गाभा:
विज्ञान म्हणतं त्याप्रमाणे सुर्याजवळून एक मोठा चुंबकीय शक्ती असलेला ग्रह (किंवा जे असेल ते) वेगाने गेल्यावर सुर्याचे तुकडे वगैरे होवून सगळे तुकडे सुर्याभोवती फिरायला लागलेत व पृथ्वी ही त्यापैकीच एक. हे सत्य मानले तर एक प्रश्न मनाला भेडसावतो की, मग त्या पृथ्वीवर सगळ्यात पहिला सजीव प्राणी कोण आला? कसा व कुठून आला असावा? तो जेथून आला ते तरी कोठून आले असावे? तो जर कोणीतरी निर्माण केला असे म्हणायचे असेल तर तो निर्माता कुठून आला? कृपया या चर्चेचा ओघ 'देव आहे किंवा नाही?' याकडे न वाहू देता मला या चर्चेत विविध वैज्ञानिक शक्यतांचा विचार करून बघायचा आहे. मुळात सुर्य कुठून आला असावा? विश्वात आधी काहीच नव्हते (फक्त पोकळी), त्यानंतर मग प्रथम काय आले असावे? व कोठून?
खुप ईंटरेस्टींग विषय आहे हा!! (असे मला तरी वाटते)
प्रतिक्रिया
31 Dec 2009 - 7:19 pm | घाशीराम कोतवाल १.२
१ सासू-सून-नणंद-जावा-भावजयी यांच्यातील भांडणांमूळे भारताचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात!
२काथ्याकूट सासू ही 'आई' का होवू शकत नाही?
३विश्वातील पहिला सजीव कोण असावा आणि निर्जीव वस्तू कोणती असावी?
४ भारत: का होतोय सगळ्यात जास्त खुन्यांचा/खुनांचा व अपघातांचा देश!?
५ सासू-सून-नणंद-जावा-भावजयी यांच्यातील भांडणांमूळे भारताचे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात!
काय मालक हे काय ब्रेकिंग न्युज सारखे एकदम ५ लेख पाडलेत
तुमचा बोळा निघुन एव्हड्या दणक्यात ५ लेख प्रसवलेत कमाल आहे हो तुमची तुम्ही जालिंदरबाबांचा गंडा घालुन एव्हडे लेख पाडलेत
लगे रहो !!!
भले शाब्बास
(लेखाच्या अखेरचा सोबती ) कोतवाल
1 Jan 2010 - 7:35 pm | शैलेन्द्र
"विज्ञान म्हणतं त्याप्रमाणे सुर्याजवळून एक मोठा चुंबकीय शक्ती असलेला ग्रह (किंवा जे असेल ते) वेगाने गेल्यावर सुर्याचे तुकडे वगैरे होवून सगळे तुकडे सुर्याभोवती फिरायला लागलेत व पृथ्वी ही त्यापैकीच एक. हे सत्य मानले तर एक प्रश्न मनाला भेडसावतो की, मग त्या पृथ्वीवर सगळ्यात पहिला सजीव प्राणी कोण आला?"
जाउद्या हो, ते सत्य वगैरे मानु नका.. डोक्याला शॉट नाही....
1 Jan 2010 - 7:47 pm | jaypal
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
2 Jan 2010 - 12:50 am | अनुप्रिया
जे आपल्या सर्वात जवळ्ची गोष्ट आहे ती "दगड"
=D>
2 Jan 2010 - 12:53 am | अनुप्रिया
विश्वातील पहिला सजिव
bactaria
2 Jan 2010 - 2:13 am | टारझन
हो का ? अर्रे वा :)
बाकी लेख पाडण्याची हौस अगदी आय.डी. प्रमाणेच पुर्ण केली जातीये :)
-( आदिनाथ )अमिबा