बघिन असं ठरविलं पाहीजे. त्या शिवाय मराठी चित्रपट पुढे जाणार नाही
अभिनंदन आणि मिपावर दिल्याबद्दल आभार. गुणी अभिनेत्याची चांगली मुलाखत असेच म्हणते.. कुलकर्णींचे आगामी चित्रपट पाहण्यासारखे असतील हे नक्की.
तरी राहवत नाही म्हणून एक सांगावेसे वाटते -इंग्रजीमुळे रसभंग नाही, पण असे वाटते की मराठी लेखनात वाक्येच्या वाक्ये इंग्रजीत असू नयेत. - संदीप कुलकर्णींची ही मुलाखत काही मराठी आजी-आजोबांना वाचायला जड जाऊ शकते असे वाटते.
मुलाखत छानच घेतली आहे.पण एवढया चांगल्या मुलाखतीला हिंदी शीर्षक कशाला? शिवाय मराठी मुलाखतीत इंग्रजी शब्दांची भरपूर पेरणी झाली आहे, हे खटकते.
मराठीत इतके टॅलेंटेड अॅक्टर्स आणि डायरेक्टर्स आहेत तरीही मराठी चित्रपट हा महाराष्ट्रात इतका चालत नाही
मराठी लेखनातदेखील परभाषिक शब्द एवढे येतात.... म्हणून कदाचित मराठी चित्रपट मराठी प्रेक्षकांना भावत नसेल. ...अपवाद सोडून.
वर्षातै, मुलाखत आवडली. संदीप कुलकर्णीचा अभिनय आवडतो. मुलाखतीत थोडे शब्दांकन करून मराठीकरण केले असते तर चांगले वाटले असते पण मूळ संवाद पारदर्शकपणे मांडण्याची तुमची भुमिका योग्य वाटते.
सुंदर मुलाखत. संदीप कुलकर्णी हा अतिशय गुणी अभिनेता आहे. श्वास मधे त्याने साकारलेला डॉक्टर तर अप्रतिम होता. अवंतिकामधील अभिनयही मस्त. इथे ह्या अभिनेत्याची आणखी ओळख करुन दिल्याबद्दल आपले आभार.
चांगली कल्पना आणि मागे न राहता ती प्रत्यक्षात उतरवल्याबद्दल अभिनंदन. मुलाखत जशीच्या तशी दिली आहे आणि म्हणूनच एवढे इंग्रजी शब्द त्यात आले आहेत हे समजते आहे पण तरीही इतके सगळे इंग्रजी शब्द जरा खटकलेच.
बिपिन कार्यकर्ते
प्रथम मी सर्वांचे आभार मानते, मुलाखत वाचल्याबद्दल आणि प्रतिक्रीया दिल्याबद्दल.
मुलाखतीमधे बरेच इंग्रजी शब्द आहेत आणि त्याबद्दल मी आधिच मुलाखती मधेच दिलगीरी व्यक्त केलेली आहे.
मी जशीच्या तशी मुलाखत लिहीण्यामागे एक निश्चित भुमिका (definite thought होता.) होती , आणि ती अशी की तुम्हाला जसे काही त्यांच्याशी तुम्ही स्वतः गप्पा मारत आहात आणि त्यांना live ऐकत आहात असे feeling यावे. फोटोज दिसत नाही आहेत नाहीतर मुलाखत अजुन उठावदार झाली असती.
तुमच्या सर्वांच्या सुचना स्वागतार्ह्यच आहेत.
फोटो टाका. वाविप्र मधे त्याबद्दल मार्गदर्शन आहे. शिवाय तुम्ही फोटो साठी जे दुवे दिले आहेत ते तुमच्या अकाउंटमधूनच दिसू शकतील. पिकासावर अपलोड करून मग इथे दुवे द्या.
बिपिन कार्यकर्ते
संदीप कुलकर्णी ची मुलाखत आवडली. सुखांत च्या निमित्ताने झालेल्या परिसंवादात संदीपची इच्छा/दयामरणावर व्यक्ती म्हणुन असलेली मते अतिशय विवेकी वाटली त्याची आठवण आली.
मुख्य म्हणजे मुलाखत सहज झाल्यामुळे एक वेगळेपण जाणवले.
अवांतर- आत्ताच नटरंग पाहिला. जाम आवडला.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
फोटो का दिसत नाहीत हा मला देखिल पश्नच आहे. मी वाविप्र मधे
सांगितलेल्या सर्व स्टेप्स केलेल्या आहेत. पिकासा वरील फोटोची लिंक दिलेली आहे तरीही फोटो दिसत नाही आहेत. :(
फ्लिकरपेक्षा पिकासातून फोटो देताना थोडी गोची होते.
कृती -
१ -पिकासात फोटो उघडा
२ -फोटोवर राईट क्लिक मारा
३ - "प्रॉपर्टीज"मधे जा
४ - तिथे दिसणारा यूआरएल कॉपी करा
५ - पुढचं सगळं नेहेमीप्रमाणेच...
(पिकासो)चतुरंग
मुलाखत चांगली व विस्तृत आहे, पुष्कळ मुद्दे कव्हर झाले आहेत. संदिप कुलकर्णी हे एक गुणी अभिनेते आहेतच.
फक्त श्वासमध्ये एक मोठी गफलत झाली होती. शेवटी ऑपरेशन थिएटरच्या दृष्यात ते पहिल्यांदा हातमोजे चढवितात अन मग चेहर्यावर मास्क घालतात. ही चूक कॅन्सर सर्जन (तरी) करणे केवळ अशक्य आहे कारण सिक्वेन्स असा नसतो; पहिल्यांदा हेड-कॅप, मग मास्क अन मग वॉश घेऊन गाऊन घालून ग्लोव्ह्ज घातले जातात. क्लोज-अप असल्यामुळे चूक उठून दिसली.
असो.
प्रतिक्रिया
गुणी
मुलाकात
सम क्वेश्चन्स वर ग्रेट :-)
+ १ सेम हिअर!
मुलाखत चांगली घेतली आहे
खुप छान
फोटो दिसत नाही आहेत.
मुलाकात-
चांगला संवाद
सुंदर
वा!
चांगली
आभार
फोटो टाका.
मी
तुम्ही
मुलाखत आवडली
असेच म्हून राह्यलो
फोटो का
फोटो अपलोडवून दिलेत!
चतुरंग खुप
मुलाखत आवडली
छान मुलाखत!
धन्यवाद